विरोध भाजपला, श्री रामाला न्हवे. विरोध द्वेषाला, आस्थेला न्हवे.
कोर्टाचा निकाल आला आहे. एक संविधानवादी म्हणून त्या निकालाचा आदर त्याहीवेळी केला आणि आजही करत आहे. आणि पुढेही करेलच. वास्तूचा एक इतिहास होता त्यात बरेच मतभेद आहेत. कोणी म्हणते तिथे मशीद होती, कोणी म्हणते मंदिर, कोणी म्हणते बुद्ध विहार. जागा कोणा एकालाच मिळू शकते. आणि मिळाली त्याबद्दल श्री रामांवर आस्था ठेवणाऱ्या आणि त्याच राजकारण करून देशातील सर्वात मोठा पक्ष झालेल्यांनाही मनापासून शुभेच्छा. १९९२ चे प्रकरण सोडत (जे वाईटच होत), पुढील सगळी प्रोसेस कसही असो लोकशाही मार्गाने झाली हे महत्वाचे. लोकशाही आधी टोळी युद्ध, धार्मिक युद्धात अनेक लोक मारले गेले. ही युद्ध सामान्य माणसापर्यंत देखील पोहोचायची आणि ज्याचा याशी संबंध न्हवता तेही मारले जायचे. आधुनिक जगात त्याला दंगली म्हणतात. पण ते कायदेशीर दृष्ट्या गुन्हा आहे हे अधिक महत्वाचे. त्यांच्यावर कारवाई होते हे महत्वाचे. आणि हे आता तरी निदान आपण थांबवले पाहिजे. देशात एक मंदिर आणि एक मशीदही नसल्याने कोणाला काहीही फरक पडणार नाही. परंतु एका स्थळाचा मुद्दा हा राष्ट्रीय रूप धारण करतो किंवा केला जातो. तेंव्हा तिथे न्याय देणे कठीण ...