पोस्ट्स

कोण आहेत कुर्बान हुसेन?

इमेज
कोण आहेत कुर्बान हुसेन?  अब्दुल रसूल कुर्बान हुसेन हे सोलापूर येथील स्वातंत्र्य चळवळीतले पत्रकार होते. कुर्बान हुसेन यांना इंग्रजांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल दोषी ठरवून, १२ जानेवारी १९३१ रोजी फासावर चढविण्यात आले. त्यावेळी कुर्बान हुसेन यांचे वय अवघे २२ वर्षे होते. एवढ्या तरुण वयात हौतात्म्य लाभलेले ते पहिलेच संपादक असावेत, असे सांगण्यात येते. सोलापुरातील स्वातंत्र्यलढा दडपण्यासाठी इंग्रजांनी मार्शल कायदा लागू केला. त्यामुळे कुर्बान हुसेन यांचे वृत्तपत्र बंद पडले.त्यांनी १९२७ साली ‘गझनफर’ नावाचे उर्दू भाषेतील साप्ताहिक सुरु केले होते. ‘गझनफर’ या शब्दाचा अर्थ आहे सिंह. लोकमान्य टिळकांच्या ‘केसरी’ वृत्तपत्राने ज्याप्रमाणे स्वातंत्र्यलढ्यासाठी जागृती केली, त्याचप्रमाणे सोलापूर जिल्हयात कुर्बान हुसेन यांच्या ‘गझनफर’ वृत्तपत्राने कार्य सुरु केले होते. गझनफर हे नाव उर्दू भाषेतील होतं, परंतु ते मराठी भाषेत देवनागरी लिपीत छापले जात असे. त्यांनी गझनफर वृत्तपत्रातून स्वातंत्र्यलढा, कामगारांचे प्रश्न, हिदु-मुस्लिम ऐक्य यासह विविध विषयांवर लेखन केले.  हुसेन यांची भाषा ...

90 % अशिक्षित समाज असणाऱ्या मुस्लीम तरुणांचा बिग बॉस विजेता एम सी स्टँन व मुनव्वर फारुकी आदर्श असू शकतो का?

इमेज
आपल्या समाजातील 90% मुले अशिक्षित आहेत, त्यांना  जगाची किंवा समाजाच्या परिस्थितीची चिंता नाही, ते फक्त रील आणि स्टेटसमध्ये व्यस्त आहेत. एम सी स्टँन बिग बॉस मध्ये गेल्यानंतर पुण्यातील त्या भागात राहणाऱ्या मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष कमी आणि झटपट पैसे व प्रसिध्द होण्यासाठी एक वेगळी ओढ सूरू झाल्याची दिसून येईल. हे प्रमाण झोपडपट्टी भागात जास्त आहे.  सकाळी उठून नाश्त्याला बिर्याणी हवी आहे, संपूर्ण दिवस उद्यानात किंवा त्या पार्कमध्ये घालवावा.  संध्याकाळी नवीन रेस्टॉरंटमध्ये हलकाफुलका पदार्थ खाऊन, मोठमोठे डायलॉग्स सांगून, कथा सांगणे. लाइव्ह येणे आणि हुक्का ओढत रील्स बनवणे आणि शेवटी चहाचे दुकान शोधणे आणि हँग आउट करणे जेणेकरून 2-3 तास निघून जातील. रात्री आईवडील घरी परतले की त्यांनी काही विचारले तर घाबरून त्यांच्याशी बोलणे, धावत धावत खोलीत जाणे, आरामात झोपणे, गप्पा मारणे, गेम्स खेळणे, रील, स्टेटस, स्टोरी तपासणे, कोणी पाहिले, कोणी नाही हे तपासणे. झोपा. हे फक्त आमच्या समाजातील मुलांचे रोजचे काम आहे.एकीकडे दररोज समाजाची परिस्थिती बिघडत आहे आणि त्यांना बिग बॉसमध्ये रस आहे. ...

वडिलांचा फळाचा व्यवसाय वालचंदनगर इंदापूरच्या पोरीने मिळवला MBA प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या CMAT परिक्षेत देशात 91 वा क्रमांक.

इमेज
वडिलांचा फळाचा व्यवसाय पोरीने मिळवला MBA प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या CMAT परिक्षेत देशात 91 वा क्रमांक.   CMAT हि देशपातळीवर नामांकित व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रात MBA ला प्रवेश मिळवण्यासाठी परिक्षा घेतली जाते.     मूळ वालचंदनगर कळंब पुणे येथील सना आयुब शेख हिच्या यशाने कुटुंबातून आनंद व्यक्त केला जात आहे. स्वातंत्र्यानंतर औद्योगिक वसाहत निर्माण झालेल्या वालचंदनगर सारख्या गावात फळांचा व्यवसाय करणाऱ्या आळंद कुटुंबीयांनी शैक्षणिक क्षेत्रात नाव निर्माण केलें आहे.   आळंद कुटुंबामध्ये सगळे उच्च शिक्षीत असून चार्टड अकाऊटंट , पोलिस उपनिरीक्षक, तसेच प्राध्यापक झाले असून या कुटुंबाच्या पेचात एक मानाचा तुरा रोवला गेला. सनाचे प्राथमिक शिक्षण मराठी भाषेतून वर्धमान महाविद्यालय वालचंदनगर येथून तर पदवीचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथून झाले आहे. सनाच्या या यशाबद्दल तीच्या कुटुंबियांकडून कौतुक करण्यात येत आहे. © मराठी मुसलमान 7249124871

गेल्या दोन वर्षापासून MPSC च्या तीन परिक्षेत उर्दू माध्यमातून शिकलेल्या मोहंमद तोसिफचे यश.

