प्रतीकात्मक कुर्बानीची ढोंगी अजेंडे बाळगणाऱ्यानी किमान एक मुस्लिम कुटुंब शिक्षणासाठी दत्तक घ्यावं :-अब्दुल शेख
अब्दुल शेख मी ग्राउंड लेव्हल ला बघतोय ,मुस्लिम समाजाची आर्थिक परिस्थिती खुपच खालावलेली आहे.(तशी ती सध्या प्रत्येकाचीच आहे ).अशा वेळेस काही पांढरपेशी आणि मुस्लिमदोषी लोक मुस्लिमांनी प्रतिकात्मक कुर्बानी द्यावी अशी आव्हान करत , प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्याला घरात खायला किराणा नाही , तर तो कुर्बानी कोठून देईल. बर तुमचं ऐकायाच म्हणजे , जर एखाद्या व्यक्तीने प्रतिकात्मक कुर्बानी दिली तर त्या व्यक्तीच्या घरी कोणी किराणा आणून देईल का ? त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणाचा खर्च कोणी उचलेल का ? चार पुस्तके वाचून , दोन चार पुस्तकांचा रट्टा मारून डिग्री घेऊन , मुस्लिम समाजाचा मासिहा नका बनू . प्रत्येक सण साजरा करण्यामागे बरीच कारण आहेत , खाद्य संस्कृती म्हणून आपण विचार केला तर गुढीपाडवा ला पुरणपोळी , दिवाळी ला फराळ , नाताळ मध्ये अजून काही तरी वेगळं तसच बकरी ईद ला मटण हे चालत आलय ,(तुलना फक्त खाद्य संस्कृती असलेला बदल दर्शवते , जातीत किंवा धर्मात तुलना नव्हे) ह्या वेगळ्या खाद्य संस्कृती प्रोटीन किंवा अन्य गोष्टी ज्या...