पोस्ट्स

उलेमा लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ज्या मौलानांनी धार्मिक शिक्षणाबरोबर उच्च शिक्षण घेतले आहे त्या मौलानांना चांगल्या पगाराच्या मस्जिदीमध्ये नोकऱ्या देऊन मस्जिदी शैक्षणिकदृष्टीने सक्षम बनवता येतील का?

इमेज
सध्या उर्दू माध्यमातून DT. ed झालेले किंवा ज्या मदरश्यांनी ITI किंवा इतर तांत्रिक शिक्षणाच्या शाखा उघडल्या आहेत अशा मदरश्यातून बाहेर पडलेले इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेले मौलानाची संख्या आसपास पाहावयास मिळते.  मस्जिदीमध्ये इमाम म्हणून नियुक्ती करत असताना त्यांच्याकडून कमी पगारात काम करावे अशी अपेक्षा ठेवली जाते. त्यामुळे ते इतर मार्ग निवडतात.  तालुक्याच्या गावी किमान तीन तरी मस्जिदी ह्या तीन मजली असतात. यातील खालचा मजला सोडला तर वरचे मजले हे जुम्माच्या-ईदच्या नमाजीशिवाय किंवा एखाद्या धार्मिक कार्यक्रमाशिवाय क्वचितच वापरले जातात.  वरच्या मजल्याचा एखाद्या अभ्यासिकेसारखा वापर करून स्पर्धा परीक्षाच योग्य प्रकारे नियोजन करता येऊ शकते.  राहिला प्रश्न मस्जिदीमध्ये 'दिनीयातचे मखतब ' दिवसातून एक वेळ घेतले जातात.  सकाळी किंवा संध्याकाळी यांस एक वेळ देऊन दुसरी वेळ जे शालेय ज्ञान किंवा अभ्यासक्रम  आहे तो बहुसंख्यजणांना घेता येईल. यासाठी स्थानिक भाषेचे किंवा स्थानिक संस्कृतीचे जाणकार मौलाना असतील तर उत्तमच  यासाठी शालेय अभ्यासक्रम घेताना मौलाना यांच्याबरोबर मस्जिदी...