पोस्ट्स

कोरोना लेबलसह पोस्ट दाखवत आहे

रेहमान फौंडेशनचा जयसिंगपूर मध्ये अभिनव उपक्रम

इमेज
 काहीसा अनुभव आज आला अंकली पुलाला लागूनच उदगाव गावची वैकुंठधाम स्मशानभूमीत आज हृदय हेलावून टाकणारे चित्र बघायला मिळाले.   याठिकाणी सहा ते सात मुस्लिम समाजातील तरुण कार्यकर्ते गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अहोरात्र आपल्या मानवजातीचे ऋण, या देशाचे कर्तव्य पार पाडत असताना दिसले. रेहमान फाऊंडेशन व चांदतरा मोहल्ला मस्जिद कमिटी,जयसिंगपूर या संस्थेचे हे कार्यकर्ते गेल्या चार ते पाच महिन्यापासून देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटामध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे ते अंत्यविधी करत आहेत, प्रत्येक धर्माचे नियम,चालीरीती,रूढी,परंपरा या वेगवेगळ्या असतात पण हा महाभयंकर रोग कुठलाही धर्म बघत नाही किंवा कुठली जात बघत नाही.यात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना जवळ देखील येता येत नाही,पण या फाऊंडेशन च्या कार्यकर्ते अगदी प्रामाणिकपणे त्या शवाची योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार करत आहेत,याबदल्यात या संस्थेच्या कार्यकर्ते कुठल्याही प्रकारचा मोबदला घेत नाहीत. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात त्यांना देशाची सेवा केल्याचं समाधान मात्र यातून मिळते आहे. त्यांच...

हिंदू धर्माच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी मदतीला धावून गेले मुस्लिम युवक.

इमेज
आज पहाटे सहा वाजता परळी तालुका सुधागड जिल्हा रायगड येथील रहिवासी संजय कदम (वयं 46 वर्ष)  यांचे रोहा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोविड १९  मुळे निधन झाले. आणि  त्यांचा मुलगा आणि मेहुणे प्रवीण गायकर यांना मदत करण्याचा पुढाकार रोहा अष्टमी येथील (मन्सूर नाडकर, एजाज वास्कर आणि जावेद नाडकर ) या तीन मुस्लिम तरुणांनी घेउन त्यांचे अंत्यसंस्कार केले. कोरोना काळात प्रसार माध्यमांनी जेवढ्या प्रमाणात द्वेष निर्माण केला तेवढ्या प्रमाणात भारतीयांनी प्रेमाची बीजे फुलवली.  व द्वेष निर्माण करणाऱ्यांना चोख उत्तर दिले. शेवटी माणूस माणसाच्या मदतीला धावून गेला.

आपल्या सहकारी मित्राच्या कुटुंबियांच्या मदतीला धावून आले महाराष्ट्र पोलीस

इमेज
मरहूम पोलीस नाईक जाकीर शेख, शहर वाहतूक शाखा, सोलापूर शहर यांचं 'कोरोना' या संसर्गजन्य रोगामुळे दुर्दैवी निधन झालं. संकटकाळात पोलिसांच्या मदतीला नेहमी पोलिसच धावून येतात, हा इतिहास ज्वलंत आहे.       पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला 2003 बॅच'चे सर्व पोलिस सदस्यांनी व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून पोलीस हवलदार इक्बाल शेख, सोलापूर ग्रामीण यांच्या हाकेस साथ देऊन मरहूम जाकीर शेख यांच्या कुटुंबीयांना १,५५,०००/- रुपयांची बहुमोल आर्थिक मदत करून एक उत्कृष्ट मैत्रीला साजेल असे काम केले आहे. सर्व पोलीस बांधवांचे करावे तितके कौतुक कमी आहे ज्यांनी आपल्या सहकारी मित्राच्या घरच्यांना संकटाच्या काळात मदत केली. #महाराष्ट्र_पोलीस 

सांगली-कुपवाड महानगरपालिकेच्या सगळ्यात कमी वयाच्या नगरसेविका डॉ नर्गिस सय्यद देत आहेत कोविड रुग्णांना सेवा

इमेज
तस पहायला गेल तर ती उच्चविद्याविभूषित,पेशाने डॉक्टर आणि त्यात भर म्हणजे एक सर्जन ही विद्या सहजासहजी मिळत नसते त्यासाठी अहोरात्र अभ्यास आणि मेहनत करावी लागते.  त्यानंतर स्वतःच अस भव्य अस हॉस्पिटल चालू करून लाखो करोड़ो रूपये कमावता येतात (जे आज आपण पाहतोय).त्यांना ही हे सर्व करता आलं असतं,पण त्यांनी मार्ग निवडला तो राजकारणाचा आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची सर्वात कमी वयाची आणि उच्चशिक्षित, विद्यमान, नगरसेविका होण्याचा मान पटकावला डॉ नर्गिस सय्यद यांनी . गेले ६ महीने कोरोना सारख्या अजस्त्र अशा रोगाने जगभर थैमान घातले आहे ज्याच्या सर्वात जास्त झळा सांगली  मिरज आणि आजुबाजुच्या भागांना अतिशय तीव्र बसत आहेत,अत्यंत द्यनीय अवस्था सुरु आहे. नगरसेविका म्हणून सर्व आवश्यक पाठपुरावा त्या लॉकडाऊन पासून करतच आहेत पण आज कोरोनाचा वाढता आकड़ा लक्षात घेता त्यांनी स्वतः हॉस्पिटल मध्ये लोकांना उपचार देण्याचे ठरवले. आपले सर्व कोरोना डॉक्टर्स, नर्स आणि पूर्ण टीम अहोरात्र प्रयत्न करत आहे परंतु एखाद्या नगरसेवकाने अशा प्रकारचे पाऊल उचलणे अगदी दुर्लभ.   अगदी कमी वय आणि अ...

तब्लिगीवर मुंबई कोर्टाच्या निकालाने स्पष्ट झालं कि बौद्धिक दशहतवाद्यानी भारतीयांच्या मेंदूवर हल्ला केला.

इमेज
कोरोना काळात मुंबई उच्च न्यायालयाने तबलीगी जमातच्या परदेशी सदस्यांना ‘दिलासा’ दिला.  कोर्टाचा असा विश्वास आहे की सरकारने जमातला बळीचा बकरा बनविला.  न्यूज चॅनेल्स आणि प्रिंट मीडियाने त्याला बदनाम करण्यासाठी आणि संक्रमणाचा प्रसार करण्यासाठी त्याच्यावर दोषारोप करण्यासाठी प्रचार केला.  कोर्टाने याबाबत सरकारला खडसावून याबाबत योग्य उपाययोजना करण्याबाबत सुनावले आहे.यासाठी  नुकसान भरपाई देण्यासाठी सकारात्मक पावले उचलणे आवश्यक आहे.  पण प्रश्न असा आहे की कोर्टाच्या या सल्ल्याचे पालन कोण करेल?  कोरोना बॉम्ब, कोरोना जिहाद असे कार्यक्रम चालवून समाजाला विष देणारे  मुंबई हायकोर्टाच्या सल्ल्यावरच ते लोक पाळतील काय?  माध्यमांच्या त्या बौद्धिक दहशतवाद्यांनी पसरलेल्या विषाचा दुष्परिणाम समाजासमोर आला.  याची सुरुवात दिल्लीच्या बावाना येथील रहिवासी मेहबूब अलीपासून झाली जो जमातहून परत आला होता आणि त्याच्या  गावच्या ग्रामस्थांनी त्याला कोरोना पसरल्याबद्दल मारहाण केली.  उत्तर प्रदेशातील ग्रेटर नोएडा येथील चितेरा गावात मीडियाने तयार केलेला 'राष्ट...

कोल्हापूरची बैतूलमाल कमीटी माणुसकीसाठी आली पुन्हा धावून

इमेज
राजापूर मधील एक वयोवृद्ध आपल्या मुलासह पाठीच्या उपचारासाठी कोल्हापूर ला दोन दिवसापूर्वी आले होते. त्यापैकी वयोवृद्धाची कोरोना चाचणी पाॅझीटीव्ह आली व मुलाची निगेटीव्ह. दोघांना सीपीआर मध्ये आणण्यात आले. बाप आणि मुलगा विभक्त झाले.अशातच वयोवृद्ध वडीलाचे निधन झाले.  राजापूर आम. हूस्नबानो खलीफे , नगराध्यक्ष जमीर खलीपे यांनी कोल्हापूर येथील त्यांचे मित्र नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांना संपर्क साधून अॅम्ब्यूलन्स व्यवस्था करणेची विनंती केली. कोरोनामुळे कोणीही तयार झाले नाही आणि प्रवासाची परवानगी  मध्ये देखील प्रशासनिक अडचणी होत्या. सकाळी 11 पासून तौफीकभाई, राजू नदाफ, जाफर मलबारी हे बैतूलमाल कमिटीचे  व सीपीआर मधील  बंटी सावंत ,अमित चौगूले (बंटीसाहेबांचे सहाय्यक) यांनी प्रयत्न सूरू केले.  मृतांचे काही नातेवाईक देखील आले. मुस्लिम बोर्डींगशी संपर्क साधून त्यांची परवानगी घेतली. प्रशासनाने पण यासाठी हालचाली सुरू केल्या. इकडे मृताचा मुलगा पन्नास हजार रुपये देणेस तयार झाला तरी कोणी चालक तयार झाले नाही. दुपारी बागलचौक येथेच दफनविधी करण्याचा निर्णय प्रशासनाने ...

विदेशी तब्लिगीवरील लुक आउट नोटीस मागे घेतल्याची केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती

इमेज
सुप्रीम कोर्टाने तब्लिग जमातीविरुद्ध फेक news प्रकरणावरून केंद्राला फटकारलं ! खूप मोठं प्रश्नचिन्ह सरकार व मीडियावर होत..  यादरम्यान विदेशी तब्लिगीवर भाष्य करणारे मन-से भाष्य करणारे पक्ष यांनी आजून एक गोष्ट लक्षात घ्यावी जे विदेशी नागरिक होते त्यांना महिन्याचा आत येथील प्रशासनाने जाण्यासाठी परवानगी दिली न्यायालयाने देखील याबाबत गंभीर आक्षेप घेतले. त्यांच्यावर काही ठिकाणी दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात आले.  केंद्रसरकारने 6 ऑगस्ट रोजी सांगितले कि 35 देशातील तब्लिगीशी संबंधित नागरिकांना 'लूक आउट' नोटीस मागे घेतल्याची सुप्रीम कोर्टात माहिती दिली.  ब्लैक लिस्ट केल्यानंतर या विदेशी नागरिकांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.  येथील ब्राह्मण्यवादी मीडिया ही गोष्ट ठळक शब्दात दाखवणार नाही.  उज्जैन पत्रिकाने याबाबत बातमी एका छोट्या कोपऱ्यात दिली होती. अनेक खोट्या मिथ्यासह बातम्या दाखवून विशिष्ट समाजाविषयी बातम्या दाखवणाऱ्या मीडियाने ज्याप्रमाणे तब्लिगीवर शिंतोडे उडवले ते निंदाजनक होते.  आज सगळ्या गोष्टी समोर असताना लोकांच्या मनात विष पेरण्याच काम ...

उमरग्यामध्ये ईदगाह कॉरंटाईन सेंटर-मुस्लिम समाजाची एक नई पहल

इमेज
आपण पाहतोय की कोरोना संक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, खबरदारी म्हणून जनतेला घरीच राहा ! सुरक्षित राहा ! असा सल्ला व वेळो वेळो लॉकडाऊनची आमलबजावणी करून ह्या संक्रमणाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु परिणामी संक्रमण थांबायचे काय नावच घेईना वाढता धोका लक्षात घेऊन प्रशानकोविड सेंटर व विलगिकरण  केंद्रांची पर्यायी व्यवस्था करतच आहे, परंतु संख्या इतक्या झपाट्याने वाढत आहे आणि हा रोग संक्रमणाचा असल्याने म्हणावी तशी व्यवस्था करण्यासाठी   प्रशासनाला काय  कसरत करावी लागत असेल याची कल्पना आपण करू शकतो. पोलीस सुव्यवस्था  प्रदान करणे , आरोग्य विभाग वैद्यकीय सेवा देणे,  व महसूल विभाग सर्व नियोजन करणे हे कामे चोख पणे पार पाडत असताना, कोविड सेंटर ची संख्या वाढत असताना कदाचित पेशंट ची गैर सोय होत असेल. तर त्याला पर्याय म्हणून सामाजिक व्यक्तींनी पुढे येणे ही आजच्या घडीची गरज आहे.  आणि  म्हणूनच मुस्लिम समाजातील  तरुणांनी  विचार केला की आता आपल्याला खरच जर समाजा साठी कांही तर करायचे असेल , नुसते सल्ले देऊन सोशल मीडियाच्या...

साताऱ्याचे सुपुत्र मुंबई पोलीस निरीक्षक आझम पटेल यांचा कोरोनामुळे मृत्यू.

इमेज
सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील कन्हेरी गावचे सुपुत्र मुंबई येथे पोलीस दलातील  एसीपी या पदावर कार्यरत असलेले आजम युसुफ पटेल यांचे  करोना या आजारामुळे त्यांचे मुंबईमध्ये निधन झाले. खंडाळा तालुक्यातील कार्यशील अधिकारी आपल्यातून निघून गेला फारच दुःखदायी घटना तपासणी कौशल्यासाठी परिचित असलेले पोलिस निरीक्षक आझम पटेल हे कोविडमुळे  बळी गेलेल्या शहर पोलिसांतील चौथे पोलिस अधिकारी झाले.   राज्य गुप्तचर विभागाशी (एसआयडी) संलग्न असलेल्या पटेल यांना सैफी रुग्णालयात दाखल केले.  बुधवारी पहाटे त्यांचे निधन झाले.  त्याला निमोनिया देखील झाला होता. 2001 च्या तुकडीचे अधिकारी पटेल हे कोरोना व्हायरसमुळे मरण पावले गेलेले शहर पोलिसांचे 55 वे पोलिस ठरले.  गेल्या चार महिन्यांत राज्यभरातील 108 पोलिसांचा साथीच्या आजारामुळे मृत्यू झाला आहे.  त्यांच्या मृत्यूमुळे त्यांचे सहकारी आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी यांच्यात हादरा पसरला आहे ज्यांच्या अंतर्गत त्यांनी पटेल यांना तंदुरुस्त अधिकारी मानले होते.    त्यांनी 26/11 च्या हल्ल्याच्यावेळी  पाकिस्ता...

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारा या मागणीसाठी इंन्साफ युथ फाउंडेशनचे परभणी थाली बजाव आंदोलन.

इमेज
इन्साफ युथ फाउंडेशन परभणी यांच्यावतीने सार्वजनिक आरोग्य जिल्हा रुग्णालयात अपुऱ्या सुविधेमुळे थाळी बजाव आंदोलन करण्यात आले.ऑक्सिजन मिळत नसल्याची तक्रार समाज माध्यमावर प्रसारित करणाऱ्या करोना रुग्णाचा काही दिवसांनी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील करोना कक्षात मृत्यू होतो,प्रत्यक्ष करोनामुक्त झालेल्या महिले ऐवजी दुसऱ्याच महिलेला रुग्णालयातून सुट्टी दिली जाते,तर एका प्रकरणात सुरुवातीला सकारात्मक निघालेला रुग्ण पुन्हा चक्क नकारात्मक निघतो आणि त्याला सुट्टी द्यावी लागते.  परभणी जिल्हा सरकारी दवाखान्याच्या बेफिकरीचे असे अनेक नमुने गेल्या काही दिवसात दिसून आले आहेत.त्यामुळे परभणी जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.  करोना प्रार्धुभावच्या संकट काळात अनेक नागरिक किरकोळ आजार असताना हि जिल्हा रुग्णालय येण्याचे प्रमाण  कमी झाले आहेत.परभणी जिल्हा रुग्णालयातील बाहय रुग्ण नोंद पहिली असता सहज लक्षात येते आसल्याचे म्हणणे इन्साफ फौंडेशनचे आहे .अत्यंत गंभीर आजार अगर दुखणे असणाऱ्या रुग्णांना देखील करोना संकटाच्या सबबी खाली परभणी जिल्हा रुग्णालय...

उस्मानाबाद मध्ये मुस्लिम समाजातर्फे पहिल्या मोहल्ला क्लीनिकाचे उदघाटन.

इमेज
आज उस्मानाबाद शहरामध्ये खाँजा नगर भागातील आक्सा चौक येथे मुस्लिम समाजाच्या वतिने मोहल्ला क्लिनिक  रोग निदान व मोफत सेवा सुविधा केंद्र शाखा क्रमांक-1 चे उद्याटन करण्यात आले.  या सुविधा केंद्रामध्ये येणा-या गरजु लोकांच्या उपचारासाठी लागणा-या सर्व गोळया औषधांचा पुरवठा नगर परिषदे च्या वतिने करण्यात येईल असे आश्वासन मा. नगराध्यक्ष श्री. मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांनी दिले.   अशा प्रकारचे क्लिनिक प्रत्येक प्रभागात ही तयार केले तर तेथेही लागतील तेवढ्या गोळ्या औषधांचा पुरवठा करण्यात येईल असे ही यावेळी म्हणाले व  झालेला आजार  जसे सर्दी, खोकला,  ताप, डोकेदुखी या प्रकारचे आजार अंगावर न घेता दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत असे आवाहन नागरिकांना केले.  या कोरोना च्या पार्श्वभूमीवर काम करत असलेल्या  मोफत उपचार व सुविधा देणा-या डॉक्टरांचे व मोहल्ला क्लिनिक स्थापन करणा-या सर्व  सदस्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.  या उद्याटन समारंभ प्रसंगी धर्मगुरु, तहसिलदार श्री.गणेश माळी साहेब, जिल्हा शल्यचिकत्...

गुजरातच्या मुस्लिम व्यापाऱ्याने आपले आलिशान कार्यालय दिले कोरोना रुग्णांना

इमेज
सुरत चे व्यापारी कादीर शेख यांना मागील महिन्यात  कोरोना झाला..... ते ठीक झाले पण दवाखान्यातील स्थिती आणि खर्च पाहून गरिबांसाठी त्यांचे मन व्यथित झाले.  शेख साहेबांनी आपले 30 हजार स्क्वायर फिटचे  लक्जरी ऑफिस 85 बेडच्या हॉस्पिटलमध्ये कन्व्हर्ट केले. जेथे गरीब पेशंटचा इलाज होतो.  त्यांच्या कार्याला सलाम ! #गुजरात #सुरत #कोरोना #मुस्लिम