भगतसिंगाना देण्यात येणारी फाशीची शिक्षा अन्यायकारक आहे म्हणत आपल्या न्यायमूर्ती पदाचा राजीनामा देणारे न्यायमूर्ती हैदर आगा !

फखर-ए-सहारनपूर-फखर-ए-हिंदुस्थान
 न्यायमूर्ती आगा हैदर

8 एप्रिल 1929 रोजी शहीद भगतसिंग यांनी त्यांच्या साथीदारांसह विधानसभेच्या सभागृहात बॉम्ब फेकून स्वातंत्र्याचा नारा बुलंद करण्यासाठी 'इन्कलाब झिंदाबाद'चा नारा दिला!  या सर्वांना लाहोर कट खटला (१९२९-१९३०) म्हणून ओळखल्या जाणार्‍या खटल्यात विशेष न्यायाधिकरणाने अटक केली आणि खटला चालवला.  
सहारनपूरचे रहिवासी न्यायमूर्ती आगा हैदर हे न्यायाधिकरणाचे एकमेव भारतीय सदस्य होते, तर बाकीचे इंग्रज होते.  न्यायाधिकरणाने भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना ७ ऑक्टोबर १९३० रोजी फाशीची शिक्षा सुनावली.  न्यायमूर्ती आगा हैदर यांना ब्रिटीश सरकारच्या या निर्णयावर स्वाक्षरी करण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी नकार दिला आणि 'नाही' असे ठामपणे सांगितले कारण हा निर्णय अन्यायकारक आणि एकतर्फी होता.  इंग्रजांच्या दबावामुळे न्यायमूर्ती आगा हैदर यांनी या अन्यायाचा भाग न घेता राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी न्यायमूर्तीपदाचा राजीनामा दिला.
नंतर, न्यायाधीश शादी लाल यांच्याकडून फाशीच्या शिक्षेवर स्वाक्षरी करून ब्रिटिशांनी २३ मार्च १९३१ ला लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी दिली.  ब्रिटिशांच्या या कृपेसाठी  शादीलाल यांना 'सर' ही पदवी आणि मोठी संपत्ती मिळाली.  आज शामली उत्तरप्रदेश मध्ये जी  शुगर मिल आणि पिलखनी डिस्टिलरी हे ब्रिटिशांनी दिलेल्या या मालमत्तेचे भाग आहेत. आज त्याचे वारस मुस्लिमांच्या देशप्रेमावर संशय घेत आहेत ज्यांनी इंग्रजांच्या कृपेने -पेंशन घेऊन आयुष्य व्यतीत केले. 
 
भारताच्या सच्चा सैनिक आणि स्वातंत्र्याचा अज्ञात नायक, सहारनपूरचे  आदरणीय न्यायमूर्ती आगा हैदर यांना स्मृतिदिनानिमित्त सलाम करतो.🤲🤲🤲




🇮🇳जय हिंद !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...