दापोलीच्या सुलतानचे इंग्लडमधील स्टाफोर्डशायर विद्यापीठात नेत्रदिपक यश !

मुस्लिम समाजातील युवकांना कधी 'पंचरवाला अब्दुल', 'भंगारवाला' 'चिकनवाला' हि विशेषण कुत्सितपणे लावली जात असताना असताना इस्लामच्या शिकवणुकीप्रमाणे 'इक्रा' आत्मसात करणारे युवक आपल्याला बहुताली पाहायला मिळतील. 
  पैगंबर(स.अ) यांनी आपल्या साहबांना तुम्ही ज्ञान मिळवण्यासाठी चीन पर्यत जावे लागले तरी जावा असा उपदेश केला होता. 

दापोलीतील इलेक्ट्रीकल्सचा व्यवसाय करणारे  शौकत काज़ी यांच्यासाठी अभिमानाचा दिवस होता कारण त्यांचे  चिरंजीव सुलतान शौकत काज़ी यांचा  लोगो  स्टाफोर्डशायर विद्यापिठाच्या  वेबसाईटवर प्रकाशित झाला होता. त्यांच्यासाठी  ही खूप अभिमानाची गोष्ट आहे.
सुलतान शौकत काझी याने  शैक्षणिक क्षेत्रात इंग्लंडमध्ये  भारताचं नाव मोठं केलं आहे. स्टाफोर्डशायर विद्यापीठामध्ये सन २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या मास्टर ऑफ सॉफ्टवेअर अभियांत्रिकी विभागामध्ये सुलतान प्रथम आला आहे.

त्यानं आपल्या भरीव कामगिरीच्या जोरावर इंग्लंड मधील कट दि मर्स्टड या नामांकित सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या कंपनीत मोठया पगाराची नोकरी मिळवली आहे. त्यानं आपल्या या कर्तृत्वामुळे दापोली शहराचे नांव इंग्लंड सारख्या देशामध्ये मोठं केले आहे.

      सुलताननं आपल्या यशाचं श्रेय विद्यापीठातील प्राध्यापकांना, पालकांना आणि मित्र परिवाराला दिला आहे. या विद्यापीठात शिकताना खूपच चांगला अनुभव राहिल्याचंही  त्यानं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात असलेल्या मराठी भाषिक मुस्लिम समुदायासाठी हि अत्यंत अभिमानाची गोष्ट असून मुस्लिम युवकांनी त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी. 

हे पण वाचा 




आमचा वॉट्सअप क्रमांक 7249124871

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...