कबर खोदणाऱ्याचा अपंग मुलगा जिल्हा न्यायाधीश


कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील जामखंडी हे  न्यायाधीश एस ए ए आर औटी यांचे जन्मगाव.  घरी अठराविश्व दारिद्र्य.पोट भरण्यासाठी औटी यांचे कुटुंब इचलकरंजी कोल्हापूर येथे स्थायिक झाले होते . 

घरी पाच मुली आणि दोन मुले.संसाराचा गाडा हाकण्यासाठी औटी यांच्या आई शेजारील लोकांच्या धुणेभांडी करण्याचं काम करायच्या तर वडील मुस्लिम समाजातील लोक मयत झाल्यावर त्यांच्या कबरी खोदण्याचे काम करायचे. 

त्यातच लहानपणी एस ए ए आर औटी यांना लहानपणी पोलिओ झाला होता. कायमचे अपंगत्व, अंथरुणात खेळलेले शरीर.जवळपास आकरा वर्षे अंथरुणातच खिळवून काढले. 

इयत्ता पहिलीत बाहेरून प्रवेश मिळवला होता. मित्रांच्या नोट्सवर अभ्यास करून इयत्ता दहावीपर्यत मजल मारली. पायावर कसेबसे उभे राहण्याची ताकद आल्यानंतर वर्तमान पत्र टाकणे, लॉटरीची तिकिटे विकणे हि कामे करत वकिलीची पदवी घेतली. 

वकील झाल्यावर काळा कोट त्यांना दोन वर्षे पैसे नसल्याने घेता आला नाही. नंतर न्यायाधीश परीक्षेचा अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश झाले. 

तालुका विधी सेवा समितीच्या माध्यमातून 2020 मध्ये कराड(सातारा ) येथे  कोरोनाकाळात कार्यरत असताना  प्रत्यक्ष लोकांसाठी स्वतः अपंग असताना मदतकार्य पोहचवले. 
सध्या त्यांची बढती होऊन गोंदिया येथे जिल्हा न्यायाधीश म्हणून बढती झाली आहे. 

त्यांच्या जिद्दीला आणि कार्याला सलाम !

हे पण वाचा :-




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...