इमेज
मराठी मुसलमान  7249124871   मूळचा दिग्रस यवतमाळ येथील असलेला मोहम्मद तोसिफ मो. हसीन याचे प्राथमिक शिक्षण उर्दू माध्यमातून झाले आहे. दिग्रसच्या अंजुमन उर्दू स्कूल मधून प्राथमिक शिक्षण घेतले आहे.    वाणिज्य शाखेतील पदवीधर असून फुलसिंग नाईक कॉलेज पुसद यवतमाळ येथून शिक्षण पूर्ण केले आहे. वडिलांचे औषधाचे दुकान असून आई गृहिणी काम करतात.      अध्यत्मिक वातावरणात वाढलेल्या आणि उर्दू माध्यमातून शिक्षण घेतलेल्या मोहम्मद तोसिफ यांचे यश कौतुक करण्याजोगे आहे.     2021 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब च्या परिक्षेत मंत्रालय सहाय्यक ( ASO )व सहाय्यक विक्रीकर निरीक्षक (STI ) हि पदे मिळवली होती. काल झालेल्या राज्यसेवा निकाल 2022 च्या परिक्षेत यश मिळवून Asst. director MFAS म्हणून निवड झाली . त्यांच्या निवडीने कुटुंबातून आनंद व्यक्त केला जात आहे. मोहंमद तोसिफ म्हणतात उर्दू माध्यमातून देखील येऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवणे अवघड नाही. उर्दू माध्यमात प्राथमिक शिक्षण घेतलेल्या युवकांनी स्पर्धा परिक्षा कडे वळले पाहिजे. हे...

राज्यसेवा परीक्षा 2021 निकालात इम्रान आणि तमन्ना दोघा पती पत्नीची यशाला गवसणी दोघेही बनले अधिकारी.

इमेज
नुकत्याच राज्यसेवा परीक्षा 2021 चा निकाल जाहीर झाला या निकालात इम्रान शफीक नायकवडी (सातारा समतानगर कॉलनी ) यांनी घवघवीत यश मिळवले इम्रान नायकवडी यांचे वडिल हे निवृत्त शिक्षक आहेत . कर्मवीर भाऊराव पाटील देवापुर माण जिल्हा सातारा येथून प्राथमिक शिक्षण घेतलेले इम्रान नायकवडी यांनी तात्यासाहेब कोरे इंजिनिअरिंग कॉलेज वारणानगर कोल्हापूर येथून पदवीधर आहेत.   राज्यसेवा परीक्षा 2021 मधून त्यांची Exise Department मध्ये DYSP पदावर नियुक्ती झाली होती.  काल झालेल्या राज्यसेवा परिक्षा 2022 निकालामध्ये असिस्टंट कमिशनर पदावर त्यांची नियुक्ती झाली. राज्यसेवा निकालामध्ये निवड झालेल्या मूळच्या जंक्शन इंदापूर पुणे येथील तमन्ना हमीद इमानदार ह्या वडिल भारत फोर्स मोटर्स मध्ये नोकरीला असल्याने पुणे तेथे वास्तव्य करतात. पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज येथून B.SC statistics मध्ये पदवीधर आहेत तर मॉडर्न कॉलेज पुणे येथून त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. 2020 च्या राज्यसेवा परीक्षेतून त्यांची नायाब तहसीलदार पदी निवड झाली होती.  दोघेही पती पत्नी असून दोघांच्या यशाबद्दल मित्रपरिवार यांच्यातून कौतुक...

भारतीय कबड्डी संघात निवड झालेला अस्लम इनामदार म्हणतो आयुष्यात एखादा मित्र राजू कोठारे सारखा असावा..

इमेज
पुणेरी पलटण प्रो कबड्डी संघात खेळणारा अस्लम इनामदार सगळ्यांच्या परिचयाचा आहे. महाराष्ट्रातील टाकळबन अहमदनगर येथील अत्यंत खडतर परिस्थितीतून आलेल्या अस्लम मुस्तफा इनामदार याची बुसान दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या 11 व्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय पुरुष कब्बडी संघात निवड झाली आहे. आपल्या मोठ्या भावापासून प्रेरणा घेत कब्बडी खेळायला सुरवात करणाऱ्या अस्लम चे स्वप्न पोलिस दलात जाऊन कुटुंबाचं देशाच नाव मोठं करण्याचं होत. सोबत खेळाची आवड देखील होती.   घरी अठरा विश्व दारिद्र्य परिस्थीती बिकट. वडलांच्या अकाली जाण्याने आई वर घरची परिस्थिती पडली. लोकांची धुणीभांडी धुवून माऊलीने कुटुंबाचा सांभाळ केला.      बिकरी काम , लोकांच्या शेतातील कामे , मजुरी करत अस्लम ने खेळण्याची जिद्द कायम ठेवली. सराव करताना आलेल्या दुखापतीतून उभे राहत असलम इनामदार ने पुन्हा यशाला गवसणी घातली.     या सर्व यशात राजू कोठारे यांच्यासारखे असंख्य मित्र , मार्गदर्शक , गुरू भेटले ज्यांनी नेहमी मार्गदर्शन केले. देशासाठी खेळून देशाच , गावच आण महाराष्ट्राच नाव मोठं करायचंय...

टिपू सुलतान यांच्या तलवारीचा लिलाव तब्बल 143 कोटीला

इमेज
1782 ते 1799 दरम्यान टिपू सुलतानच्या कारकिर्दीतील शौर्याचे  प्रतीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोन्याचे कोफ्तगारी हिल्टेड स्टील तलवारीचा लिलाव लंडन मध्ये झाला. जी टिपू सुलतान यांच्या खाजगी दालनात सापडली होती.  लष्कराने मेजर जनरल डेव्हिड बेयर्ड याला हि तलवार सन्मान म्हणून दिली होती.      "ही नेत्रदीपक तलवार म्हैसूरचा वाघ असलेल्या टिपू सुलतानशी संबंधित असलेल्या सर्व शस्त्रांपैकी सर्वात मोठी होती  टिपू सुलतानच्या तलवारीचा लंडनमध्ये लिलाव झाला, ज्याचा लिलाव एक कोटी सात लाख अमेरिकन डॉलर्स (म्हणजे एक कोटी चार लाख ऐंशी हजार नऊशे ब्रिटिश पौंड) करण्यात आला.  ही तलवार जर्मन ब्लेडपासून तयार करण्यात आली होती. ती एका मुघल कारागिराने तयार केली होती. टिपू सुलतान ही तलवार सोबत ठेवत असे. 1799 मध्ये इंग्रजांनी त्यांना शहीद केले.   तलवारीच्या दोन्ही बाजूला सात वेळा या अल्लाह يا الله असे लिहिलेले असते, याशिवाय एका बाजूला अल्लाहच्या ९९ पैकी पाच नाव लिहिलेले असतात.  या नसीर = हे मदतनीस  या फत्तांह = जो विजय देतो  या ...

डोंगरी झोपडपट्टीत राहणारा हुसैन सय्यद ते IPS थक्क करणारा प्रवास......

इमेज
मुस्लिमांचे शासकीय नोकरीतील प्रमाण विदूषक प्रसारमाध्यमे मुंबईची डोंगरी म्हणाल की सर्व चित्र समोर येत. हुसेन सय्यद डोंगरी , मुंबई , महाराष्ट्र झोपडपट्टीतील मुलगा. फार गरीब परिस्थितीतून आलेला. घर एवढं की घरात पाय पसरून बसायला जागा नाही . आई वडील अशिक्षित , आयुष्यात कधी शिक्षणाचा गंध नसलेले. पण आपल्या पोराने शिकावे हि जिद्द मनाशी बाळगू  डॉकयार्ड वर हमालीचे काम करणारे कामगार. घरात अठराविश्र्व दारिद्र्य.  मुंबईच्या हज हाऊस मध्ये प्रशिक्षण घेणारा विदयार्थी. त्यालाही इतर मुलांबरोबर हज हाऊस सोडावे लागले. जफर सुलेमान IAS ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मध्ये इतर मुलांना मार्गदर्शन करण्याबरोबर स्वतःचा अभ्यास सुरु ठेवला. 2022 च्या UPSC च्या परिक्षेत AIR 570 घेऊन यशस्वी झाला आणि IPS पदाला गवसणी घातली.  अश्या परिस्थितीत कष्ट करून अपयशाने न खचाता पाचव्या प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली हे वाचा :-  मुस्लिमांचे शासकीय नोकरीतील प्रमाण विदूषक प्रसारमाध्यमे मराठी मुसलमान वॉट्सॲप ग्रूपसाठी खालील क्रमांकावर वॉट्सॲप SMS करा. 7249124871

बंधूंनो भविष्याचा वेध घ्या ! दगड लागतो म्हणून विट मारून घेऊ नका - मराठी मुसलमान

इमेज
सत्ता बदलली तरी मुस्लिमांच्या परिस्थितीत काही बदल घडणार आहे का ? द्वेषाची तीव्रता संघ प्रणित  भाजपा सत्तेत आल्यानंतर मुस्लिमांना दिसू लागली. ह्या द्वेषाच्या बीजाचा काटेरी वृक्ष आगोदर नव्हता का? गेल्या 70 वर्षात राजकीय चुली चे इंधन मुस्लीम समाज राहिला आहे.    उद्या समजा आत्ता सत्तेत असणारे पाय उतार झालेले उद्या सत्तेत आले तर मुस्लीम समाजाच्या परिस्थितीत काय बदल होणार आहे?     या प्रश्नावर दोन मिनिट थांबून थोड चिंतन करा. मुस्लीम समाजाला आर्थिक , सामजिक , शैक्षणिक दृष्टीने  खच्चिकरण करणारे जे शासन प्रायोजित उघड करत होते ते छुप्या पद्धतीने करतील किंवा पुरोगामित्वाचा समाजसुधारणेच्या आडून नेहमी नुकसान करत राहतील.    काय मुस्लीम समाजाच्या अर्थिक सामजिक सुधारण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न केला जाईल?   मुस्लीम समाज नेहमी भावनिक राजकारणाला बळी पडत गेला आहे. आज जो सत्ता संघर्ष दिसतो त्याला तुमच्या प्रश्नाला काहीही देणंघेणं नाही.  आज तुमच्याकडे पाहताना तुम्हाला हक्क अधिकार किंवा वाटा देण्याची भूमिका आहे का ? कि तुमच्याकडे भा...

ज्याच्या नावाने जागतिक कुस्ती दिवस आज पाळला जातो तो इमाम बख्श ( गामा पैलवान ) हिंदू मुस्लीम ऐक्याच उदाहरण...

इमेज
🕛 22 मे 1878   गामा पहलवान: जगातील सर्वात मोठा कुस्तीपटू ज्याला लोक हिंदू-मुस्लिम बंधुत्वासाठीही लक्षात ठेवतील .किंवा 80 च्या दशकापर्यंत जन्मलेल्या मुलांवर  समाजवादाचा परिणाम झाला  होता .  प्रत्येक वादात काही प्रश्न फिरत असत.  उदाहरणार्थ, भारत आणि पाकिस्तान यांच्यात भांडण होत असेल तर कोणते देश आपले समर्थन करतील?  प्रथम युएसएसआर म्हणजेच सोव्हिएत युनियनचे नाव आले.  ही संघटना आता तुटली.  आणखी एक प्रश्न असा होता की दारा सिंह आणि मोहम्मद अली यांच्यात लढत झाली तर कोण जिंकेल?  'भाऊ साहेब दारा सिंगने एकदा त्याला पकडले, मंग खेळ संपलाच .' असे उत्तर सापडले असते.  असाच एक प्रश्न असायचा की, ‘किंग कॉंग आणि गामा यांच्यात भांडण असेल तर कोण जिंकेल?’ प्रत्येकाचे एकच उत्तर होते- गामा पहिलवान.  त्यावेळी किंग कॉंग ही केवळ एक कल्पनारम्य गोष्ट आहे हे फारच थोड्या मुलांना ठाऊक होते.  .  फक्त ऐकले आणि पूर्णपणे कल्पनाशक्तीच्या मदतीने गामाचे नाव आमच्या मनावर अधिराज्य गाजवित असे.  अजून एक गोष्ट, गामा हिंदू आहे की मुस्लिम हे कोणा...

मराठी मुसलमान टिमची उद्दिष्ट्ये

इमेज
मराठी हि महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाची व्यवहाराची भाषा आहे. लोकांपर्यंत आपण या भाषेद्वारे सहज पोहचू शकतो.मराठी मुसलमान एक सोशल मिडीया टिम म्हणून कार्य करते.समाजासाठी कार्य करणाऱ्या लोकांची मोट बांधण्याचं तसेच देशाचं संविधान, राष्ट्रप्रतीके यांच्याबाबत अभिमान बाळगून देशसेवेसाठी समर्पित समूह निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.  मराठी मुसलमान सोशल मीडिया टिमची उद्दिष्टे 🌺मुस्लिम समाजात असंख्य चांगली कामे केली जातात. अनेक स्वयंसेवी संस्था, NGO आहेत. मुस्लिम समाजात अनेक लेखक,कवी आहेत. आपापल्या क्षेत्रात ठसा उमटवणारे शिक्षक, विद्यार्थी, शिक्षक, इंजिनियर आहेत. अनेक सुशिक्षित लोक आहेत त्यांचे कार्य अनमोल आहे. त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचं काम मराठी मुसलमान टिम करते.  🌺आज मुस्लिम समाजाची कोणतीही वृत्तसंस्था नाही. कोणतीही प्रसारमाध्यमे नाहीत. मराठी भाषिकांपर्यत मुस्लिम समाजाचं मन पोहचवणारी कोणतीही व्यवस्था नाही कोणत्याही स्थानिक भाषेतील वृत्तसंस्था त्या पोहचवण्याचं काम करत नाहीत.ते पोहचवण्याचं काम आम्ही करत असतो.  🌺मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नावर देखील आम्ही आवाज ...

एक जैन युवक जेव्हा म्हणतो माझा रोजा आहे तेव्हा द्वेषातून समाज घडवणरी प्रसारमाध्यमे हरल्याची भावना निर्माण होते.

इमेज
आमच्या गावातील एक तरूण प्रगतीशील शेतकरी, समाजकारणातलं एक परखड व्यक्तीमत्व आणि कोणाच्याही मदतीला वेळकाळ न पाहता जाणारे आमचे तरुण मित्र श्री. अनिल पाटील उर्फ गुंडू याची आज सकाळी एका कामानिमित्त जैनपुर ग्रामपंचायत कार्यालयात भेट झाली.     शक्यतो मी माझ्या वॅालवरती पोस्ट करताना अथवा कोणालाही कमेंट करताना जातीचा उल्लेख टाळत असतो पण आज उल्लेख करणं मला उचित वाटतय म्हणून मी तो करतोय.    या माणसाला ना तंबाखूचे व्यसन आहे ना पानसुपारीचे …!!! गुटखा, मावा, सुगंधी सुपारी यापासून कोसो दूर असणारा गुंडू !! आज बाकी तोंडात लाळ साचवायचा, बाहेर जावून थुंकून यायचा ते मला काही कळेना. दोन तीन वेळा तो बोलता बोलता तोंडात लाळ साचवून बाहेर जावून थुंकूनही आला. न राहवून मी त्याला विचारले की… तोंडात काही जखम वगैरे झाली आहे का ? की मग तंबाखूची गुळणी लावायला सुरवात झाली आहे. तसा हसून बाहेर जावून तो थुंकून आला आणि बोलला की ‘दादा मी रोजा करतोय…’ आणि तो करत असताना थुंकी गिळणे देखील पाप असते. जैन समाजाचा तरूण युवक जेव्हा हे बोलत होता तेव्हा सध्या विद्वेष, जातीयता,धर्मांधतेचा राजकीय भांडवल ,प...

भगतसिंगाना देण्यात येणारी फाशीची शिक्षा अन्यायकारक आहे म्हणत आपल्या न्यायमूर्ती पदाचा राजीनामा देणारे न्यायमूर्ती हैदर आगा !

इमेज
फखर-ए-सहारनपूर-फखर-ए-हिंदुस्थान  न्यायमूर्ती आगा हैदर 8 एप्रिल 1929 रोजी शहीद भगतसिंग यांनी त्यांच्या साथीदारांसह विधानसभेच्या सभागृहात बॉम्ब फेकून स्वातंत्र्याचा नारा बुलंद करण्यासाठी 'इन्कलाब झिंदाबाद'चा नारा दिला!  या सर्वांना लाहोर कट खटला (१९२९-१९३०) म्हणून ओळखल्या जाणार्‍या खटल्यात विशेष न्यायाधिकरणाने अटक केली आणि खटला चालवला.   सहारनपूरचे रहिवासी न्यायमूर्ती आगा हैदर हे न्यायाधिकरणाचे एकमेव भारतीय सदस्य होते, तर बाकीचे इंग्रज होते.  न्यायाधिकरणाने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना ७ ऑक्टोबर १९३० रोजी फाशीची शिक्षा सुनावली.  न्यायमूर्ती आगा हैदर यांना ब्रिटीश सरकारच्या या निर्णयावर स्वाक्षरी करण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी नकार दिला आणि 'नाही' असे ठामपणे सांगितले कारण हा निर्णय अन्यायकारक आणि एकतर्फी होता.  इंग्रजांच्या दबावामुळे न्यायमूर्ती आगा हैदर यांनी या अन्यायाचा भाग न घेता राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी न्यायमूर्तीपदाचा राजीनामा दिला. नंतर, न्यायाधीश शादी लाल यांच्याकडून फाशीच्या शिक्ष...

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू नदाफ यांच्याविषयी माहिती आहे का?

इमेज
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील तासगाव तालुक्यातील मणेराजुरी येथील ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू हसन नदाफ (वय 103 वर्षे) यांचे नुकतेच  उपचारादरम्यान निधन झाले.     क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, क्रांती अग्रणी जी. डी. बापू लाड, कॅप्टन रामचंद्र लाड, माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील, बर्डे गुरुजी यांच्या सोबत सांगली जिल्ह्यात क्रांतिकारकांची फौज उभी राहिली. त्या  तुफान सेनेतील एक क्रांतिकारक म्हणजे बाबू हसन नदाफ. तासगाव तालुक्यातील मणेराजुरी गावातील एका सामान्य मुस्लिम कुटुंबातील जन्माला आलेले ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी बाबू नदाफ हे गांधीजी आणि क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या विचाराने भारावून जाऊन स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाले होते. भूमिगत होऊन तारा तोडणे, पोस्ट जाळणे, रेल्वे रूळ उखडणे, रेल्वे लुटणे अशा धाडसी पणाने  इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र  चळवळीत मोठा सहभाग घेतला. त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्यावर अटक वॉरंट काढले. ते सापडत नाहीत म्हटल्यावर पकडून किंवा पत्ता सांगणाऱ्यास बक्षीस ही ठेवले.   ...

जेव्हा एका अट्टल गुन्हेगाराचे शब्द इमाम अहमद इब्न हनबल(रजि. ) यांच्यासाठी प्रेरणादायी ठरले.

इमेज
 इमाम अहमद इब्न हनबल (अल्लाह त्याच्यावर दया) यांचा काळ हा मोठ्या परीक्षांचा काळ होता.  तो काळ आपल्यासारखा नव्हता जेव्हा इस्लामच्या मूळ श्रद्धांना आव्हान दिले जात म्हणजे ज्या श्रद्धा, परंपरा ज्यांना काही आधार नव्हता त्या गोष्टी  इस्लाममध्ये  स्वीकारण्यास सांगितले जात होते.  खुद्द खलिफा, अल मामुन या विचारसरणीने प्रभावित झाला आणि सर्व मुस्लिमांवर या चुकीच्या समजुती लागू करण्याचा निर्णय घेतला.  उम्माचे नैसर्गिक नेते असलेल्या उलेमांना प्रथम लक्ष्य करण्यात आले.  एक एक करून त्यांच्याशी वाद घालण्यासाठी पुढे आणले गेले.  ज्यांनी या चुकीच्या समजुती स्वीकारण्यास नकार दिला त्यांना तुरुंगात टाकण्यात आले आणि छळ करण्यात आला.  काही या तीव्र दबावाखाली वाकले तर काहींनी खलिफा आणि दिशाभूलांना शांत करण्यासाठी दबावाखाली खोटे बोलण्याचे तत्व वापरले.  चौकशीसाठी पुढे आणलेले शेवटचे विद्वान इमाम अहमद होते.  वादविवाद तीव्र होते आणि जेव्हा इतर सर्व इमाम अहमदवर विजय मिळवू शकले नाहीत तेव्हा त्याला तुरुंगात पाठवण्यात आले.  अल मामुनच्या मृत्यूनंतर, त...

एक स्वातंत्र्यसैनिक ज्यांनी आपले निम्मे कुटुंब पाकिस्तानात राहिलेले असताना त्यांना सोडून भारतात राहिले आणि येथील भूमीतच दफन झाले.

इमेज
लाल किल्ल्यावर पहिला तिरंगा फडकवणारे आझाद हिंद फौजेचे क्रांतिकारक जनरल शाहनवाज खान यांचे आजच्या दिवशी ९ डिसेंबर १९८३ रोजी निधन झाले.  १९४३ मध्ये ते सुभाषचंद्र भोष  यांच्या आझाद हिंद फौजेत सामील झाले, ज्यामुळे त्यांना ब्रिटीशांनी अटक केली आणि देशद्रोहाचा खटला चालवला आणि लाल किल्ल्यावर कोर्ट मार्शल करून तुरुंगात टाकले.  देश स्वतंत्र झाला तेव्हा शाहनवाज खान यांनीच दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून ब्रिटिश ध्वज उतरवून तिरंगा फडकवला होता.  शाहनवाज खान यांनी  प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या आईला दत्तक घेतले होते, त्यांचे कुटुंब रावळपिंडीत होते, त्यामुळे फाळणीनंतर त्यांचे अर्धे कुटुंब तेथेच राहिले, परंतु शाहनवाज खान यांनी त्यांचे कुटुंब सोडून भारतात राहणे पसंत केले, त्यांच्यासोबत एक मुलगा होता. आणि शेवटच्या श्वासापर्यंत ते याच मातीत दफन झाले, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना जामा मशिदीजवळील कब्रस्तानमध्ये दफन करण्यात आले. मराठी मुसलमान वॉट्सअप ग्रुप मध्ये ADD होण्यासाठी खालील निळ्या अक्षरावर क्लिक करा.  7249124871   मराठी मुसलमान

स्वातंत्र्यसैनिक मियाँ मोहम्मद जान मोहम्मद चोटानी ज्यांनी काँग्रेस आणि खिलाफत चळवळीला खूप मदत केली.

इमेज
स्वातंत्र्यसैनिक  मियाँ मोहम्मद जान मोहम्मद चोटानी ज्यांनी काँग्रेस आणि खिलाफत चळवळीला खूप मदत केली.    मियां मोहम्मद जान मोहम्मद छोटानी हे मुंबईतील प्रसिद्ध व्यापारी आणि खिलाफत नेते होते.  10 नोव्हेंबर 1873 रोजी जन्मलेले ते मेमन समाजाचे होते.  त्यांचे कुटुंब अतिशय धार्मिक होते आणि म्हणूनच ते धार्मिक वातावरणात वाढले.  शिक्षण झाल्यावर आधी घरी आणि नंतर शहरातील नामवंत शाळेतून  ते व्यवसायात रमले.  लवकरच ते  एक समृद्ध व्यापारी बनले.सुधारणांचा आराखडा तयार करण्यासाठी ते समितीचे सदस्यही झाले.  मियां मोहम्मद जान मोहम्मद चोटानी यांनी राष्ट्रीय आणि मुस्लिम समस्यांमध्ये रस घेण्यास सुरुवात केली आणि 19 मार्च 1899 रोजी नागपाडा येथे बॉम्बे मुस्लिमांच्या सामूहिक सभेचे अध्यक्षस्थान केले.  सभेला संबोधित करताना वीस हजारांहून अधिक लोक उपस्थित होते, असा अंदाज आहे.  याच सभेत खिलाफत मुद्द्यावर ठराव मंजूर केले आणि खिलाफत समितीच्या स्थापनेलाही अधिकृत केले गेले.  त्यांची प्रांतीय खिलाफत समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली जी नंतर...

टिपू सुलतान आम्हाला तूजा प्रचंड अभिमान आहे... !

