भारतीय कबड्डी संघात निवड झालेला अस्लम इनामदार म्हणतो आयुष्यात एखादा मित्र राजू कोठारे सारखा असावा..

पुणेरी पलटण प्रो कबड्डी संघात खेळणारा अस्लम इनामदार सगळ्यांच्या परिचयाचा आहे. महाराष्ट्रातील टाकळबन अहमदनगर येथील अत्यंत खडतर परिस्थितीतून आलेल्या अस्लम मुस्तफा इनामदार याची बुसान दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या 11 व्या आशियाई स्पर्धेसाठी भारतीय पुरुष कब्बडी संघात निवड झाली आहे.
आपल्या मोठ्या भावापासून प्रेरणा घेत कब्बडी खेळायला सुरवात करणाऱ्या अस्लम चे स्वप्न पोलिस दलात जाऊन कुटुंबाचं देशाच नाव मोठं करण्याचं होत. सोबत खेळाची आवड देखील होती.
  घरी अठरा विश्व दारिद्र्य परिस्थीती बिकट. वडलांच्या अकाली जाण्याने आई वर घरची परिस्थिती पडली. लोकांची धुणीभांडी धुवून माऊलीने कुटुंबाचा सांभाळ केला.
     बिकरी काम , लोकांच्या शेतातील कामे , मजुरी करत अस्लम ने खेळण्याची जिद्द कायम ठेवली.
सराव करताना आलेल्या दुखापतीतून उभे राहत असलम इनामदार ने पुन्हा यशाला गवसणी घातली.
    या सर्व यशात राजू कोठारे यांच्यासारखे असंख्य मित्र , मार्गदर्शक , गुरू भेटले ज्यांनी नेहमी मार्गदर्शन केले.
देशासाठी खेळून देशाच , गावच आण महाराष्ट्राच नाव मोठं करायचंय हे असलम इमानदार म्हणातो. अस्लम याला खुप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीस सदिच्छा

हे वाचा :-

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...