गेल्या दोन वर्षापासून MPSC च्या तीन परिक्षेत उर्दू माध्यमातून शिकलेल्या मोहंमद तोसिफचे यश.
मराठी मुसलमान
7249124871
मूळचा दिग्रस यवतमाळ येथील असलेला मोहम्मद तोसिफ मो. हसीन याचे प्राथमिक शिक्षण उर्दू माध्यमातून झाले आहे. दिग्रसच्या अंजुमन उर्दू स्कूल मधून प्राथमिक शिक्षण घेतले आहे.
वाणिज्य शाखेतील पदवीधर असून फुलसिंग नाईक कॉलेज पुसद यवतमाळ येथून शिक्षण पूर्ण केले आहे.
वडिलांचे औषधाचे दुकान असून आई गृहिणी काम करतात.
अध्यत्मिक वातावरणात वाढलेल्या आणि उर्दू माध्यमातून शिक्षण घेतलेल्या मोहम्मद तोसिफ यांचे यश कौतुक करण्याजोगे आहे.
2021 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब च्या परिक्षेत मंत्रालय सहाय्यक ( ASO )व सहाय्यक विक्रीकर निरीक्षक (STI ) हि पदे मिळवली होती.
काल झालेल्या राज्यसेवा निकाल 2022 च्या परिक्षेत यश मिळवून Asst. director MFAS म्हणून निवड झाली .
त्यांच्या निवडीने कुटुंबातून आनंद व्यक्त केला जात आहे. मोहंमद तोसिफ म्हणतात उर्दू माध्यमातून देखील येऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवणे अवघड नाही.
उर्दू माध्यमात प्राथमिक शिक्षण घेतलेल्या युवकांनी स्पर्धा परिक्षा कडे वळले पाहिजे.
हे पण वाचा....
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा