बंधूंनो भविष्याचा वेध घ्या ! दगड लागतो म्हणून विट मारून घेऊ नका - मराठी मुसलमान

सत्ता बदलली तरी मुस्लिमांच्या परिस्थितीत काही बदल घडणार आहे का ? द्वेषाची तीव्रता संघ प्रणित  भाजपा सत्तेत आल्यानंतर मुस्लिमांना दिसू लागली. ह्या द्वेषाच्या बीजाचा काटेरी वृक्ष आगोदर नव्हता का? गेल्या 70 वर्षात राजकीय चुली चे इंधन मुस्लीम समाज राहिला आहे.
   उद्या समजा आत्ता सत्तेत असणारे पाय उतार झालेले उद्या सत्तेत आले तर मुस्लीम समाजाच्या परिस्थितीत काय बदल होणार आहे? 
   या प्रश्नावर दोन मिनिट थांबून थोड चिंतन करा. मुस्लीम समाजाला आर्थिक , सामजिक , शैक्षणिक दृष्टीने  खच्चिकरण करणारे जे शासन प्रायोजित उघड करत होते ते छुप्या पद्धतीने करतील किंवा पुरोगामित्वाचा समाजसुधारणेच्या आडून नेहमी नुकसान करत राहतील.
   काय मुस्लीम समाजाच्या अर्थिक सामजिक सुधारण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न केला जाईल? 
 मुस्लीम समाज नेहमी भावनिक राजकारणाला बळी पडत गेला आहे. आज जो सत्ता संघर्ष दिसतो त्याला तुमच्या प्रश्नाला काहीही देणंघेणं नाही.
 आज तुमच्याकडे पाहताना तुम्हाला हक्क अधिकार किंवा वाटा देण्याची भूमिका आहे का ? कि तुमच्याकडे भाजपाने पिडलेले आश्रित म्हणुन पाहण्याची भुमिका आहे.
लक्षात ठेवा दगड उपयोगाचा म्हणून डोक्यात मारून घेणे गाढवापणाचे  जसे लक्षण आहे तसे विट आहे मऊ आहे म्हणुन डोक्यात मारून घ्यायची की पायात ठेवून पाया मजबूत करायचा हे मुस्लीम समाजाला ठरवावं लागणार आहे.

मुस्लीम समाजाने कुठे तरी राजकीय एकत्र येऊन योग्य अशी राजकीय पाऊले टाकली पाहिजेत.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...