चळवळीतून आलेले मुस्लिम युवक 'चारा' असतील पण 'मुस्लिमांचे नेतृत्व' म्हणून समोर आणणार नाहीत.

कन्हैया कुमार, उमर खालिद, शेहला रशीद हे तिघेही विद्यार्थी आंदोलनातून पुढे आलेले. देशद्रोही नारे दिल्याच्या कथित नारे दिल्याच्या  आरोपातून ज्याचा न्यायालयात एकही पुरावा दिला गेला नाही जे नंतर न्यायालयाने फर्जी ठरवेल  त्यात चर्चित आलेले.
  यांचाच एक सहकारी नजीब गायब आहे त्यांच्यासोबत नक्की काय झालं याबाबत काही माहीत नाही? 
जिग्नेश मेवानीला दलित आंदोलनाचा चेहरा म्हणून काँग्रेस सोबत घेईल. भूमिहार असलेले कन्हैया कुमार उत्कृष्ट भाषणाद्वारे बिहारच्या राजकारणात यादव राजकारणास शह देण्याचा प्रयत्न करतील व यादवांकडे जाणारी मुस्लिम मते स्वतःच्या पदरात पाडुन घेतील. महाराष्ट्र आणि बिहारच राजकारण वेगळं आहे हे सांगावयास नको. 
  विद्यार्थी आंदोलन, शाहीन बाग आंदोलन यातून पुढे आलेले मीरान हैदर,खालिद सैफी, अतहर खान , गुलीफशा फातिमा , शरजील ईमाम,शरजील उस्मानी यांसारखे मुस्लिम समाजाच्या प्रश्नावर आंदोलन उभे करणारे, मुस्लिम समाजात तळमळीने काम करणारे युवक आज तुरुंगात आहेत. 
  काँग्रेस इम्रान प्रतापगडी सारखे उर्दू शेरोशायरी करणारे चट्टे-बट्टे मुस्लिम नेते म्हणून समोर आणतील पण आंदोलनातून पुढे आलेले युवक नेतृत्व म्हणून स्वीकारू शकणार नाहीत. मुस्लिम देखील संघ-भाजपाला नुसत्या शिव्या देणाऱ्या पण मुस्लिमांच्यासाठी विकासासाठी कोणत्याही ठोस उपाययोजना न आखणाऱ्या नेंत्याना मोठं करतील. पुरोगामी पक्षात असणारे नेतृत्व आपल्या जातींच्या प्रश्नाविषयी जेवढे जोर देऊन काम करू शकते तेवढे मुस्लिम नेते करू शकत नाही. 

पक्षांना मुस्लिम मतांचं राजकारण हवं आहे ते कधी भाजपासारखं मुस्लिमांच्या विरोधात राहून किंवा स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या मुस्लिमांच्या मूळ समस्याला, मूळ प्रश्नाला हात न घालता, मुस्लिम समाजाचं नेतृत्व नाकारणाऱ्या मुस्लिम मतांची गोळाबेरीज करणाऱ्या पक्षासारखं.

महाराष्ट्राच्या राजकारणासारखं ते पक्षाचा प्रचारक म्हणून मुस्लिमांवर लादू शकतील पण एखादा 'खालिद सैफी' महाराष्ट्राच्या  राजकीय  पलटावर आणू शकणार नाहीत. 
तुरुंगात असणारे मिरान हैदर, खालिद सैफी हे 'चारा' बनतात पण 'भाईचारा' म्हणून नेतृत्व बनू शकत नाहीत. 
#मुस्लिम_राजकारण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...