इमेज
टिपू सुलतान त्या मोजक्या राज्यकर्त्यांमधून आहे जो इंग्रजांसमोर एक शूर योद्धा म्हणून उभा राहीला,निडरतेने इंग्रजांविरुद्ध लढला आणि लढता लढता शहीद झाला!   टिपू सुलतानला आज ब्राह्मणवाद्यांकडून,आरएसएसकडून आणि भाजपाकडून विरोध होण्याचं कारण इतकंच आहे की सगळ्यात अगोदर इंग्रज आपल्या भूमीसाठी वाईट आहेत,त्याचं इथे राज्य निर्माण होणे हे आपल्या सगळ्यांसाठीच व आपल्या भूमीसाठी अहितकारक आहे.सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांच्याविरुद्ध लढत पाहिजे. ईस्ट इंडिया कंपनीच वाढणं धोकादायक आहे आणि त्यासाठी टिपूने स्वतःहा पुढाकार घेऊन मराठ्यांना व निजामला पत्रव्यवहार करून हे सांगितल.टिपूने स्वतःहा इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध केले,इंग्रजांच्या नाकी नऊ आणले.भूमीसाठी अन्यायाविरुद्ध लढता लढता रणांगणात शहीद झाला मात्र माघार घेतली नाही,इंग्रजांसमोर झुकला नाही! टिपू सुलतान म्हणजे एक आदर्श प्रजाहितवादी,प्रचंड दूरदृष्टी असणारा राज्यकर्ता होता.शेतकऱ्यांसाठी त्या काळी नवनवीन व शेतकरी हिताचे धोरण त्याने त्याच्या राज्यात राबवले.अस्पृश्यते विरुद्ध लढला,जातीधर्माच्या नावाने कधी भेद केला नाही.मंदिरांना देणग्या तो द्यायच...

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री...अब्दुल गफूर

इमेज
स्वातंत्र्यानंतर बिहारमध्ये बरेच मुख्यमंत्री झाले आहेत.  परंतु आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की स्वातंत्र्यानंतर बिहारमध्ये फक्त एकच मुस्लिम मुख्यमंत्री झाले .अब्दुल गफूर यांच्या नावाने आपण ज्यांना ओळखतो. तेव्हापासून कोणताही  मुस्लिम समुदायाचा नेता बिहारमध्ये  मुख्यमंत्रिपदी पोहोचला नाही, बिहारमधील मुस्लिम समुदायाकडे मोठा समुदाय आहे जो बिहारमधील सर्वात मोठा मतदार गट आहे.    तथापि, अब्दुल गफूर मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांनाही केवळ 2 वर्षे मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी देण्यात आली.  ते 2 जुलै 1973 ते 11 एप्रिल 1975 पर्यंत बिहारचे मुख्यमंत्री होते.  1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एका षडयंत्रांतर्गत त्यांना मुख्यमंत्रीपदावरून काढून टाकले आणि जगन्नाथ मिश्रा यांना मुख्यमंत्री केले.     अब्दुल गफूर केदार पांडे आणि जगन्नाथ मिश्रा यांच्या संघर्षात दबले गेले परंतु त्यांनी हार मानला नाही.      1984 मध्ये ते सिवान येथून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून खासदार झाले. 1984 च्या राजीव गांधी सरकारमध्ये ते नगरविकास मंत्री देखील झाले...

बोधेगावच्या लग्नमंडपात मामा बनून पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.

इमेज
भारत हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे.  एखादा सलीम दाढी टोपी सहित ज्यावेळी एखाद्या मित्राच्या लग्नांत अक्षदा वाटताना किंवा पंगतीला आग्रहाने जेवण वाढताना दिसतो तर कधी एखादा राम अब्दुलच्या इथे त्याच्या वृद्ध आई  वडलांना मदत करताना दिसतो.  बोधेगाव जिल्हा अहमदनगर येथील भुसारे परिवारातील दोन मुलींच्या लग्नात मामाचे विधी बाबा भाई पठाण यांच्या हस्ते संपन्न झाले.आई दरवर्षी बाबा भाई ना राखी बांधते कारण तिला सख्खा भाऊ नाही.भावाची व मामाची भुमिका बाबा भाई पठाण यांनी बजावली. हेच बाबाभाई गावच्या विविध धार्मिक कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवत असतात गेल्या वर्षी गावातील सप्ताहाला देणगी देतानाचा त्याचा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला होता.  बाबाभाई पाच वेळेचे  नमाजी असून एक ईश्वरवादी एका अल्लाहला मानणारे आहेत. परिसरातील बहुसंख्य जण बाबाभाईच्या अस्थेचा आणि धार्मिक प्रथाचा आदर करतात तर इतरही धर्मातील आस्था याचा बाबाभाई आदर करतात.  बाबाभाई आणि बोधेगाव मधील हाच बंधुभाव भारतात पाहण्यासाठी मिळतो जो इतर कुठेही पाहायला मिळत नाही.  काही राजकीय आणि धार्मिक द्वेषाच्या बुद्धीने वावर...

चळवळीतून आलेले मुस्लिम युवक 'चारा' असतील पण 'मुस्लिमांचे नेतृत्व' म्हणून समोर आणणार नाहीत.

इमेज
कन्हैया कुमार, उमर खालिद, शेहला रशीद हे तिघेही विद्यार्थी आंदोलनातून पुढे आलेले. देशद्रोही नारे दिल्याच्या कथित नारे दिल्याच्या  आरोपातून ज्याचा न्यायालयात एकही पुरावा दिला गेला नाही जे नंतर न्यायालयाने फर्जी ठरवेल  त्यात चर्चित आलेले.   यांचाच एक सहकारी नजीब गायब आहे त्यांच्यासोबत नक्की काय झालं याबाबत काही माहीत नाही?  जिग्नेश मेवानीला दलित आंदोलनाचा चेहरा म्हणून काँग्रेस सोबत घेईल. भूमिहार असलेले कन्हैया कुमार उत्कृष्ट भाषणाद्वारे बिहारच्या राजकारणात यादव राजकारणास शह देण्याचा प्रयत्न करतील व यादवांकडे जाणारी मुस्लिम मते स्वतःच्या पदरात पाडुन घेतील. महाराष्ट्र आणि बिहारच राजकारण वेगळं आहे हे सांगावयास नको.    विद्यार्थी आंदोलन, शाहीन बाग आंदोलन यातून पुढे आलेले मीरान हैदर,खालिद सैफी, अतहर खान , गुलीफशा फातिमा , शरजील ईमाम,शरजील उस्मानी यांसारखे मुस्लिम समाजाच्या प्रश्नावर आंदोलन उभे करणारे, मुस्लिम समाजात तळमळीने काम करणारे युवक आज तुरुंगात आहेत.    काँग्रेस इम्रान प्रतापगडी सारखे उर्दू शेरोशायरी करणारे चट्टे-बट्टे मुस्लिम नेते म्हण...

