मराठी मुसलमान टिमची उद्दिष्ट्ये
मराठी हि महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाची व्यवहाराची भाषा आहे. लोकांपर्यंत आपण या भाषेद्वारे सहज पोहचू शकतो.मराठी मुसलमान एक सोशल मिडीया टिम म्हणून कार्य करते.समाजासाठी कार्य करणाऱ्या लोकांची मोट बांधण्याचं तसेच देशाचं संविधान, राष्ट्रप्रतीके यांच्याबाबत अभिमान बाळगून देशसेवेसाठी समर्पित समूह निर्माण करणे हे आमचे ध्येय आहे.
मराठी मुसलमान सोशल मीडिया टिमची उद्दिष्टे
🌺मुस्लिम समाजात असंख्य चांगली कामे केली जातात. अनेक स्वयंसेवी संस्था, NGO आहेत. मुस्लिम समाजात अनेक लेखक,कवी आहेत. आपापल्या क्षेत्रात ठसा उमटवणारे शिक्षक, विद्यार्थी, शिक्षक, इंजिनियर आहेत. अनेक सुशिक्षित लोक आहेत त्यांचे कार्य अनमोल आहे. त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचं काम मराठी मुसलमान टिम करते.
🌺आज मुस्लिम समाजाची कोणतीही वृत्तसंस्था नाही. कोणतीही प्रसारमाध्यमे नाहीत. मराठी भाषिकांपर्यत मुस्लिम समाजाचं मन पोहचवणारी कोणतीही व्यवस्था नाही कोणत्याही स्थानिक भाषेतील वृत्तसंस्था त्या पोहचवण्याचं काम करत नाहीत.ते पोहचवण्याचं काम आम्ही करत असतो.
🌺मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्नावर देखील आम्ही आवाज उठवत असतो.
🌺मुस्लिम समाजाचा शिक्षण-आरक्षण-संरक्षण-रोजगार हा महत्वाचा प्रश्न असून या प्रश्नावर जागृत करण्याचे काम आणि एकमेकांना मदत करण्याचे काम मराठी मुसलमान टिम करत असते.
🌺आपण मुस्लिम महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाशी संबंधित लेख किंवा साहित्य आमच्यापर्यत पोहचवू शकता.
🌺आपण कोणतीही सामाजिक कार्य करणारी NGO अथवा राजकीय पक्षाशी निगडित असला तरी आपल्या कार्याची माहिती प्रसिद्धीसाठी आमच्याकडे पाठवू शकता. ती राजकीय नसावी.
🌺मुस्लिम समाजातील स्थानिक नेतृत्व एखाद्या मुस्लिम समाजाशी निगडित प्रश्नाविषयी आवाज उठवू शकत नाहीत. आपण नवयुवकांच्या साहाय्याने त्यासाठी आवाज उठवू शकता. त्यासाठी सल्ला आणि मार्गदर्शन तसेच मदत करण्याचा प्रयत्न आमचा असेल.
🌺शासन दरबारी मुस्लिम प्रश्नांची दखल घ्यावी यादृष्टीने संविधानिक मार्गाने आवाज उठवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
🌺आजपर्यंत आपल्या सर्वांच्या प्रेमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपण फेसबुक पेजच्या माध्यमातून पोहचलो असून आपल्या सूचना आमच्यासाठी महत्वाच्या असतील. आपल्या सूचनांसाठी आमचा वॉट्सअप क्रमांक 7249124871 असून आपल्या सूचनांची आमलबजावणी केली जाईल..
🌺आपण आमच्यासोबत आमच्या कार्यात सहभागी होणार असाल तर आपलं
नाव
पत्ता -- (पत्रव्यवहारासाठी परिपूर्ण असा पत्ता )
व्यवसाय --
7249124871 या क्रमांकावर पाठवावा.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा