संस्कृत भाषा क्षेत्रातील अनमोल हिरा...पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार

अक्कलकोटचे पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार हे पवित्र   रमजान  महिन्यात  पैगंबरवासी झाले. रमजान च्या अगोदरच्या  महिन्यापासून ते अस्वस्थ होते. .मृत्यूसमयी   ते ८७ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा बदिउज्जमा बिराजदार असून ते नावाजलेले गझलकार साबीर शोलापुरी या नावाने प्रसिद्ध आहेत. दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे...

 बिराजदार हे मूळचे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील आहेत. सोलापुरातील महानगर पालिकेच्या संस्कृत शाळेत त्यांचे शिक्षण झाले. पुढे त्यांनी वेदांचा अभ्यास केला आणि त्यांत प्रावीण्य मिळवले...बिराजदार यांनी मुसलमानांचा कुराण-शरीफ हा पवित्र ग्रंथ संस्कृतमध्ये भाषांतरित केला आहे. या ग्रंथात एकूण ६०० पाने आहेत....

पाठ्यपुस्तक महामंडळाने इयत्ता नववी,दहावी साठी संस्कृतचा नवीन  अभ्यासक्रम तयार करायची जवाबदारी दिली होती.
वयाच्या ८७ व्या वर्षी देखील रात्र रात्र जागून ती जबाबदारी पार पाडली होती...प्रसिद्ध मराठी गझलकार बदिउज्जमा बिराजदार हे त्यांचे सुपुत्र.

अनेक आठवणी आहेत.दस्तगीर यांच्या तीनही मुलांची आणि नातीच्या लग्नाची पत्रिका संस्कृतमधून होती. तिच्यात वेदाच्या ऋचांचा समावेश होता...

त्यांची पुस्तके वेदादि-शोधबोध,मुस्लिम-संस्कृत-सेवका:'विश्वभाषा' सम्पादकीयमौक्तिकानी,
मुस्लिमानां संस्कृताभ्यासो अन्ये चापि लेखा:
त्यांना मिळालेले पुरस्कार-
बिराजदार यांना एकूण १८हून अधिक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांपैकी काही -
राष्ट्रीय-शिक्षक-पुरास्कार केन्द्र शासनं १९८३
संस्कृत-पण्डित्याय राष्ट्रपति पुरस्कार १९९८
महाराष्ट्र राज्य-संस्कृत-पण्डित-पुरस्कार: महाराष्ट्र विधानसभा,१९९३
उज्जैनहून परशुरामश्री
तिरुपतीहून वाचस्पती
नाशिकहून विद्यापारंगत
वाराणसी येथून महापण्डित आणि पण्डितेंद्र
 संस्कृतरत्नम्‌

पंडित बिराजदार हे औरंगाबाद येथे जानेवारी २०१८मध्ये झालेल्या तीन दिवसीय वैदिक संमेलनाचे खास निमंत्रित होते. वेदाचे अभ्यासक व संस्कृत पंडित म्हणून तेथे २१-१-२०१८ रोजी झालेल्या समारोप कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.

पं. गुलाम दस्तगीर बिराजदार यांनी स्वतः आपली  खंत व्यक्त केली होती.
राजकीय नेते फक्त आश्वासने देतात. नोकरशाही निर्माण करीत असलेल्या अडथळ्यांमुळे त्यांच्यामध्ये प्रत्यक्ष कृती करण्याचा अभाव दिसून येतो, अशी खंत गुलाम दस्तगीर बिराजदार यांनी व्यक्त केली होती...

‘मुक्तछंद’ संस्थेतर्फे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते बिराजदार यांच्यासह प्रसिद्ध लेखक वसंत वसंत लिमये, प्रसिद्ध हिंदूी साहित्यिक सुनील केशव देवधर आणि ‘लोकसत्ता’चे चित्रकार नीलेश जाधव यांना स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला, त्या प्रसंगी बिराजदार यांनी आपली भावना व्यक्त केल्या होत्या..इंदिरा गांधी यांच्या काळापासून ते  मंत्रिमंडळाच्या संपर्कात होते ..अटलबिहारी वाजपेयी..मुरली मनोहर जोशी यांच्याशी त्याचे चागंले संबध होते...त्यामुळे राजकीय नेते फक्त आश्वासने देतात. त्यांना प्रत्यक्ष कृती करण्याची इच्छा असली तरी नोकरशाही निर्माण करीत असलेल्या अडथळ्यांमुळे आश्वासनांची पूर्ती होत नाही, असे सांगून बिराजदार म्हणाले होते कि , शालेय अभ्यासक्रमात इयत्ता सहावीपासून संस्कृत विषय अनिवार्य करण्याचे आश्वासन तत्कालीन  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले होते . या गोष्टीला  बरेच वर्ष उलटून गेल्यानंतरही अद्याप कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही..

अमेरिकेत २० लाख लोक संस्कृतचा अभ्यास करीत आहेत,संस्कृत ही आपल्या देशाची भाषा असून आपण संस्कृतचे संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी बिराजदार यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले ...त्यांची मुलं नातवंड ही संस्कृत भाषेत पारंगत आहेत..

.अश्या या महान संस्कृत पंडितास मुकलो आहोत अशी सर्वत्र शोककळा दिसून येत आहे. पंडितजीची 2004 साली सोलापूरचे आदरणीय राजेंद्र  खोले वकीलांनी त्यांची ओळख करून दिली..मला जुनी संस्कृत ग्रंथ जमा करायचा छंद होता तेव्हा मी त्यांना दाखवायचो..

©Vishal Phutane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...