पोस्ट्स

हिंदू लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ज्यावेळी विनोद पिण्याच्या पाण्यासाठी मस्जिदीमध्ये गेला.....

इमेज
   दुपारची वेळ होती. दिवस उन्हाळ्याचे होते. अभ्यासिकेत सर्वजण जेवण करून दुपारची वामकुक्षी टेबलावर डोके ठेवून घेत होते. अभ्यासिकेशेजारी असणाऱ्या मशिदीमध्ये दुपारच्या आजानमुळे जे पेंगत होते त्या सर्वांची उठण्याची वेळ झाली होती. अभ्यासिकेच्या काही अतंरावर मशीद असल्याने होणाऱ्या आजाणच्या स्पीकरच्या आवाजावर कुणीही त्रागा केलेला कधी जाणवला नाही. उलट या आजाण च्या वेळेवर जेवण, चहा, आणि संध्याकाळी घरी जाण्याची वेळ ठरत असतं.    त्या दिवशी अभ्यासिकेत पाण्याचा तुटवडा होता. जेवणाच्या वेळेनंतर पाणी संपले होते.   पाण्याच्या विवंचनेत आपल्या मुस्लिम सहकारी मित्राचा पाण्याने धूतलेला प्रफुल्लित चेहरा पाहून विनोद म्हणाला 'अरे कुठून आला? ' 'मशीदी मधून'  'पाण्याची सोय असते?' 'हो' 'मला जाऊन देतील? ' मित्र गावाकडील असल्याने मस्जिदमध्ये एकदा तिरकट म्हतारा असेल जो पाणी भरून देणार नाही. या विवंचनेत होता.  'ठीक आहे आपण जाऊ' विनोद आणि तो सोबत गेले.  दरवाज्यातून आत शिरताना नमाज पडून शेवटी बाहेर येणारे मौलवी आणि मस्जिदीचे काही जबाबदार नमाजी बाहेर पडत होते. ...

मुस्लिम तरुणांनी मंदिराभवती मानवी साखळी निर्माण करत मंदिराच रक्षण केलं!

इमेज
बंगळूरमध्ये काँग्रेस आमदाराच्या पुतण्याने पैगंबरांवर आपत्तीजनक पोस्ट केल्यामुळे निषेध करण्यास जमलेल्या जमावावर पोलिसांनी गोळीबार केला त्यात पाच जणांचा मृत्यू झाला त्यामुळे  हिंसात्मक वातावरण तयार झाले. एक  जमाव काँग्रेस आमदाराच्या घरासमोर जमा झाला होता.आमदाराच्या घराजवळ एक मंदिर होत. एका आमदाराच्या पुतण्याच्या चुकीमुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये म्हणून काही मुस्लिम युवकांनी त्या भागातील मंदिराभवती मानवी साखळी निर्माण करत मंदिराचं रक्षण केल. या हिंसेवेळी झालेल्या हल्ल्यात 60 पोलीस देखील जखमी झालेत.  मुस्लिम युवकांच्या कृतीमुळे तेथील वातावरण काही प्रमाणात निवळण्यास मदत झाली. तेथील युवकांनी जमलेल्या युवकांची समजूत घालून माघारी लावले  हे वाचा :-  मराठा दांपत्याने घडवले मुस्लिम मुलीला

विरोध भाजपला, श्री रामाला न्हवे. विरोध द्वेषाला, आस्थेला न्हवे.

इमेज
कोर्टाचा निकाल आला आहे. एक संविधानवादी म्हणून त्या निकालाचा आदर त्याहीवेळी केला आणि आजही करत आहे. आणि पुढेही करेलच. वास्तूचा एक इतिहास होता त्यात बरेच मतभेद आहेत. कोणी म्हणते तिथे मशीद होती, कोणी म्हणते मंदिर, कोणी म्हणते बुद्ध विहार. जागा कोणा एकालाच मिळू शकते. आणि मिळाली त्याबद्दल श्री रामांवर आस्था ठेवणाऱ्या आणि त्याच राजकारण करून देशातील सर्वात मोठा पक्ष झालेल्यांनाही मनापासून शुभेच्छा.  १९९२ चे प्रकरण सोडत (जे वाईटच होत), पुढील सगळी प्रोसेस कसही असो लोकशाही मार्गाने झाली हे महत्वाचे. लोकशाही आधी टोळी युद्ध, धार्मिक युद्धात अनेक लोक मारले गेले.  ही युद्ध सामान्य माणसापर्यंत देखील पोहोचायची आणि ज्याचा याशी संबंध न्हवता तेही मारले जायचे. आधुनिक जगात त्याला दंगली म्हणतात. पण ते कायदेशीर दृष्ट्या गुन्हा आहे हे अधिक महत्वाचे. त्यांच्यावर कारवाई होते हे महत्वाचे. आणि हे आता तरी निदान आपण थांबवले पाहिजे. देशात एक मंदिर आणि एक मशीदही नसल्याने कोणाला काहीही फरक पडणार नाही. परंतु एका स्थळाचा मुद्दा हा राष्ट्रीय रूप धारण करतो किंवा केला जातो. तेंव्हा तिथे न्याय देणे कठीण ...