90 % अशिक्षित समाज असणाऱ्या मुस्लीम तरुणांचा बिग बॉस विजेता एम सी स्टँन व मुनव्वर फारुकी आदर्श असू शकतो का?
आपल्या समाजातील 90% मुले अशिक्षित आहेत, त्यांना जगाची किंवा समाजाच्या परिस्थितीची चिंता नाही, ते फक्त रील आणि स्टेटसमध्ये व्यस्त आहेत.
एम सी स्टँन बिग बॉस मध्ये गेल्यानंतर पुण्यातील त्या भागात राहणाऱ्या मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष कमी आणि झटपट पैसे व प्रसिध्द होण्यासाठी एक वेगळी ओढ सूरू झाल्याची दिसून येईल. हे प्रमाण झोपडपट्टी भागात जास्त आहे.
सकाळी उठून नाश्त्याला बिर्याणी हवी आहे, संपूर्ण दिवस उद्यानात किंवा त्या पार्कमध्ये घालवावा.
संध्याकाळी नवीन रेस्टॉरंटमध्ये हलकाफुलका पदार्थ खाऊन, मोठमोठे डायलॉग्स सांगून, कथा सांगणे.
लाइव्ह येणे आणि हुक्का ओढत रील्स बनवणे आणि शेवटी चहाचे दुकान शोधणे आणि हँग आउट करणे जेणेकरून 2-3 तास निघून जातील.
रात्री आईवडील घरी परतले की त्यांनी काही विचारले तर घाबरून त्यांच्याशी बोलणे, धावत धावत खोलीत जाणे, आरामात झोपणे, गप्पा मारणे, गेम्स खेळणे, रील, स्टेटस, स्टोरी तपासणे, कोणी पाहिले, कोणी नाही हे तपासणे. झोपा. हे फक्त आमच्या समाजातील मुलांचे रोजचे काम आहे.एकीकडे दररोज समाजाची परिस्थिती बिघडत आहे आणि त्यांना बिग बॉसमध्ये रस आहे.
द्वेषाच्या स्थितीवर मुंनवर फारुकी जिंकला त्याला एवढी मते देणारे सर्व जातीय धर्मिय होते. डोंगरी मध्ये मिरवणूक काढायला देखील सगळे जातीय धर्मिय स्थानिक मंडळी होतीच. मुनंवर याचा संघर्ष हा कौतुकास्पद आहे तो अनेक गोष्टींवर परखड आणि स्पष्ट मत नोंदवतो हे सगळे तर्क मान्य आहेत.
पण हि जी मंडळी ज्या समाजातून येतात त्या समाजाच्या युवकांवरती एक वेगळे आदर्श नेमले जात आहेत याचे भान आहे का?
त्याचं डोंगरी मध्ये गेल्या वर्षी एका छोट्या खोलीत राहणारा हुसेन सय्यद UPSC सारखी अवघड स्पर्धा परीक्षा देऊन उत्तीर्ण झाला त्याच्या यशाकडे कुणाचे लक्ष गेले नाही कुणी त्याला आदर्श मानला नाही.
या सगळ्या बाबी प्रत्येक जाती धर्मातील युवकांना लागू होतात. बेरोजगारी, शिक्षण,व्यसनाधीनता व तरुणाईवर होणारा परिणाम याची चर्चा सोडून ज्या पद्धतीने मुनव्वर च्या विजयावर काही माध्यमांचा सध्या विधवा विलाप आपण पाहू शकतो. ते द्वेष निर्माण करण्याचे काम ते करत आहेत.
पण तरुणाईने देखील यांचा आदर्श घेऊन हुक्का, रीलस् , प्रसिद्धीची हवा हया गोष्टी करत आहेत त्या खरचं समाजाला मजबुत करणाऱ्या आहेत याचा विचार करावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा