क्रिकेटच्या खेळातील साताऱ्याचा पहिला रणजी खेळाडू पठाण !

मराठी मुसलमान
देशाला विश्वचषक मिळवून देण्यासाठी गुजरातच्या पठाण बंधूना कोणीही विसरणार नाही. तसंच वाई शहरातलं क्रिकेट आणि अफझल पठाण ही एकमेकांची आठवण देणारी नावं.
ऊंची आणि शरीरयष्टीचा व्यवस्थित उपयोग करत धडकी भरवणारा रन अप घेत ७ फुटांवरून अफझलभाईंचा येणारा चेंडू अनुभवणं याबद्दल  खरंतर फलंदाजानंच सांगावं.
रणजीच्या त्या सामन्यात सीमारेषेवरून तडक स्टंप्स् वर थ्रो करून सुनिल गावस्करलाही एकदा  धावचीत केलं होत. 
याकाळात अफझल  यांच्याबरोबर  अकिल, शकिल आणि अज्जू हि नावेदेखील साताऱ्यात प्रसिद्ध होती. भारतीय डेनिस लिली असं काहीजण त्यांचं वर्णन करायची. 
महाबँक वाई शाखेत काहीदिवस  काम करण्याची संधी त्यांना मिळाली . कामाच्या ठिकाणी त्यांची  मनमिळाऊ वृत्तीने ते आपलेसे वाटायचे.
सातारा जिल्ह्यातील पहिले रणजी ट्राॅफी खेळाडू आणि त्या काळातील भारतातील सर्वात वेगवान गोलंदाज व नंतरच्या काळात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे निवडसमितीचे सदस्य श्री. अफजल पठाण सर यांनी कार्य पाहिले. आज त्यांचा वाढदिवस !
 वाढदिवसाच्या त्यांना  हार्दिक शुभेच्छा .
अफजलभाई.......
जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...