पोस्ट्स

इतर लेख वाचण्यासाठी

 http://marathimuslaman.blogspot.com/2020/09/blog-post_18.html वाचण्यासाठी येथे दाबा  https://marathimuslaman.blogspot.com/2020/08/blog-post_4.html   वाचण्यासाठी येथे दाबा  http://marathimuslaman.blogspot.com/2020/08/blog-post_66.html  वाचण्यासाठी येथे दाबा  http://marathimuslaman.blogspot.com/2020/08/blog-post_46.html  https://marathimuslaman.blogspot.com/2020/07/26.html  https://marathimuslaman.blogspot.com/2020/07/uae.html  https://marathimuslaman.blogspot.com/2020/08/blog-post_85.html  https://marathimuslaman.blogspot.com/2020/07/blog-post.html  https://marathimuslaman.blogspot.com/2020/07/blog-post_95.html  https://marathimuslaman.blogspot.com/2020/08/blog-post_5.html  https://marathimuslaman.blogspot.com/2020/08/blog-post_8.html  https://marathimuslaman.blogspot.com/2020/08/73.html  https://marathimuslaman.blogspot.com/2020/08/blog-post_61.html  https://marathimuslaman.blogspot.com/2020/08/blog-po...

हॉस्पिटल बांधले तर बहुसंख्याकाचा दृष्टिकोन बदलेल?

इमेज
मोबाईल मध्ये जास्त करून वॉट्सअप फेसबुक स्टेटस पाहत नाही.   नेहमीप्रमाणे 5 ऑगस्टला फेसबुक स्टेटस पाहिलं स्टेट्सला जवळच्या मित्राचं रामाचा उग्र अवतार पाहून जरा वेगळंच वाटलं. प्रत्येकाच्या स्टेटसला उग्र युद्धास सज्ज धनुष्य ताणलेला रामाचा फोटो एका वेगळ्या वातावरणाची नांदी वाटत होता.  लहानपणापासून गांधींच्या भजनातील 'रघुपति राघव राजा राम ' हा आध्यात्मिक राम नेहमीच भावायचा.संध्याकाळपर्यत स्टेटसचं स्वरूप 'रामाच्या धनुष्य ताणलेल्या फोटो पासून ते 'राम मंदिर झांकी है, काशी-मथुरा बाकी है ' पर्यत पोहचल होत. या सर्वात भाजपाच्या अंधभक्तांचा विषय वेगळा होता पण स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी मधील मित्रांच्या स्टेटसला देखील गांधीजीच्या भाजनातील राम न दिसता तोच धनुष्य ताणलेला बाण दिसला. असो जवळच्या मित्रांबाबत तो त्यांच्या धार्मिक आस्थेचा, श्रद्धा यांचा विषय समजून मनाची समजूत करावी लागली.  नंतरच्या काळात सोशल मीडियावर एकच आवई उठली.  सुन्नी वक्फ बोर्ड मशिदीच्या 5 एकर जागेवर हॉस्पिटल बांधणार. पाच एकर जागेत हॉस्पिटल किंवा मस्जिददेखील बांधून मुस्लि...

कबर खोदणाऱ्याचा अपंग मुलगा जिल्हा न्यायाधीश

इमेज
कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील जामखंडी हे  न्यायाधीश एस ए ए आर औटी यांचे जन्मगाव.  घरी अठराविश्व दारिद्र्य.पोट भरण्यासाठी औटी यांचे कुटुंब इचलकरंजी कोल्हापूर येथे स्थायिक झाले होते .  घरी पाच मुली आणि दोन मुले.संसाराचा गाडा हाकण्यासाठी औटी यांच्या आई शेजारील लोकांच्या धुणेभांडी करण्याचं काम करायच्या तर वडील मुस्लिम समाजातील लोक मयत झाल्यावर त्यांच्या कबरी खोदण्याचे काम करायचे.  त्यातच लहानपणी एस ए ए आर औटी यांना लहानपणी पोलिओ झाला होता. कायमचे अपंगत्व, अंथरुणात खेळलेले शरीर.जवळपास आकरा वर्षे अंथरुणातच खिळवून काढले.  इयत्ता पहिलीत बाहेरून प्रवेश मिळवला होता. मित्रांच्या नोट्सवर अभ्यास करून इयत्ता दहावीपर्यत मजल मारली. पायावर कसेबसे उभे राहण्याची ताकद आल्यानंतर वर्तमान पत्र टाकणे, लॉटरीची तिकिटे विकणे हि कामे करत वकिलीची पदवी घेतली.  वकील झाल्यावर काळा कोट त्यांना दोन वर्षे पैसे नसल्याने घेता आला नाही. नंतर न्यायाधीश परीक्षेचा अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश झाले.  तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून 2020 मध्ये कराड(सातारा ) येथे...

क्रिकेटच्या खेळातील साताऱ्याचा पहिला रणजी खेळाडू पठाण !

इमेज
मराठी मुसलमान देशाला विश्वचषक मिळवून देण्यासाठी गुजरातच्या पठाण बंधूना कोणीही विसरणार नाही. तसंच वाई शहरातलं क्रिकेट आणि अफझल पठाण ही एकमेकांची आठवण देणारी नावं. ऊंची आणि शरीरयष्टीचा व्यवस्थित उपयोग करत धडकी भरवणारा रन अप घेत ७ फुटांवरून अफझलभाईंचा येणारा चेंडू अनुभवणं याबद्दल  खरंतर फलंदाजानंच सांगावं. रणजीच्या त्या सामन्यात सीमारेषेवरून तडक स्टंप्स् वर थ्रो करून सुनिल गावस्करलाही एकदा  धावचीत केलं होत.  याकाळात अफझल  यांच्याबरोबर  अकिल, शकिल आणि अज्जू हि नावेदेखील साताऱ्यात प्रसिद्ध होती. भारतीय डेनिस लिली असं काहीजण त्यांचं वर्णन करायची.  महाबँक वाई शाखेत काहीदिवस  काम करण्याची संधी त्यांना मिळाली . कामाच्या ठिकाणी त्यांची  मनमिळाऊ वृत्तीने ते आपलेसे वाटायचे. सातारा जिल्ह्यातील पहिले रणजी ट्राॅफी खेळाडू आणि त्या काळातील भारतातील सर्वात वेगवान गोलंदाज व नंतरच्या काळात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे निवडसमितीचे सदस्य श्री. अफजल पठाण सर यांनी कार्य पाहिले. आज त्यांचा वाढदिवस !  वाढदिवसाच्या त्यांना  हार्दिक शुभेच्छा . अफजलभाई....

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...

इमेज
स्वातंत्र्यानंतर बिहारमध्ये बरेच मुख्यमंत्री झाले आहेत.  परंतु आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की स्वातंत्र्यानंतर बिहारमध्ये फक्त एकच मुस्लिम मुख्यमंत्री झाले .अब्दुल गफूर यांच्या नावाने आपण ज्यांना ओळखतो. तेव्हापासून कोणताही  मुस्लिम समुदायाचा नेता बिहारमध्ये  मुख्यमंत्रिपदी पोहोचला नाही, बिहारमधील मुस्लिम समुदायाकडे मोठा समुदाय आहे जो बिहारमधील सर्वात मोठा मतदार गट आहे.    तथापि, अब्दुल गफूर मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांनाही केवळ 2 वर्षे मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी देण्यात आली.  ते 2 जुलै 1973 ते 11 एप्रिल 1975 पर्यंत बिहारचे मुख्यमंत्री होते.  1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एका षडयंत्रांतर्गत त्यांना मुख्यमंत्रीपदावरून काढून टाकले आणि जगन्नाथ मिश्रा यांना मुख्यमंत्री केले.     अब्दुल गफूर केदार पांडे आणि जगन्नाथ मिश्रा यांच्या संघर्षात दबले गेले परंतु त्यांनी हार मानला नाही.      1984 मध्ये ते सिवान येथून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून खासदार झाले. 1984 च्या राजीव गांधी सरकारमध्ये ते नगरविकास मंत्री...

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...

इमेज
स्वातंत्र्यानंतर बिहारमध्ये बरेच मुख्यमंत्री झाले आहेत.  परंतु आपणास हे जाणून आश्चर्य वाटेल की स्वातंत्र्यानंतर बिहारमध्ये फक्त एकच मुस्लिम मुख्यमंत्री झाले .अब्दुल गफूर यांच्या नावाने आपण ज्यांना ओळखतो. तेव्हापासून कोणताही  मुस्लिम समुदायाचा नेता बिहारमध्ये  मुख्यमंत्रिपदी पोहोचला नाही, बिहारमधील मुस्लिम समुदायाकडे मोठा समुदाय आहे जो बिहारमधील सर्वात मोठा मतदार गट आहे.    तथापि, अब्दुल गफूर मुख्यमंत्री झाले असले तरी त्यांनाही केवळ 2 वर्षे मुख्यमंत्रीपदाची उमेदवारी देण्यात आली.  ते 2 जुलै 1973 ते 11 एप्रिल 1975 पर्यंत बिहारचे मुख्यमंत्री होते.  1975 मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एका षडयंत्रांतर्गत त्यांना मुख्यमंत्रीपदावरून काढून टाकले आणि जगन्नाथ मिश्रा यांना मुख्यमंत्री केले.     अब्दुल गफूर केदार पांडे आणि जगन्नाथ मिश्रा यांच्या संघर्षात दबले गेले परंतु त्यांनी हार मानला नाही.      1984 मध्ये ते सिवान येथून कॉंग्रेसच्या तिकिटावर निवडून खासदार झाले. 1984 च्या राजीव गांधी सरकारमध्ये ते नगरविकास मंत्री...

मुंबई क्राईम ब्रँचचे आयपीएस अधिकारी निसार तांबोळी यांना राष्ट्रपती पुरस्कार

इमेज
लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळचे सुपुत्र निसार तांबोळी याना उत्कृष्ट कामगिरी बद्दल भारत सरकारच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला. निसार तांबोळी हे 1996 पासून सेवेत कार्यरत असून 2006 साली ते आयपीएस झालेले जिल्ह्यातील एकमेव अधिकारी आहेत.आजपर्यंत अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण केल्या असून कुठल्याही वादविवादात ना अडकलेले ते एकमेव अधिकारी आहेत. ,हिंगोली,नांदेड,वर्धा,नंदुरबार,अमरावती,नाशिक,मुंबई येथे त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे.2009 ते 2012 या कालावधीत मुंबई क्राईम ब्रांचमध्ये ते कार्यरत होते,2008 ते 2009 एअरपोर्ट झोन,2015 ते 2017 औरंगाबाद येथे SRPF येथे मुख्य अधिकारी म्हणून त्यांनी महत्वपूर्ण काम केले आहे. त्यांना यापूर्वी SRPF औरंगाबादचा परिसर स्वच्छ ठेवल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने गौरविले आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या निसार तांबोळी याना भ्रष्टाचारमुक्त भारताची संकल्पना आवडते,स्वच्छ कारभार हा त्यांचा अजेंडा असून आजपर्यंत कसलाही डाग त्यांनी लागू दिलेला नाही.एक डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा जनमानसात आहे,मुंबई क्राईम ब्रँच साठी दुसऱ्यांदा प्रशासनाने त्य...

ज्यावेळी विनोद पिण्याच्या पाण्यासाठी मस्जिदीमध्ये गेला.....

इमेज
   दुपारची वेळ होती. दिवस उन्हाळ्याचे होते. अभ्यासिकेत सर्वजण जेवण करून दुपारची वामकुक्षी टेबलावर डोके ठेवून घेत होते. अभ्यासिकेशेजारी असणाऱ्या मशिदीमध्ये दुपारच्या आजानमुळे जे पेंगत होते त्या सर्वांची उठण्याची वेळ झाली होती. अभ्यासिकेच्या काही अतंरावर मशीद असल्याने होणाऱ्या आजाणच्या स्पीकरच्या आवाजावर कुणीही त्रागा केलेला कधी जाणवला नाही. उलट या आजाण च्या वेळेवर जेवण, चहा, आणि संध्याकाळी घरी जाण्याची वेळ ठरत असतं.    त्या दिवशी अभ्यासिकेत पाण्याचा तुटवडा होता. जेवणाच्या वेळेनंतर पाणी संपले होते.   पाण्याच्या विवंचनेत आपल्या मुस्लिम सहकारी मित्राचा पाण्याने धूतलेला प्रफुल्लित चेहरा पाहून विनोद म्हणाला 'अरे कुठून आला? ' 'मशीदी मधून'  'पाण्याची सोय असते?' 'हो' 'मला जाऊन देतील? ' मित्र गावाकडील असल्याने मस्जिदमध्ये एकदा तिरकट म्हतारा असेल जो पाणी भरून देणार नाही. या विवंचनेत होता.  'ठीक आहे आपण जाऊ' विनोद आणि तो सोबत गेले.  दरवाज्यातून आत शिरताना नमाज पडून शेवटी बाहेर येणारे मौलवी आणि मस्जिदीचे काही जबाबदार नमाजी बाहेर पडत होते. ...

स्वातंत्र्य आंदोलनात महत्वाचे योगदान देणारे रफिक किडवाई यांची 18 फेब्रुवारी आज जयंती.

इमेज
स्वतंत्रता आंदोलनात 10 वर्ष जेलमध्ये व्यतीत करणारे महान सेनानी रफी अहमद किडवाई.मसौली जिल्हा बाराबंकी चे प्रसिध्द जमीनदार मोठे स्वातंत्र्य सैनिक. भारतात सर्वात प्रथम आपल्या संपत्तीला 'कुळ कायदा' लागू केला.जे गरीब शेतकरी त्यांच्या शेतजमीनीत काम करत होते त्यांच्या नावावर त्यांनी जमीनी दान केल्या व त्यांच्या नावे केली व उत्तर प्रदेशातून जमीनदारीचा खात्मा केला. भारताचे कर्तबगार दुरदृष्टीचे मंत्री रात्रीच्या हवाई डाकसेवेची सुरुवात केली. पोस्ट, टेलीग्राम मध्ये काम करणाच्या २५ लाख कर्मचाऱ्यांना रविवारच्या सुट्टीची भेट दिली आजच्या जमान्यात एक साधा शिपाई सुध्दा लाखो रुपये बँक बॅलन्स ठेवतो पण भारत सरकारच्या या एका मोठ्या मंत्र्याचा मृत्यू वेळी फक्त १५६० रु.बँक बॅलन्स होता. रफी अहमद किडवाई यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1894 ला मसौली  जिल्हा  बाराबंकी उत्तर प्रदेश येथे झाला. वडीलाचे नाव इमतियाज अली व  आईचे नाव रसीउलनिसा हे होते. आपण दहा वर्षाचे असतानाच वडिलांचे निधन झाले. त्यामुळे पालन पोषण काका ही इनायतअली यांनी केले. त्या दिवसात काकाच्या घरी ब्रिटिश सरकारच्याविरोधात  नेह...

साहिर.. शब्दांचा जादूगार...

इमेज
साहिर या शब्दाचा अर्थ जादूगार. तो शब्दांचा जादूगार होता. अमृता प्रीतम त्याच्याबरोबर कॉलेजमध्ये होती. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. प्रख्यात उर्दू शायर होता तो. 'प्यासा'मधील गुरुदत्तचे कॅरेक्टर साहिरच्या शायरीवर उभे राहिलेले होते. साहिर मुसलमान आणि अमृता शीख. दोघांच्या प्रेमाला अमृताच्या वडिलांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे साहिरला कॉलेजमधून बाहेर काढण्यात आले. केवळ वयाच्या बाविसाव्या वर्षी, म्हणजे 1943 साली साहिरच्या कविता 'तलखियाँ' पुस्तक रूपात प्रसिद्ध झाल्या. साहिरच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता आणि या गोष्टीचा त्याच्या मनावर खोल परिणाम झाला होता. प्रेमातल्या जखमा सुद्धा त्याने आयुष्यभर सहन केल्या. साहिर लुधियानाहून लाहोरला गेला ते शिक्षणाकरता. तिथल्या सरकारी कॉलेजमधून त्याने शिक्षण पूर्ण केले. त्याचवेळीआपल्या गझला आणि नजम ऐकवून त्याने लोकांना पागल करण्यास सुरुवात केली. साहिर पुढे पुरोगामी लेखक संघटनेचा सदस्य बनला. उर्दू मासिकांत लिहू लागला. अदबे लतीफ,  शाहकार, सवेरा यासारखी उर्दू मासिके सुरू करण्यात आणि त्याच्या संपादनात साहिरचा वाटा होता. साहिरची पुर...

आजच्याच दिवशी मातृभूमीसाठी लढणाऱ्या 30 हजार अल्जेरियन मुस्लिमांचा नरसंहार करणाऱ्या फ्रांससारख्या पाश्चिमात्यांची लोकशाही व्यवस्था तुम्ही पाहिली नाही.

इमेज
  एखाद्या घटनेचा निषेध हिंसेने करणे निषेधार्थ आहे. आज जगातील मुस्लिम समुदायाच्या भावना दुखवणाऱ्याचा खून झाला. त्याचा संबंध इस्लामी आतंकवाद संज्ञाशी जोडणाऱ्या त्याच पॅरिस च्या देशात आजच्याच दिवशी घडलेल्या नरसंहाराबद्दल काही बोलणार आहेत कि नाही? इ स 1830 पासून आपली मातृभूमीसाठी लढणाऱ्या अल्जेरियन मुस्लिम 30000 नागरिकांवर फ्रेंच सेना आणि पोलिसांद्वारे हल्ला केला. मृत्युमुखी पडलेलीसंख्या शेकडो होती हल्ला आजच्या दिवशी 17 ऑक्टोबर 1961 रोजी झाला होता. फ्रांसच्या सिन नदीतून मुस्लिमांच्या रक्ताचे पाट वाहत होते. कित्येक दिवस  फ्रांस हे आरोप नाकारत आला पण 2012 मध्ये त्याचे अध्यक्ष François हॉलंड यांचे पुढील विधान बरंच काही सांगून जाते. “On October 17, 1961, Algerians who were protesting for independence were killed in a bloody repression. The Republic recognises these facts with lucidity…I pay homage to victims 51 years later.” यावर टिका करताना मोहम्मद इकबाल म्हणाले होते,"तुम्ही पाश्चिमात्यांची लोकशाही व्यवस्था पाहिली नाही? " #ParisMassacre #BlackDay #GenocideOfAlgiri...

मोटारसायकल मेकानिकच्या मुलीचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न, NEET परीक्षेत गरीबीवर मात करत घेतले 407 गुण…

इमेज
NEET परीक्षेचे निकाल जाहीर झाले. 13 सप्टेंबर रोजी कोविड-19 चे नियमाचे पालन करत देशभर ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत गरीबीवर मात करत शिक्षणाची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर जालना शेरसवार नगर येथील रहीवाशी मोटारसायकल मेकानिक मोहंमद युसुफ यांची मुलगी शिफा फिरदौस हिने NEET परीक्षेत 720 गुणांमधून 407 गुण प्राप्त करून प्राविण्य मिळवले आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची तरीही या मुलीला एमबीबीएस डॉक्टर बनून पालकांचे स्वप्न साकार करायचे आहे. त्यासाठी पुढील शिक्षणासाठी नातेवाईक प्रयत्न करणार आहे. एका नामांकित कोचिंग क्लासेसचे शिफाला मार्गदर्शन लाभले. उर्दु ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी या यशात या गरीब कुटुंबाची मदत केली आहे. विशेष म्हणजे शिफाची आई घरात लेडीज कपडे शिवून संसाराला हातभार लावते. त्यांना चार मुली आहे. तेही शिक्षणात पुढे असल्याने पालकांचे नावलौकिक मिळवून प्राविण्य प्राप्त करत असल्याने त्यांचे समाजात अभिनंदन केले जात आहे. कुटुंबाला या आनंदाचे क्षणात शुभेच्छा देण्यासाठी नातेवाईक त्यांची भेट घेत आहे.

शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवणारे सर सय्यद अहमद खान-सुफियान मणियार

इमेज
"सर सय्यद अहमद खान" १८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामानंतर इंग्रजी सत्तेने मुस्लीम समाजाची सर्व केंद्रस्थाने उद्ध्वस्त केली. अनेक सामाजिक, धार्मिक संस्था संपवल्या. प्रशासनातून मुस्लीम समाज बाजूला फेकले गेले. गुणवत्ता शिक्षण देणारे अनेक मदरसे उद्ध्वस्त करण्यात आले. मुस्लिमांवर आलेल्या या संकटाच्या काळात सर सय्यद अहमद खान अस्वस्थ झाले. मुस्लिमांच्या शैक्षणिक प्रगती व बौद्धिक विकासासाठी सर सय्यद यांनी मोहम्मदन कॉलेजची स्थापना केली नंतर या कॉलेजचे रूपांतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये झाले.मोहम्मदन कॉलेजच्या स्थापना वेळी सर सय्यद यांना अनेक अडचणी चा सामना करावा लागला. इंग्रजांनी मुस्लिम समाज विरोधात टोकाची भूमिका घेतल्यामुळे मुस्लिमात त्यांच्या विरोधात द्वेषभावना होती. इंग्रजी भाषेमुळे आपली संस्कृती व भाषा उद्धवस्त होईल असा समज मुस्लिम समाजात होता त्यामुळे मुस्लिम समाजाने इंग्रज व इंग्रजी भाषेच्या विरोधात टोकाची भूमिका घेतली होती. अश्या प्रस्तिथीत सर सय्यद यांनी वास्तवाचे भान घेऊन मुस्लिमांना इंग्रिजी भाषेत शिक्षण घेण्याचे आव्हान केले. सर सय्यद यांच्या या भूमिकेला मुस्लिम स...

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

इमेज
🔶 रेशनिंगचे नियम/माहिती/रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार देण्यासाठी/आपले हक्क (®) 👉 रॉकेल/घासलेट पहिल्‍या पंधरवड्यात न घेतल्‍यास महिना अखेरपर्यंत घेता येते. हप्‍ता बुडत नाही. 👉 बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य गेल्‍या महिन्‍यात न घेतल्‍यास पुढच्‍या महिन्‍यातही घेता येते. 👉 बीपीएल् व अंत्‍योदयचे धान्‍य महिन्‍यात 4 हप्‍त्‍यातही घेता येते. 👉 रेशनवर घेतलेल्‍या वस्‍तूंची पावती मिळालीच पाहिजे. पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो. 👉 एका दिवशी एकच पावती फाडता येते असा नियम नाही. 👉 ज्‍या व जेवढ्या वस्‍तू हव्‍या असतील तेवढ्याच वस्‍तू आपण घेऊ शकतो. इतर गोष्‍टी घेतल्‍याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार म्‍हणू शकत नाही. 👉 रेशनकार्ड स्‍वतःकडे ठेवून घेण्‍याचा किंवा ते रद्द करण्‍याचा अधिकार दुकानदाराला नाही. 👉 रेशन दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास उघडे असलेच पाहिजे. आठवडी बाजाराच्‍या दिवशी उघडे असले पाहिजे. आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते. रेशन दुकान जर आठवड्यातून एक दिवसाहून अधिक दिवस बंद रहात असेल तर त्या बंद दुकानाची छायाचित्रे / चलचित्रे तारीख वेळे सहित http://mahafood.g...

मुस्लिमांनी मोदी विरोधाची मानसिकता बदलली पाहिजे.

इमेज
मुस्लिमांनी आपली  विचित्र मानसिकता बदलली पाहिजे. प्रत्येक गोष्टीत मोदींचा निषेध करा, भाजपाचा निषेध, मोदींच्या निषेधाची ही वेळ आहे असे मला वाटत नाही, परंतु मोदीजींच्या पाठीशी उभे राहण्याची ही वेळ आहे.  विनाकारण निषेध करणे आणि ओरडणे थांबवा, खरं तर फक्त तुमचाच छळ होत  नाही, फक्त  तुम्हीच  छळले जात नाही.  गेल्या काही वर्षात किती रोजगार गमावले आहेत?  किती शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत?  देशातील किती बहिणी व मुलींवर बलात्कार व खून झाले आहेत? बेरोजगारीमुळे किती लोकांनी आत्महत्या केली?  किती व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या किंवा मारले गेले? आकडेवारी पाहिली आहे का?  डझनभर खून पडत आहे  असा एखादा दिवस नसतो जेंव्हा जीव गेलेला असतो आणि आपणच फक्त ओरडू लागतो!  एनसीआरबीच्या अहवालानुसार गेल्या 3 वर्षात 4 लाखाहून अधिक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. सुमारे १ लाख मुलींवर बलात्कार झाले आहेत, कोट्यावधी रोजगार हिसकावून घेण्यात आले आहेत, कोट्यवधी तरुण बेरोजगार आहेत, या सर्व प्रकरणांमध्ये आपण  5% देखील नाही, परंतु आपण सर्वाधिक निषे...

आपल्या देशाच्या सैन्याने आमच्या निर्दोष मुलाला मारले आहे, तेव्हा वेदना वाढेल आमच्या कुटुंबाने पिढ्यान्पिढ्या देशाच्या सैन्यात सेवा केली आहे-इबरारचे वडील (काश्मीर)

इमेज
या  तीन मुलांची नावे  इम्तियाज अहमद, अबरार अहमद आणि मोहम्मद इब्रार.   18 जुलै 2020 रोजी काश्मीरच्या एम्सीपोरा गावात सैन्याच्या कारवाईत ही तिन्ही मुले ठार झाली.  सुरक्षा दलांचा असा दावा आहे की हे तिघे अतिरेकी होते, त्यांच्याकडून चकमकीनंतर शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.  परंतु या मुलांचे कुटुंब हे सांगत राहिले की ते तीन मजूर असून ते शोपियां जिल्ह्यात कामावर आले होते. त्यांचे  दहशतवादाशी काही देणे-घेणे नव्हते.  त्यांचे म्हणणे कोणी ऐकले नाही.  3 अतिरेकी ठार झाल्याचे टीव्हीवर दाखवले गेले. हे कुटुंब रडत राहिले, या मुलांच्या मृतदेहाचे दफनसुद्धा कुटूंबात झाले नाही.  पण आता तपासात ही तीन मुले निर्दोष असल्याचे आढळले.  आस्फा अंतर्गत ज्या कायद्यान्वये कारवाई केली गेली त्याचा दुरुपयोग केला गेला, त्याचा गैरवापर केला गेला असल्याचे तपासात निष्पन्न झाले.  या तिन्ही मुलांचा दहशतवादाशी काही संबंध नव्हता, त्यांच्याकडे बंदुका किंवा दारूगोळाही मिळाला नाही.  सैनिकी कायद्यानुसार दोषी ठरलेल्या सैनिकांवर कारवाई केली जाईल. ...

डॉक्टर झालेल्या रुबीनाचा प्रेरणादायी प्रवास खडतर परस्थितीवर केली मात.

इमेज
कोव्हीड योद्धा रुबिना नाईकवाडे उत्तूरच्या (जि.कोल्हापूर) मुस्लिम समाजातील पहिली महिला डॉक्टर. शाळेत असतानाच तिने डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. प्रतिकूल परिस्थिती असतानाही जिद्द, कष्ट आणि अभ्यासाच्या जोरावरच अखेर हे स्वप्न पूर्ण झाले. उत्तूर येथील डॉ. रुबिना नाईकवाडे हिच्या जिद्दीची ही गोष्ट आहे.  गावातील मुस्लीम समाजातील ती पहिलीच महिला डॉक्टर. गुणवत्तेच्या जोरावर शासकीय कोट्यातून वैद्यकीय शाखेत प्रवेश मिळवून रुबिना एमबीबीएस झाली आहे. सध्या ती मुंबईतील सायन हॉस्पिटलमध्ये कोव्हीड योद्धा म्हणून रुग्णसेवेत कार्यरत आहे. तिच्या या यशाचे कौतुक करण्यासाठी नुकताच ग्रामस्थांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. उत्तूर येथील शोकत नाईकवाडे यांची रुबिना ही मुलगी. शालेय शिक्षण गावातच झाले. शाळेत कधीतरी तिला शिक्षकांनी विचारले की, तू मोठी झाल्यावर कोण होणार? तिने मी डॉक्टर होणार असे आत्मविश्वासाने सांगितले. मात्र डॉक्टर होण्यासाठी कोणत्या दिव्यातून जावे लागते याची बारावी होइपर्यंत तिला कल्पना नव्हती. मुळची हुशार आणि अंगभूत गुणवत्ता असली तरी मार्गदर्शनाचा अभाव होता. त्यामुळे पहिली...

जुन्या चळवळीतील मित्राला शेवटी हिदायतने दिला मुखाग्नी

इमेज
 युवराज पुंडलिक फराकटे रा.चिमगाव ता.कागल जिल्हा कोल्हापुर यांचे दुःखद निधन झाले.... युवराज फराकटे हा NSUIया विधाथी चळवळीतला सहकारी मित्र नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये एकत्र विविध प्रश्नावर आंदोलनात एकत्र निवडणुकीत प्रचारात काही वेळा एकत्र कांही वेळा विरोधात पण आता गेली दहा वर्षे भेट नाही पण चार पाच वेळा फोन वर हिदायत आणि युवराजच  बोलणं झालं होतं  दि.1 सप्टेंबर ला दुपारी चार वाजता कागल तालुका राष्ट्रवादी युवक काॅगेसचे अध्यक्ष विकास पाटील यांचा हिदायत यांना मोबाईल वर फोन आला. "आपला जुना मित्र युवराज फराकटे सी.पी.आर. येथे नुकताच  निधन झाला आहे. आणी तुम्ही काही सहकार्य करु शकता का? "   त्यावेळी हिदायत  दुकानात होते  पुतण्याला  बोलवून घेतले आणि पाचव्या मिनिटाला सी.पी.आर.ला पोहोचले  तेथे युवराज यांचे मेव्हणे  श्री.दिलीप शेंडे यांना भेटले.तिथे काही अडचणी होत्या त्या  सोडविल्या व मग सायंकाळी 6.30 ला प्रेत पंचगंगा स्मशानभूमीत आणले त्या वेळी चार शववाहीका होत्या  दोन महानगरपालिकेच्या आणि एक तेज घाटगे यांनी दिलेली व...

रेहमान फौंडेशनचा जयसिंगपूर मध्ये अभिनव उपक्रम

इमेज
 काहीसा अनुभव आज आला अंकली पुलाला लागूनच उदगाव गावची वैकुंठधाम स्मशानभूमीत आज हृदय हेलावून टाकणारे चित्र बघायला मिळाले.   याठिकाणी सहा ते सात मुस्लिम समाजातील तरुण कार्यकर्ते गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अहोरात्र आपल्या मानवजातीचे ऋण, या देशाचे कर्तव्य पार पाडत असताना दिसले. रेहमान फाऊंडेशन व चांदतरा मोहल्ला मस्जिद कमिटी,जयसिंगपूर या संस्थेचे हे कार्यकर्ते गेल्या चार ते पाच महिन्यापासून देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटामध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे ते अंत्यविधी करत आहेत, प्रत्येक धर्माचे नियम,चालीरीती,रूढी,परंपरा या वेगवेगळ्या असतात पण हा महाभयंकर रोग कुठलाही धर्म बघत नाही किंवा कुठली जात बघत नाही.यात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना जवळ देखील येता येत नाही,पण या फाऊंडेशन च्या कार्यकर्ते अगदी प्रामाणिकपणे त्या शवाची योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार करत आहेत,याबदल्यात या संस्थेच्या कार्यकर्ते कुठल्याही प्रकारचा मोबदला घेत नाहीत. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात त्यांना देशाची सेवा केल्याचं समाधान मात्र यातून मिळते आहे. त्यांच...

हिंदू धर्माच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी मदतीला धावून गेले मुस्लिम युवक.

इमेज
आज पहाटे सहा वाजता परळी तालुका सुधागड जिल्हा रायगड येथील रहिवासी संजय कदम (वयं 46 वर्ष)  यांचे रोहा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोविड १९  मुळे निधन झाले. आणि  त्यांचा मुलगा आणि मेहुणे प्रवीण गायकर यांना मदत करण्याचा पुढाकार रोहा अष्टमी येथील (मन्सूर नाडकर, एजाज वास्कर आणि जावेद नाडकर ) या तीन मुस्लिम तरुणांनी घेउन त्यांचे अंत्यसंस्कार केले. कोरोना काळात प्रसार माध्यमांनी जेवढ्या प्रमाणात द्वेष निर्माण केला तेवढ्या प्रमाणात भारतीयांनी प्रेमाची बीजे फुलवली.  व द्वेष निर्माण करणाऱ्यांना चोख उत्तर दिले. शेवटी माणूस माणसाच्या मदतीला धावून गेला.

आपल्या सहकारी मित्राच्या कुटुंबियांच्या मदतीला धावून आले महाराष्ट्र पोलीस

इमेज
मरहूम पोलीस नाईक जाकीर शेख, शहर वाहतूक शाखा, सोलापूर शहर यांचं 'कोरोना' या संसर्गजन्य रोगामुळे दुर्दैवी निधन झालं. संकटकाळात पोलिसांच्या मदतीला नेहमी पोलिसच धावून येतात, हा इतिहास ज्वलंत आहे.       पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला 2003 बॅच'चे सर्व पोलिस सदस्यांनी व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून पोलीस हवलदार इक्बाल शेख, सोलापूर ग्रामीण यांच्या हाकेस साथ देऊन मरहूम जाकीर शेख यांच्या कुटुंबीयांना १,५५,०००/- रुपयांची बहुमोल आर्थिक मदत करून एक उत्कृष्ट मैत्रीला साजेल असे काम केले आहे. सर्व पोलीस बांधवांचे करावे तितके कौतुक कमी आहे ज्यांनी आपल्या सहकारी मित्राच्या घरच्यांना संकटाच्या काळात मदत केली. #महाराष्ट्र_पोलीस 

सांगली-कुपवाड महानगरपालिकेच्या सगळ्यात कमी वयाच्या नगरसेविका डॉ नर्गिस सय्यद देत आहेत कोविड रुग्णांना सेवा

इमेज
तस पहायला गेल तर ती उच्चविद्याविभूषित,पेशाने डॉक्टर आणि त्यात भर म्हणजे एक सर्जन ही विद्या सहजासहजी मिळत नसते त्यासाठी अहोरात्र अभ्यास आणि मेहनत करावी लागते.  त्यानंतर स्वतःच अस भव्य अस हॉस्पिटल चालू करून लाखो करोड़ो रूपये कमावता येतात (जे आज आपण पाहतोय).त्यांना ही हे सर्व करता आलं असतं,पण त्यांनी मार्ग निवडला तो राजकारणाचा आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची सर्वात कमी वयाची आणि उच्चशिक्षित, विद्यमान, नगरसेविका होण्याचा मान पटकावला डॉ नर्गिस सय्यद यांनी . गेले ६ महीने कोरोना सारख्या अजस्त्र अशा रोगाने जगभर थैमान घातले आहे ज्याच्या सर्वात जास्त झळा सांगली  मिरज आणि आजुबाजुच्या भागांना अतिशय तीव्र बसत आहेत,अत्यंत द्यनीय अवस्था सुरु आहे. नगरसेविका म्हणून सर्व आवश्यक पाठपुरावा त्या लॉकडाऊन पासून करतच आहेत पण आज कोरोनाचा वाढता आकड़ा लक्षात घेता त्यांनी स्वतः हॉस्पिटल मध्ये लोकांना उपचार देण्याचे ठरवले. आपले सर्व कोरोना डॉक्टर्स, नर्स आणि पूर्ण टीम अहोरात्र प्रयत्न करत आहे परंतु एखाद्या नगरसेवकाने अशा प्रकारचे पाऊल उचलणे अगदी दुर्लभ.   अगदी कमी वय आणि अ...

मुस्लिमांचे शासकीय नोकरीमधील प्रमाण आणि विदूषक प्रसारमाध्यमे

इमेज
प्रशासकीय सेवेत मुस्लिमांचे प्रतिनिधित्व केवळ साडेतीन टक्के आहे. कधीकधी हा आकडा साडेचार-चार टक्केपर्यंत पोहोचतो.  परंतु असे असूनही विकृत मनोवृत्तीचे  'भगवधारी' अँकर नोकरशहा वर्गाविरुद्ध द्वेष पसरवण्याचं काम करत आहे.नोकरीत असलेले इतके अल्प प्रमाण त्यांना टोचत आहे. अलीकडेच देशातील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये प्रथम क्रमांकावर असलेल्या भारतातील विद्यापीठाच्या शिक्षणाविषयी प्रश्न उपस्थित करत होते. ते यूपीएससीत निवडलेल्या मुलांविरुद्ध नोकरशाही_जिहाद  म्हणून तसेच विद्यापीठाच्या विरोधात विष ओकत आहेत.   अशा प्रकारचे चॅनेल कोण पाहतो? हे सांगून काही विचारवंत याकडे दुर्लक्ष करतील.  कोण पाहतो, कोण पाहत नाही?  हा प्रश्न नाही.  एक मोठा वर्ग त्याला पहात आहे, त्याच्यावर विश्वास ठेवत आहे, आणि त्याला व्हॉट्स अँप युनिव्हर्सिटीच्या वर्गातदेखील फॉरवर्ड करत आहे.  टीव्ही स्टुडिओच्या विदूषकांनी निर्माण केलेला द्वेष पुढील वीस वर्षात या देशाच्या नुकसानाची पूर्तता करु शकेल म्हणणे  कठीण आहे.   एका  समुदायाविरुद्ध, समाजात पसरलेल्या विषाचा दुष्परिण...

शेवटची अंत्ययात्रा चार लोकांच्या खांद्यावरून जावी ही जोशी यांची शेवटची इच्छा तब्लिगच्या लोकांनी पुर्ण केली.

इमेज
आज परत पुण्यामध्ये एमबीबीएस डाॅ रमाकांत जोशी  वय ७९ हे मृत झाले. एक मुलगा आहे पण  तो अमेरिकेत डाॅक्टर आहे आणि पत्नी वृध्द आहे वय ७४ आहे. डॉ रमाकांत जोशी यांची शेवटची इच्छा होती की मी चार लोकांच्या  खांद्यावर  जाईल. परंतु  कोरोनोच्या भीतीमुळे  नातेवाईक भाऊ बंध  जवळ यायला तयार झाला नाही.  ही घटना तब्लिग जमात (साथी) चे काम करणाऱ्या  युवकांपर्यंत  पोहचली.  त्यांनी सर्व व्यवस्था करुन खांद्यावर स्मशानभुमी पर्यंत नेऊन अंत्यसंस्कार केले.  पुण्यासारख्या ठिकाणी माणुसकीचा प्रत्यय पुन्हा करून दिला. 

तब्लिगीवर मुंबई कोर्टाच्या निकालाने स्पष्ट झालं कि बौद्धिक दशहतवाद्यानी भारतीयांच्या मेंदूवर हल्ला केला.

इमेज
कोरोना काळात मुंबई उच्च न्यायालयाने तबलीगी जमातच्या परदेशी सदस्यांना ‘दिलासा’ दिला.  कोर्टाचा असा विश्वास आहे की सरकारने जमातला बळीचा बकरा बनविला.  न्यूज चॅनेल्स आणि प्रिंट मीडियाने त्याला बदनाम करण्यासाठी आणि संक्रमणाचा प्रसार करण्यासाठी त्याच्यावर दोषारोप करण्यासाठी प्रचार केला.  कोर्टाने याबाबत सरकारला खडसावून याबाबत योग्य उपाययोजना करण्याबाबत सुनावले आहे.यासाठी  नुकसान भरपाई देण्यासाठी सकारात्मक पावले उचलणे आवश्यक आहे.  पण प्रश्न असा आहे की कोर्टाच्या या सल्ल्याचे पालन कोण करेल?  कोरोना बॉम्ब, कोरोना जिहाद असे कार्यक्रम चालवून समाजाला विष देणारे  मुंबई हायकोर्टाच्या सल्ल्यावरच ते लोक पाळतील काय?  माध्यमांच्या त्या बौद्धिक दहशतवाद्यांनी पसरलेल्या विषाचा दुष्परिणाम समाजासमोर आला.  याची सुरुवात दिल्लीच्या बावाना येथील रहिवासी मेहबूब अलीपासून झाली जो जमातहून परत आला होता आणि त्याच्या  गावच्या ग्रामस्थांनी त्याला कोरोना पसरल्याबद्दल मारहाण केली.  उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील चितेरा गावात मीडियाने तयार केलेला 'राष्ट...

स्वतःचा धर्म, संस्कृती,अस्मिता पायाखाली तुडवत जेत्यांच्या मर्जी प्रमाणे जगणारा मुस्लिमच यांना गुड मुस्लिम का वाटतो?

इमेज
मार्च एप्रिल मधे कोरोनाच्या नावाखाली तब्लीग जमात सहीत मुस्लिम समाजाला सर्वच वादावादी अनैतिक बौद्धिकांनी झोडपून काढले होते. एका सुधारणावादी संपदकाने तर तब्लीग जमात बद्दल फेसबुकी लेख लिहून जमातला धर्मांध रूढीप्रय, कट्टरपंथी वगैरे म्हणून हिणवले होते. देशात कोरोनाच्या संवेदशील परिस्थितीत तब्लीग जमात कशी बेजबाबदार वागली वगैरे याचा पाढाही त्यांनी वाचला. त्यांनी लेखात संपुर्ण मुस्लिम समाजाला आपल्या सवयी प्रमाणे उपदेशाचे डोस दिले. कोणत्याही बाबी एकमेकांशी जोडून त्याच्या हवा तो विकृत आकार घडवायचा आणि ती मुळ प्रतिमा असल्याचा आव आणून मिरवायचा छंद या लोकांना खूप पुर्वीपासून आहे. एखाद्या संघटनेने आपला धर्म जपण्याचा प्रयत्न केला की ती थेट धर्मांध कशी होते हेच मुळात या लोकांना ठाऊक नसावे. म्हणून त्यांनी हा भलामोठा लेख लिहीला असावा? परंतु नंतर  Alt news, scroll.in व इतर शोध पत्रकारिता करणाऱ्यांनी Fact Check करून सत्य समोर आणले होते.  लाॅकडाउन च्या काळात मजुरांना, गरीबांना मदत करणारे, रक्तदान करणारे, अन्नदान करणारे तब्लीगी व मुस्लिम यांना दिसले नाही (त्यांच्या अनैतिक मानसिकतेमुळे त...

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

इमेज
भारत हा विविध संस्कृतीने नटलेला देश आहे.  एखादा सलीम दाढी टोपी सहित ज्यावेळी एखाद्या मित्राच्या लग्नांत अक्षदा वाटताना किंवा पंगतीला आग्रहाने जेवण वाढताना दिसतो तर कधी एखादा राम अब्दुलच्या इथे त्याच्या वृद्ध आई  वडलांना मदत करताना दिसतो.  बोधेगाव जिल्हा अहमदनगर येथील भुसारे परिवारातील दोन मुलींच्या लग्नात मामाचे विधी बाबा भाई पठाण यांच्या हस्ते संपन्न झाले.आई दरवर्षी बाबा भाई ना राखी बांधते कारण तिला सख्खा भाऊ नाही.भावाची व मामाची भुमिका बाबा भाई पठाण यांनी बजावली. हेच बाबाभाई गावच्या विविध धार्मिक कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवत असतात गेल्या वर्षी गावातील सप्ताहाला देणगी देतानाचा त्याचा फोटो सोशल मीडियावर वायरल झाला होता.  बाबाभाई पाच वेळेचे  नमाजी असून एक ईश्वरवादी एका अल्लाहला मानणारे आहेत. परिसरातील बहुसंख्य जण बाबाभाईच्या अस्थेचा आणि धार्मिक प्रथाचा आदर करतात तर इतरही धर्मातील आस्था याचा बाबाभाई आदर करतात.  बाबाभाई आणि बोधेगाव मधील हाच बंधुभाव भारतात पाहण्यासाठी मिळतो जो इतर कुठेही पाहायला मिळत नाही काही राजकीय आणि धार...

मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाची तात्काळ अंमलबजावणी करण्याबाबत मुस्लिम समाजाची राज्यभर मागणी.

इमेज
निवेदन मा. नवाब मलिक साहब,  अल्पसंख्याक मंत्री, महाराष्ट्र राज्य विषय:- मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व योजनांची तत्काळ अंमलबजावणी करणे बाबत..  महोदय,             वरील विषयी अनुसरून विनंती करतो की राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी विविध कर्ज योजना, व्यवसाय परीक्षण व अन्य योजना राबविण्यासाठी सन २००० मध्ये मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. या महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी व गरीब व गरजूंना लघुउद्योग व व्यवसाय करण्यासाठी विविध योजनेअंतर्गत आर्थिक मदत (कर्ज स्वरूपात) दिली जाती.  परंतु मागील काही वर्षांपासून महामंडळाच्या योजनांवर पुर्ण पणे अमलबजावणी होत नाही. आम्ही अल्पसंख्याक समाजातील जागृत नागरीक आपणास खालील मागण्या पूर्ण करण्यासाठी निवेदन करत आहे.  मागण्या खालील प्रमाणे:-                                १) मौलाना आझाद अल्पसं...

मोहर्रम.... त्याग, बलिदानाचा व दडपशाही विरुद्धच्या लढ्याचा इतिहास

इमेज
मुहर्रम इस्लामिक कॅलेंडरचा पहिला महिना आहे.केवळ हिजरी कॅलेंडरचा नाही तर हिजरीच्या आधी नव्हे तर रसूलुल्लाह (स.अ.) च्या आधी अरब जगात दोन कॅलेंडर्स होते. एक अमूलफिल (अब्राहमचे  मक्कावरील आक्रमण)  आणि दुसरे इसवी.  या दोन कॅलेंडरचा पहिला महिना मुहर्रम हाच मानला जायचा . इस्लामिक कॅलेंडरला "हिजरी कॅलेंडर" म्हणतात.  जेव्हा हजरत मुहम्मद (स.अ.) मक्का सोडले आणि मदीनाला गेले तेव्हा या घटनेस हिजरत असे म्हणतात. हिजरी हा शब्द 'हिजरातून' आला आहे.  'हिजरा' ही एक इस्लामी शब्दावली आहे.  सत्याच्या किंवा इमानच्या  रक्षणासाठी  किंवा इस्लामच्या प्रसारासाठी हिजरत म्हणजे एखाद्याचा स्वतःच्या जन्मभूमीचा  त्याग.   इस्लामी विश्वाचे  दुसरे खलीफा हजरत उमर रजी. किंवा अमीरुल मोमीनिन यांच्या वेळेपासून  हिजरी दिनदर्शिका सुरु झाली .  या कॅलेंडरची आवश्यकता अशा प्रकारे उद्भवली की जेव्हा हजरत उमर रजी.  हजरत अबू मुसा अशारी रजी.  यांना येमेनचा राज्यपाल म्हणून नियुक्त केले तेव्हा त्यांना खलीफा ओमर यांचे संदेश प्राप्त होत असत परंतु त्यांच...