शाहिद आझमी व्यवस्थेने दोषी ठरवलेल्या घटकांसाठी लढणारा वकील

3 डिसेंबर वकील दिवस  या दिवशी शाहिद आझमी यांच्या बद्दल ही पोस्ट..
नक्की वाचा !!🙏✍️
शाहिद आझमी यांचा जन्म मुंबईतील एका मुस्लिम कुटुंबात झाला होता ते मूळ रूपाने आजमगढ,उत्तर प्रदेश येथील रहिवासी होते..ते त्यांच्या ५ भावांपैकी ३ ऱ्या क्रमांकाचे होते त्यांचे वडील शाहिद च्या लहानपणीच वारले होते,शाहिद आणि त्यांचे भावंड त्यांच्या आईसोबत राहत होते.शाहिद जेव्हा १४ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्यावर १९९२ च्या दंग्यात हिंसा करण्याच्या आरोपा खाली त्यांना गोवंडी येथील पोलिसांनी अटक केली पण त्यांच्या विरुद्ध काही पुरावे नसल्यामुळे त्यांना सोडण्यात आले होते ..ते समाजातील द्वेष आणि जातीयवाद पाहून थोड्या काळासाठी POK मधील लढाऊ प्रशिक्षण शिबीरामध्ये शामिल झाले पण तेथे पाहिलेल्या अतिरेकीपणामुळे ते लवकरच परत आले..
१९९४ मध्ये त्यांच्यावर काही हिंदू-नेत्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप लावून त्यांना (TADA )च्या अंतर्गत अटक करण्यात आली..त्यांच्यावर निर्दयपणे छळ करण्यात आला व कधीही न केलेल्या गुन्ह्याची कबुली देण्यास त्यांना भाग पाडले व त्यामुळे त्यांना ५ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली व त्यांना दिल्लीच्या तिहाड जेल मध्ये पाठवण्यात आले...तिहाड  मध्ये असतानाच त्यांनी महाविद्यालयीन अभ्यास सुरू केला आणि पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सर्जनशील लेखनात पूर्ण केले..(TADA) च्या आरोपातून सुटल्यानंतर त्यांनी मुंबईत कायद्याच शिक्षण पूर्ण केले आणि कायद्यात #LLM पदवी मिळवली..पदवी घेतल्यानंतर त्यांनी काही महिने Defence Lawyer माजिद मेमन यांच्याबरोबर काम केले व नंतर त्यांच्या नैतिक मूल्यामुळे मेमन ला सोडून त्यांनी आपली स्वताची Practice सुरू केली.लवकरच त्यांनी मुस्लिमांवर(POTA )अंतर्गत लावलेली प्रकरणे  घेण्यात सुरुवात केली व अनेक प्रकरणे त्यांनी लढले त्यांना मोठा विजय मिळाला २००२ मध्ये घाटकोपर बस बॉम्बस्फोटच्या प्रकरणात (POTA) च्या अंतर्गत अटक करण्यात आलेल्या व मुख्य आरोपी समजल्या जाणाऱ्या आरिफ पानवाला यांना इतर ८ जणांसह पुरावा नसल्यामुळे निर्दोष सोडण्यात आले ..अशातच शाहिद ला फोन वर जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या,पण याचा त्यांच्यावर वर काहीच प्रभाव पडला नाही ते (POTA) अंतर्गत वंचीत मुस्लिम आरोपींचे खटले घेतच राहिले.पिडीताकडून त्यांनी खूपच कमी फी आकारली किंवा नाहीच.कायद्याच शिक्षण घेण्याचं त्यांचं उद्देश्यच हा होता की त्यांच्या (जे सोबत घडलं ते दुसऱ्यांच्या सोबत घडू नये ).कमीत कमी पैसे घेऊन न्याय मिळून देणे हाच त्यांचा लक्ष्य होता..

पुढे शाहिद यांनी ७/११ मधील मुंबई लोकल ट्रेन ब्लास्ट,२००७ मधील औरंगाबाद Arms Haul,२००६ मालेगाव ब्लास्ट मधील आरोपींचे प्रतिनिधित्व केले.मोक्का वापर करण्याला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली व  ..२००८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने या ३ ही खटल्यांना स्थगिती दिली.

जुलै २००८ मध्ये शाहिद यांनी जनहित याचिका दाखल केली व आर्थर रोड कारागृहात आरोपींचा छळ करण्यात येत असल्याचा आरोप केला ,कोर्टाने चौकीशीचे आदेश  दिले व हे आरोप खरे ठरले .
शाहिद यांनी बचाव केलेल्या शेवटच्या घटनांमध्ये २६/११ हल्ल्यातील आरोपी फहिम अन्सारीची होती परंतु निकाल येण्याच्या पहिलेच शाहिद यांची निर्घृण हत्या करण्यात आली, ११ फेब्रुवारी २०१० रोजी कुर्ला येथील टॅक्सी मेन कॉलनी येथील कार्यालयात ४ बंदुकधारकांनी त्यांच्या कार्यालयात घुसून त्यांना गोळ्या घातल्या,घटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित  केले.शाहिद यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या भावाने कायद्याची पदवी पूर्ण केली आणि आपल्या भावाचे अभियान पुढे चालवत आहे...

 आणि मुख्य गोष्ट म्हणजे १९ ऑगस्ट २०१२ रोजी काही पुरावे नसल्यामुळे फहिम अन्सारी यांना सर्वोच्च न्यायालयाने सर्व आरोप मुक्त केले होते.व येथे सुद्धा शाहिद सरांची मोठी जीत झाली !

शाहिद सर हे खूप धैर्यवान माणूस होते,त्यांच्या कथेमुळे असा विश्वास होतो की खरंच माणसामध्ये माणुसकी अस्तित्वात आहे..त्यांनी Pota अंतर्गत १८ निर्दोष मुस्लिमांचे प्राण वाचले.त्यांनी आपली जीवाची जरा सुद्धा काळजी घेतली नाही किंवा कोणाला घाबरले नाही. त्यांनी त्यांच्या कार्याचे खूपच कमी शुल्क आकारले किंवा आकारलेच नाही म्हणा ..ते नैतिक मूल्यांचे अनेक वकिलांना प्रेरणा देणारे व्यक्ती होते...अश्या खऱ्या  हिरो बद्दल आपल्याला माहिती नसते ही खूप खेदाची बाब आहे 
त्यांना माझा  सलाम !
©मराठी_मुसलमान 







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...