पोस्ट्स

सामाजिक आंदोलन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारा या मागणीसाठी इंन्साफ युथ फाउंडेशनचे परभणी थाली बजाव आंदोलन.

इमेज
इन्साफ युथ फाउंडेशन परभणी यांच्यावतीने सार्वजनिक आरोग्य जिल्हा रुग्णालयात अपुऱ्या सुविधेमुळे थाळी बजाव आंदोलन करण्यात आले.ऑक्सिजन मिळत नसल्याची तक्रार समाज माध्यमावर प्रसारित करणाऱ्या करोना रुग्णाचा काही दिवसांनी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील करोना कक्षात मृत्यू होतो,प्रत्यक्ष करोनामुक्त झालेल्या महिले ऐवजी दुसऱ्याच महिलेला रुग्णालयातून सुट्टी दिली जाते,तर एका प्रकरणात सुरुवातीला सकारात्मक निघालेला रुग्ण पुन्हा चक्क नकारात्मक निघतो आणि त्याला सुट्टी द्यावी लागते.  परभणी जिल्हा सरकारी दवाखान्याच्या बेफिकरीचे असे अनेक नमुने गेल्या काही दिवसात दिसून आले आहेत.त्यामुळे परभणी जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.  करोना प्रार्धुभावच्या संकट काळात अनेक नागरिक किरकोळ आजार असताना हि जिल्हा रुग्णालय येण्याचे प्रमाण  कमी झाले आहेत.परभणी जिल्हा रुग्णालयातील बाहय रुग्ण नोंद पहिली असता सहज लक्षात येते आसल्याचे म्हणणे इन्साफ फौंडेशनचे आहे .अत्यंत गंभीर आजार अगर दुखणे असणाऱ्या रुग्णांना देखील करोना संकटाच्या सबबी खाली परभणी जिल्हा रुग्णालय...