ज्या मौलानांनी धार्मिक शिक्षणाबरोबर उच्च शिक्षण घेतले आहे त्या मौलानांना चांगल्या पगाराच्या मस्जिदीमध्ये नोकऱ्या देऊन मस्जिदी शैक्षणिकदृष्टीने सक्षम बनवता येतील का?

सध्या उर्दू माध्यमातून DT. ed झालेले किंवा ज्या मदरश्यांनी ITI किंवा इतर तांत्रिक शिक्षणाच्या शाखा उघडल्या आहेत अशा मदरश्यातून बाहेर पडलेले इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेले मौलानाची संख्या आसपास पाहावयास मिळते. 
मस्जिदीमध्ये इमाम म्हणून नियुक्ती करत असताना त्यांच्याकडून कमी पगारात काम करावे अशी अपेक्षा ठेवली जाते. त्यामुळे ते इतर मार्ग निवडतात. 
तालुक्याच्या गावी किमान तीन तरी मस्जिदी ह्या तीन मजली असतात. यातील खालचा मजला सोडला तर वरचे मजले हे जुम्माच्या-ईदच्या नमाजीशिवाय किंवा एखाद्या धार्मिक कार्यक्रमाशिवाय क्वचितच वापरले जातात. 
वरच्या मजल्याचा एखाद्या अभ्यासिकेसारखा वापर करून स्पर्धा परीक्षाच योग्य प्रकारे नियोजन करता येऊ शकते. 
राहिला प्रश्न मस्जिदीमध्ये 'दिनीयातचे मखतब ' दिवसातून एक वेळ घेतले जातात. 
सकाळी किंवा संध्याकाळी यांस एक वेळ देऊन दुसरी वेळ जे शालेय ज्ञान किंवा अभ्यासक्रम  आहे तो बहुसंख्यजणांना घेता येईल. यासाठी स्थानिक भाषेचे किंवा स्थानिक संस्कृतीचे जाणकार मौलाना असतील तर उत्तमच
 यासाठी शालेय अभ्यासक्रम घेताना मौलाना यांच्याबरोबर मस्जिदीच्या आसपास असलेले उच्चशिक्षित लोकही आपला वेळ किमान अर्धा तासतरी या येणाऱ्या मुलांसाठी देऊन शिक्षणाची गोडी निर्माण करू शकतात. यासाठी इयत्ता नुसार आपला वेळ देण्याचे नियोजन केले पाहिजे. सोबत मुस्लिम समाजातील मस्जिद परिसरात राहणारा शिक्षक वर्ग या उपक्रमात भाग घेणारा असावा. 
यासाठी मस्जिदीच्या ट्रस्टीबरोबर मस्जिदीच्या परिसरात राहणाऱ्या लोकांची मानसिकता असली पाहिजे. बहुसंख्य मस्जिदीचे जबाबदार व्यक्तीची याबाबतची मानसिकता वेगळी असू शकते. 
जिथे काही मस्जिदींचा पाणी, लाइट, व अन्य खर्च देण्यास हात आखडता घेणारी पालक मंडळी अत्यंत महागड्या कलासेससाठी फी भरणारे पालक  यासाठी तयार व्हावी लागतील. 
मस्जिदी  इमारत, पाणी, लाईट किंवा मुस्लिम भागात उपलब्ध असलेले केंद्र धार्मिकते बरोबर शैक्षणिक म्हणून मजबूत करण्याचं काम आपआपल्या भागातील लोकच करू शकतात.
 कृपया आपले मत-उपाय-कार्यक्रम कंमेंट मध्ये नोंदवा


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...