पोस्ट्स

बौद्धिक दशहतवादी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ज्यावेळी विनोद पिण्याच्या पाण्यासाठी मस्जिदीमध्ये गेला.....

इमेज
   दुपारची वेळ होती. दिवस उन्हाळ्याचे होते. अभ्यासिकेत सर्वजण जेवण करून दुपारची वामकुक्षी टेबलावर डोके ठेवून घेत होते. अभ्यासिकेशेजारी असणाऱ्या मशिदीमध्ये दुपारच्या आजानमुळे जे पेंगत होते त्या सर्वांची उठण्याची वेळ झाली होती. अभ्यासिकेच्या काही अतंरावर मशीद असल्याने होणाऱ्या आजाणच्या स्पीकरच्या आवाजावर कुणीही त्रागा केलेला कधी जाणवला नाही. उलट या आजाण च्या वेळेवर जेवण, चहा, आणि संध्याकाळी घरी जाण्याची वेळ ठरत असतं.    त्या दिवशी अभ्यासिकेत पाण्याचा तुटवडा होता. जेवणाच्या वेळेनंतर पाणी संपले होते.   पाण्याच्या विवंचनेत आपल्या मुस्लिम सहकारी मित्राचा पाण्याने धूतलेला प्रफुल्लित चेहरा पाहून विनोद म्हणाला 'अरे कुठून आला? ' 'मशीदी मधून'  'पाण्याची सोय असते?' 'हो' 'मला जाऊन देतील? ' मित्र गावाकडील असल्याने मस्जिदमध्ये एकदा तिरकट म्हतारा असेल जो पाणी भरून देणार नाही. या विवंचनेत होता.  'ठीक आहे आपण जाऊ' विनोद आणि तो सोबत गेले.  दरवाज्यातून आत शिरताना नमाज पडून शेवटी बाहेर येणारे मौलवी आणि मस्जिदीचे काही जबाबदार नमाजी बाहेर पडत होते. ...

मुस्लिमांचे शासकीय नोकरीमधील प्रमाण आणि विदूषक प्रसारमाध्यमे

इमेज
प्रशासकीय सेवेत मुस्लिमांचे प्रतिनिधित्व केवळ साडेतीन टक्के आहे. कधीकधी हा आकडा साडेचार-चार टक्केपर्यंत पोहोचतो.  परंतु असे असूनही विकृत मनोवृत्तीचे  'भगवधारी' अँकर नोकरशहा वर्गाविरुद्ध द्वेष पसरवण्याचं काम करत आहे.नोकरीत असलेले इतके अल्प प्रमाण त्यांना टोचत आहे. अलीकडेच देशातील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये प्रथम क्रमांकावर असलेल्या भारतातील विद्यापीठाच्या शिक्षणाविषयी प्रश्न उपस्थित करत होते. ते यूपीएससीत निवडलेल्या मुलांविरुद्ध नोकरशाही_जिहाद  म्हणून तसेच विद्यापीठाच्या विरोधात विष ओकत आहेत.   अशा प्रकारचे चॅनेल कोण पाहतो? हे सांगून काही विचारवंत याकडे दुर्लक्ष करतील.  कोण पाहतो, कोण पाहत नाही?  हा प्रश्न नाही.  एक मोठा वर्ग त्याला पहात आहे, त्याच्यावर विश्वास ठेवत आहे, आणि त्याला व्हॉट्स अँप युनिव्हर्सिटीच्या वर्गातदेखील फॉरवर्ड करत आहे.  टीव्ही स्टुडिओच्या विदूषकांनी निर्माण केलेला द्वेष पुढील वीस वर्षात या देशाच्या नुकसानाची पूर्तता करु शकेल म्हणणे  कठीण आहे.   एका  समुदायाविरुद्ध, समाजात पसरलेल्या विषाचा दुष्परिण...

तब्लिगीवर मुंबई कोर्टाच्या निकालाने स्पष्ट झालं कि बौद्धिक दशहतवाद्यानी भारतीयांच्या मेंदूवर हल्ला केला.

इमेज
कोरोना काळात मुंबई उच्च न्यायालयाने तबलीगी जमातच्या परदेशी सदस्यांना ‘दिलासा’ दिला.  कोर्टाचा असा विश्वास आहे की सरकारने जमातला बळीचा बकरा बनविला.  न्यूज चॅनेल्स आणि प्रिंट मीडियाने त्याला बदनाम करण्यासाठी आणि संक्रमणाचा प्रसार करण्यासाठी त्याच्यावर दोषारोप करण्यासाठी प्रचार केला.  कोर्टाने याबाबत सरकारला खडसावून याबाबत योग्य उपाययोजना करण्याबाबत सुनावले आहे.यासाठी  नुकसान भरपाई देण्यासाठी सकारात्मक पावले उचलणे आवश्यक आहे.  पण प्रश्न असा आहे की कोर्टाच्या या सल्ल्याचे पालन कोण करेल?  कोरोना बॉम्ब, कोरोना जिहाद असे कार्यक्रम चालवून समाजाला विष देणारे  मुंबई हायकोर्टाच्या सल्ल्यावरच ते लोक पाळतील काय?  माध्यमांच्या त्या बौद्धिक दहशतवाद्यांनी पसरलेल्या विषाचा दुष्परिणाम समाजासमोर आला.  याची सुरुवात दिल्लीच्या बावाना येथील रहिवासी मेहबूब अलीपासून झाली जो जमातहून परत आला होता आणि त्याच्या  गावच्या ग्रामस्थांनी त्याला कोरोना पसरल्याबद्दल मारहाण केली.  उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील चितेरा गावात मीडियाने तयार केलेला 'राष्ट...