सणांचे समाज जीवनातील महत्व

इमेज
सणांचे समाज जीवनातील महत्व सण-उत्सव समाज जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. सामाजिक जीवनाची जाणीव मानवामध्ये निर्माण झाली तेव्हापासून सणांचे अस्तित्व आहे. कधीच कोणताच सण साजरा न करणारा एकही समुदाय जगात झाला नाही आणि होणारही नाही. लोकांचे समान विचाराने, समान उद्देशाने, एका ठिकाणी एकत्र येणे, एकत्र येऊन आनंदोत्सव साजरा करणे, एकाच पद्धतीने कसलाही विरोध न करता काही नियमांचे पालन करणे; यातून समाजाचे संघटीकरण घडते. विविध कारणांमुळे दूर राहणारे एकमेकांच्या जवळ येतात. यामुळे परस्पर संबंध दृढ करण्याची संधी उपलब्ध होते. तसेच सणांद्वारे समाज मनावर काही विशिष्ठ उद्देश आणि भावना बिंबविता येतात. सणांना दरवर्षी एका निश्चित तारखेला साजरे करण्यामागे हेच उद्देश कार्यरत असतात. समाजाला सण-उत्सवांची नितांत गरज आहे. त्याशिवाय समाज संघटीत राहू शकत नाही, विखुरला जातो. म्हणूनच आजच्या आधुनिकीकरणाच्या काळात सण-उत्सवांच्या प्रती सामाजिक ओढ आणखीन तीव्र झाली आहे. नवनवीन सण-उत्सव निर्माण केले जात आहेत, आयात केले जात आहेत आणि साजरे केले जात आहेत. विद्यार्थ्यांचे वार्षिक समारंभ असोत की एखाद्या व्यावसायिक फर्मचा वर...

शाहिद आझमी व्यवस्थेने दोषी ठरवलेल्या घटकांसाठी लढणारा वकील

इमेज
3 डिसेंबर वकील दिवस  या दिवशी शाहिद आझमी यांच्या बद्दल ही पोस्ट.. नक्की वाचा !!🙏✍️ शाहिद आझमी यांचा जन्म मुंबईतील एका मुस्लिम कुटुंबात झाला होता ते मूळ रूपाने आजमगढ,उत्तर प्रदेश येथील रहिवासी होते..ते त्यांच्या ५ भावांपैकी ३ ऱ्या क्रमांकाचे होते त्यांचे वडील शाहिद च्या लहानपणीच वारले होते,शाहिद आणि त्यांचे भावंड त्यांच्या आईसोबत राहत होते.शाहिद जेव्हा १४ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्यावर १९९२ च्या दंग्यात हिंसा करण्याच्या आरोपा खाली त्यांना गोवंडी येथील पोलिसांनी अटक केली पण त्यांच्या विरुद्ध काही पुरावे नसल्यामुळे त्यांना सोडण्यात आले होते ..ते समाजातील द्वेष आणि जातीयवाद पाहून थोड्या काळासाठी POK मधील लढाऊ प्रशिक्षण शिबीरामध्ये शामिल झाले पण तेथे पाहिलेल्या अतिरेकीपणामुळे ते लवकरच परत आले.. १९९४ मध्ये त्यांच्यावर काही हिंदू-नेत्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप लावून त्यांना (TADA )च्या अंतर्गत अटक करण्यात आली..त्यांच्यावर निर्दयपणे छळ करण्यात आला व कधीही न केलेल्या गुन्ह्याची कबुली देण्यास त्यांना भाग पाडले व त्यामुळे त्यांना ५ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली व त्यांना दि...

दापोलीच्या सुलतानचे इंग्लडमधील स्टाफोर्डशायर विद्यापीठात नेत्रदिपक यश !

इमेज
मुस्लिम समाजातील युवकांना कधी 'पंचरवाला अब्दुल', 'भंगारवाला' 'चिकनवाला' हि विशेषण कुत्सितपणे लावली जात असताना असताना इस्लामच्या शिकवणुकीप्रमाणे 'इक्रा' आत्मसात करणारे युवक आपल्याला बहुताली पाहायला मिळतील.    पैगंबर(स.अ) यांनी आपल्या साहबांना तुम्ही ज्ञान मिळवण्यासाठी चीन पर्यत जावे लागले तरी जावा असा उपदेश केला होता.  दापोलीतील इलेक्ट्रीकल्सचा व्यवसाय करणारे  शौकत काज़ी यांच्यासाठी अभिमानाचा दिवस होता कारण त्यांचे  चिरंजीव सुलतान शौकत काज़ी यांचा  लोगो  स्टाफोर्डशायर विद्यापिठाच्या  वेबसाईटवर प्रकाशित झाला होता. त्यांच्यासाठी  ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. सुलतान शौकत काझी याने  शैक्षणिक क्षेत्रात इंग्लंडमध्ये  भारताचं नाव मोठं केलं आहे. स्टाफोर्डशायर विद्यापीठामध्ये सन २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या मास्टर ऑफ सॉफ्टवेअर अभियांत्रिकी विभागामध्ये सुलतान प्रथम आला आहे. त्यानं आपल्या भरीव कामगिरीच्या जोरावर इंग्लंड मधील कट दि मर्स्टड या नामांकित सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या कंपनीत मोठया पगाराची नोकरी मिळवली आहे. त्यानं आपल्या या कर्तृत्...

गांधीजींच्या अहिंसक आंदोलनास मदत करणाऱ्या लोकांप्रमाणे नेताजींच्या आंदोलनास मदत करणारे देखील मुस्लिम होते.

इमेज
गुजराती उद्योजकांनी महात्मा गांधींच्या अहिंसक स्वातंत्र्यलढ्यासाठी उदारपणे दान केले त्याचप्रमाणे  नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भारतीय राष्ट्रीय सैन्यात मदत करणारे असे काही लोक होते. मेहरा अब्दुल हबीब युसूफ मारफानी, सौराष्ट्राच्या धोराजी शहरातील एका व्यावसायिकाने त्यांच्या जवळजवळ संपूर्ण कोटी 1 लाख रुपयांची देणगी भारतीय राष्ट्रीय सैन्यदलाला दिली होती. मेमन कुटुंब रंगून येथे स्थायिक होते. जुलै, १ रोजी, नेताजींनी रंगून येथे आयएनए ची स्थापना केली तेव्हा आझाद हिंद बँकेत आर्थिक सहाय्य करण्यासाठी मारफानी पहिले होते.  इतिहासकार युनूस चितळवाला म्हणतात की पहिल्या दानदात्यांपैकी मार्फानी होते आणि नेताजींनी त्यांना सेवक-ए-हिंद पदक देऊन कृतज्ञता व्यक्त केली. हा पुरस्कार प्राप्त करणारा तो पहिलाच होता. वेगवेगळ्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये मार्फानीच्या दातृत्वाचे दस्तऐवजीकरण केले गेले आहे. इतिहासकार राज माल कासलीवाल यांनी त्यांच्या ‘नेताजी, आझाद हिंद फौज अँड आफ्टर’ या पुस्तकात म्हटले आहे की, “रंगूनच्या एका मुस्लिम बार्मी व्यवसायाने कोट्यवधी रुपये रोख व दागदागिने दान केले आणि स्वा...

मुस्लिम आरक्षणाच गांभीर्य समाजातील प्रत्येक घटकापर्यत निर्माण झालं पाहिजे.

इमेज
मराठी मुसलमान फेसबुक पेजवरील प्रतिक्रिया पाहण्यासाठी   मे 2008 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी महाराष्ट्रातील मुस्लिमांच्या सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर डॉ.महमूद उर रहेमान यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय अभ्यास गट गठित केला होता. डॉ.महमूद उर रहेमान आणि बाकी सहा सदस्यांनी मिळून पुढील पाच वर्षे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन,त्यांच्या सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक समस्यांवर अतिशय अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून 21 ऑक्टोबर 2013 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सादर केला. त्या अहवालात मुस्लिम समाजातील मागासलेपणा दूर करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महत्वाच्या अश्या 40 शिफारशी सुचवल्या.त्यामध्ये सगळ्यात पहिली शिफारस आहे, महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाला राज्याच्या शासकीय नोकऱ्यात व शैक्षणिक संस्थांमध्ये 8 टक्के आरक्षण देण्याची. अभ्यास गटाचा अहवाल सादर केल्यानंतर डॉ.महमूद उर रहेमान ऐका ठिकाणी बोलताना म्हणाले होते... "मी माझं काम केलं आहे.आता जर शासनाला खरोखरच मुस्लिमांचा विकास करण्याची ईच्छा असेल तर आम्ही सुचवल्या शिफ...

मुस्लिम आरक्षण पुर्ण समाजाची गांभीर्याची आणि नियोजनबद्ध लढाई आहे -इरफान शेख

इमेज
मराठी मुसलमान वॉट्सअप क्रमांक 7249124871 मुस्लिम आरक्षण हा अतिशय गंभीर विषय आहे. ही गोष्ट विशेष करून आम्ही मुस्लिम तरुणांनी लक्षात घेतली पाहिजे. कारण मुस्लिम आरक्षण हा विषय जितका गंभीर आहे त्याच्याविषयी तितकं गांभीर्य आमच्यात निर्माण झालं पाहिजे. एखाद्या गोष्टीला तेंव्हाच पूर्ण न्याय आपल्याकडून मिळतो जेंव्हा त्या गोष्टीविषयीच पूर्ण गांभीर्य आपल्यात असत. मी अतिशय जबाबदारीने हे सांगतो की अजूनही मोठ्या प्रमाणात मुस्लिम आरक्षणाच्या गांभीर्याची उणीव आहे.ती उणीव आम्हा तरुणांना भरून काढावी लागेल. कारण पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरल्यावर संघर्षात खऱ्या अर्थाने ताकद निर्माण होते.आणि तीच ताकद असते जी बदल घडवण्याची धमक ठेवते! ही पूर्ण समाजाची सर्वसमावेशक आणि नियोजनबद्ध लढाई आहे.ही लढाई समाजाची आहे याला राजकीय म्हणून त्या लढाईला दिशाहीन आणि एखाद्या राजकीय पक्षाच्या हाताच खेळणं किंवा इव्हेंटच साधन ठरवलं जाऊ शकत नाही.आणि ही लढाई राजकीय आहे तर आजपर्यंत मुस्लिम समाजाने कुठल्या पक्षाला लढण्यास अडवलं? का नाही एखाद्या पक्षाने खऱ्या अर्थाने आणि पूर्ण पक्षीय बळ लावून मुस्लिम आरक्षण मिळवून देण्यास...

संस्कृत भाषा क्षेत्रातील अनमोल हिरा...पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार

इमेज
अक्कलकोटचे पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार हे पवित्र   रमजान  महिन्यात  पैगंबरवासी झाले. रमजान च्या अगोदरच्या  महिन्यापासून ते अस्वस्थ होते. .मृत्यूसमयी   ते ८७ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा बदिउज्जमा बिराजदार असून ते नावाजलेले गझलकार साबीर शोलापुरी या नावाने प्रसिद्ध आहेत. दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे...  बिराजदार हे मूळचे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील आहेत. सोलापुरातील महानगर पालिकेच्या संस्कृत शाळेत त्यांचे शिक्षण झाले. पुढे त्यांनी वेदांचा अभ्यास केला आणि त्यांत प्रावीण्य मिळवले...बिराजदार यांनी मुसलमानांचा कुराण-शरीफ हा पवित्र ग्रंथ संस्कृतमध्ये भाषांतरित केला आहे. या ग्रंथात एकूण ६०० पाने आहेत.... पाठ्यपुस्तक महामंडळाने इयत्ता नववी,दहावी साठी संस्कृतचा नवीन  अभ्यासक्रम तयार करायची जवाबदारी दिली होती. वयाच्या ८७ व्या वर्षी देखील रात्र रात्र जागून ती जबाबदारी पार पाडली होती...प्रसिद्ध मराठी गझलकार बदिउज्जमा बिराजदार हे त्यांचे सुपुत्र. अनेक आठवणी आहेत.दस्तगीर यांच्या तीनही मुलांची आणि नातीच्या लग्नाची पत्रिका सं...