पोस्ट्स

कोल्हापूर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कोल्हापूरची बैतूलमाल कमीटी माणुसकीसाठी आली पुन्हा धावून

इमेज
राजापूर मधील एक वयोवृद्ध आपल्या मुलासह पाठीच्या उपचारासाठी कोल्हापूर ला दोन दिवसापूर्वी आले होते. त्यापैकी वयोवृद्धाची कोरोना चाचणी पाॅझीटीव्ह आली व मुलाची निगेटीव्ह. दोघांना सीपीआर मध्ये आणण्यात आले. बाप आणि मुलगा विभक्त झाले.अशातच वयोवृद्ध वडीलाचे निधन झाले.  राजापूर आम. हूस्नबानो खलीफे , नगराध्यक्ष जमीर खलीपे यांनी कोल्हापूर येथील त्यांचे मित्र नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांना संपर्क साधून अॅम्ब्यूलन्स व्यवस्था करणेची विनंती केली. कोरोनामुळे कोणीही तयार झाले नाही आणि प्रवासाची परवानगी  मध्ये देखील प्रशासनिक अडचणी होत्या. सकाळी 11 पासून तौफीकभाई, राजू नदाफ, जाफर मलबारी हे बैतूलमाल कमिटीचे  व सीपीआर मधील  बंटी सावंत ,अमित चौगूले (बंटीसाहेबांचे सहाय्यक) यांनी प्रयत्न सूरू केले.  मृतांचे काही नातेवाईक देखील आले. मुस्लिम बोर्डींगशी संपर्क साधून त्यांची परवानगी घेतली. प्रशासनाने पण यासाठी हालचाली सुरू केल्या. इकडे मृताचा मुलगा पन्नास हजार रुपये देणेस तयार झाला तरी कोणी चालक तयार झाले नाही. दुपारी बागलचौक येथेच दफनविधी करण्याचा निर्णय प्रशासनाने ...