हॉस्पिटल बांधले तर बहुसंख्याकाचा दृष्टिकोन बदलेल?

मोबाईल मध्ये जास्त करून वॉट्सअप फेसबुक स्टेटस पाहत नाही.   नेहमीप्रमाणे 5 ऑगस्टला फेसबुक स्टेटस पाहिलं स्टेट्सला जवळच्या मित्राचं रामाचा उग्र अवतार पाहून जरा वेगळंच वाटलं. प्रत्येकाच्या स्टेटसला उग्र युद्धास सज्ज धनुष्य ताणलेला रामाचा फोटो एका वेगळ्या वातावरणाची नांदी वाटत होता. 
लहानपणापासून गांधींच्या भजनातील 'रघुपति राघव राजा राम ' हा आध्यात्मिक राम नेहमीच भावायचा.संध्याकाळपर्यत स्टेटसचं स्वरूप 'रामाच्या धनुष्य ताणलेल्या फोटो पासून ते 'राम मंदिर झांकी है, काशी-मथुरा बाकी है ' पर्यत पोहचल होत. या सर्वात भाजपाच्या अंधभक्तांचा विषय वेगळा होता पण स्वतःला पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी मधील मित्रांच्या स्टेटसला देखील गांधीजीच्या भाजनातील राम न दिसता तोच धनुष्य ताणलेला बाण दिसला. असो जवळच्या मित्रांबाबत तो त्यांच्या धार्मिक आस्थेचा, श्रद्धा यांचा विषय समजून मनाची समजूत करावी लागली. 
नंतरच्या काळात सोशल मीडियावर एकच आवई उठली. 
सुन्नी वक्फ बोर्ड मशिदीच्या 5 एकर जागेवर हॉस्पिटल बांधणार. पाच एकर जागेत हॉस्पिटल किंवा मस्जिददेखील बांधून मुस्लिमांचे प्रश्न सुटणार आहेत का?  ज्या बहुसंख्याक लोकांची मुस्लिमांबद्दल मानसिकता बनवली गेली आहे ती बदलणार आहे का? मुस्लिमांच्या संस्कृतीक प्रतिकांवर होणारा हल्ला हा निराशजनक आहे.  एकीकडे लिबरल, कॉम्युनिस्ट, पुरोगामी देखील संधी मिळताच या हल्ल्यात सहभागी होतात. शिक्षण, रोजगार,  अर्थव्यवस्था या प्रश्नांना बाजूला सारून धार्मिक द्वेष मनात बाळगून चवताळून उठणारे चेहरे ओळखीचे दिसायला लागलेत. कालच सिकर मध्ये 'मोदी जिंदाबादचा' नारा दिला नाही म्हणून मुस्लिम वृद्ध रिक्षाचालकास मारहाण करण्यात आली. एका मस्जिदीवर भगवे झेंडे लावण्यात आले.
हिच बहुसंख्य लोकांची मानसिकता तयार करण्यास भाजपा-संघ यशस्वी झालाय. 
येणाऱ्या काळात सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अस्तित्व टिकवायचं असेल तर राजकीय दिशा निश्चित करणारी धोरण मुस्लिमांनी आखायला शिकलं पाहिजे. 
हॉस्पिटल बनवून लोकांच्या मानसिकतेत बदल करू शकता तर हे साफ चुकीचं आहे.कोणत्याही गोष्टीकडे पाहण्याचा 'सेल्फ डिफेन्सिव्ह' दृष्टिकोन बदलून आपल्या सामाजिक, आर्थिक, राजनैतिक उन्नतीसाठी कृतिकार्यक्रम आखला पाहिजे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...