ज्यावेळी विनोद पिण्याच्या पाण्यासाठी मस्जिदीमध्ये गेला.....
दुपारची वेळ होती. दिवस उन्हाळ्याचे होते. अभ्यासिकेत सर्वजण जेवण करून दुपारची वामकुक्षी टेबलावर डोके ठेवून घेत होते. अभ्यासिकेशेजारी असणाऱ्या मशिदीमध्ये दुपारच्या आजानमुळे जे पेंगत होते त्या सर्वांची उठण्याची वेळ झाली होती. अभ्यासिकेच्या काही अतंरावर मशीद असल्याने होणाऱ्या आजाणच्या स्पीकरच्या आवाजावर कुणीही त्रागा केलेला कधी जाणवला नाही. उलट या आजाण च्या वेळेवर जेवण, चहा, आणि संध्याकाळी घरी जाण्याची वेळ ठरत असतं. त्या दिवशी अभ्यासिकेत पाण्याचा तुटवडा होता. जेवणाच्या वेळेनंतर पाणी संपले होते. पाण्याच्या विवंचनेत आपल्या मुस्लिम सहकारी मित्राचा पाण्याने धूतलेला प्रफुल्लित चेहरा पाहून विनोद म्हणाला 'अरे कुठून आला? ' 'मशीदी मधून' 'पाण्याची सोय असते?' 'हो' 'मला जाऊन देतील? ' मित्र गावाकडील असल्याने मस्जिदमध्ये एकदा तिरकट म्हतारा असेल जो पाणी भरून देणार नाही. या विवंचनेत होता. 'ठीक आहे आपण जाऊ' विनोद आणि तो सोबत गेले. दरवाज्यातून आत शिरताना नमाज पडून शेवटी बाहेर येणारे मौलवी आणि मस्जिदीचे काही जबाबदार नमाजी बाहेर पडत होते. ...