टिपू सुलतान आम्हाला तूजा प्रचंड अभिमान आहे... !
टिपू सुलतान त्या मोजक्या राज्यकर्त्यांमधून आहे जो इंग्रजांसमोर एक शूर योद्धा म्हणून उभा राहीला,निडरतेने इंग्रजांविरुद्ध लढला आणि लढता लढता शहीद झाला!
टिपू सुलतानला आज ब्राह्मणवाद्यांकडून,आरएसएसकडून आणि भाजपाकडून विरोध होण्याचं कारण इतकंच आहे की सगळ्यात अगोदर इंग्रज आपल्या भूमीसाठी वाईट आहेत,त्याचं इथे राज्य निर्माण होणे हे आपल्या सगळ्यांसाठीच व आपल्या भूमीसाठी
अहितकारक आहे.सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांच्याविरुद्ध लढत पाहिजे. ईस्ट इंडिया कंपनीच वाढणं धोकादायक आहे आणि त्यासाठी टिपूने स्वतःहा पुढाकार घेऊन मराठ्यांना व निजामला पत्रव्यवहार करून हे सांगितल.टिपूने स्वतःहा इंग्रजांच्या विरुद्ध युद्ध केले,इंग्रजांच्या नाकी नऊ आणले.भूमीसाठी अन्यायाविरुद्ध लढता लढता रणांगणात शहीद झाला मात्र माघार घेतली नाही,इंग्रजांसमोर झुकला नाही!
टिपू सुलतान म्हणजे एक आदर्श प्रजाहितवादी,प्रचंड दूरदृष्टी असणारा राज्यकर्ता होता.शेतकऱ्यांसाठी त्या काळी नवनवीन व शेतकरी हिताचे धोरण त्याने त्याच्या राज्यात राबवले.अस्पृश्यते विरुद्ध लढला,जातीधर्माच्या नावाने कधी भेद केला नाही.मंदिरांना देणग्या तो द्यायचा.गोरगरिबांसाठी कल्याणकारी योजना तो राबवायचा.
त्याच्या राज्यात त्याने सविस्तर सर्वेक्षण आणि वर्गीकरणावर आधारित भू-महसूल यंत्रणा तयार केली,ज्यामुळे कर पद्धत सुधारली गेली ज्याने राज्याच्या संसाधनाचा मार्ग विस्तृत झाला.त्याने शेतीचे आधुनिकीकरण केले, पडीक जमीन विकसित करण्यासाठी कर खंडित केला, सिंचन पायाभूत सुविधा बांधल्या आणि जुनी धरणे दुरुस्त केली,कृषी उत्पादन व रेशीम संवर्धनास चालना दिली.
त्याने व्यापाराला आधार देण्यासाठी नौदल बांधले आणि कारखाने उभारण्यासाठी “राज्य कमर्शियल कॉर्पोरेशन” ची स्थापना केली. म्हैसूरचे चंदन, रेशीम, मसाले, तांदूळ आणि गंधक यांचा व्यापार केल्यामुळे टिपूच्या राजवटीत व परदेशातही जवळपास 30 व्यापार चौकी उभारण्यात आल्या होत्या.
टिपूने आपल्या सैन्याची पुनर्रचना केली, नवीन तंत्रज्ञान वापरले,युद्ध मैदानावरील तो उत्कृष्ट स्टॅटर्जी मेकर होता.टिपू सुलतानने युद्धात रॉकेट तंत्रज्ञानाचा मोठा वापर केला.म्हणूनच टिपूचा मिसाईलमॅन म्हणून देखील गौरव केला जातो.
मात्र विशिष्ट विचारधारेच्या तथाकथित लेखकांच्या हातून काल्पनिक इतिहास लिहला गेला.ज्यामध्ये टिपू सुलतानला सगळ्या बाजूने बदनाम करून सोडणारा इतिहास लिहला गेला.आणि पुढे ब्राम्हणवादी संघटनाकडून त्याचा प्रचार-प्रसार केला गेला.बहुजनांच्या डोक्यात कट्टरता रुजवणाऱ्या संघाच्या मार्फत देखील त्याचा प्रचार-प्रसार केला गेला आणि आजही केला जातोय.
मात्र खोट्या लोकांनी सत्याला नाकारलं म्हणून सत्य कधी खोटं ठरत नाही हे देखील लक्षात घेतलं पाहिजे!
तो माणूस म्हणून महान होता, राज्यकर्त्या म्हणून महान होता,योद्धा म्हणून महान होता आणि धोरणकर्ता म्हणून महान होता!
टिपू सुलतान तुझा आम्हाला प्रचंड अभिमान आहे!❤️
जयंतीदिनानिमित्त स्मृतीस विनम्र अभिवादन!🥰
#टिपूसुलतान #TipuSultan #जयंती
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा