एक जैन युवक जेव्हा म्हणतो माझा रोजा आहे तेव्हा द्वेषातून समाज घडवणरी प्रसारमाध्यमे हरल्याची भावना निर्माण होते.
आमच्या गावातील एक तरूण प्रगतीशील शेतकरी, समाजकारणातलं एक परखड व्यक्तीमत्व आणि कोणाच्याही मदतीला वेळकाळ न पाहता जाणारे आमचे तरुण मित्र श्री. अनिल पाटील उर्फ गुंडू याची आज सकाळी एका कामानिमित्त जैनपुर ग्रामपंचायत कार्यालयात भेट झाली.
शक्यतो मी माझ्या वॅालवरती पोस्ट करताना अथवा कोणालाही कमेंट करताना जातीचा उल्लेख टाळत असतो पण आज उल्लेख करणं मला उचित वाटतय म्हणून मी तो करतोय.
या माणसाला ना तंबाखूचे व्यसन आहे ना पानसुपारीचे …!!! गुटखा, मावा, सुगंधी सुपारी यापासून कोसो दूर असणारा गुंडू !!
आज बाकी तोंडात लाळ साचवायचा, बाहेर जावून थुंकून यायचा ते मला काही कळेना.
दोन तीन वेळा तो बोलता बोलता तोंडात लाळ साचवून बाहेर जावून थुंकूनही आला.
न राहवून मी त्याला विचारले की… तोंडात काही जखम वगैरे झाली आहे का ?
की मग तंबाखूची गुळणी लावायला सुरवात झाली आहे.
तसा हसून बाहेर जावून तो थुंकून आला आणि बोलला की ‘दादा मी रोजा करतोय…’ आणि तो करत असताना थुंकी गिळणे देखील पाप असते.
जैन समाजाचा तरूण युवक जेव्हा हे बोलत होता तेव्हा सध्या विद्वेष, जातीयता,धर्मांधतेचा राजकीय भांडवल ,प्रसारमाध्यमे यांच्यातील द्वेष पूर्ण मानसिकता मागे हटत नव्हती.
आपल्या धर्मासोबत इतरांच्याही धर्माचे पालन करणारा गुंडू आज मन जिंकून गेला. त्याचा रोजा इफ्तार आज माझ्या घरीच केला.
#रोजा
,🖋️ विक्रम पाटील जयसिंगपुर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा