मुंबई क्राईम ब्रँचचे आयपीएस अधिकारी निसार तांबोळी यांना राष्ट्रपती पुरस्कार

लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळचे सुपुत्र निसार तांबोळी याना उत्कृष्ट कामगिरी बद्दल भारत सरकारच्या वतीने राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला.

निसार तांबोळी हे 1996 पासून सेवेत कार्यरत असून 2006 साली ते आयपीएस झालेले जिल्ह्यातील एकमेव अधिकारी आहेत.आजपर्यंत अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पूर्ण केल्या असून कुठल्याही वादविवादात ना अडकलेले ते एकमेव अधिकारी आहेत.
,हिंगोली,नांदेड,वर्धा,नंदुरबार,अमरावती,नाशिक,मुंबई येथे त्यांनी उत्कृष्ट काम केले आहे.2009 ते 2012 या कालावधीत मुंबई क्राईम ब्रांचमध्ये ते कार्यरत होते,2008 ते 2009 एअरपोर्ट झोन,2015 ते 2017 औरंगाबाद येथे SRPF येथे मुख्य अधिकारी म्हणून त्यांनी महत्वपूर्ण काम केले आहे.
त्यांना यापूर्वी SRPF औरंगाबादचा परिसर स्वच्छ ठेवल्याबद्दल महाराष्ट्र शासनाने गौरविले आहे.

अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या निसार तांबोळी याना भ्रष्टाचारमुक्त भारताची संकल्पना आवडते,स्वच्छ कारभार हा त्यांचा अजेंडा असून आजपर्यंत कसलाही डाग त्यांनी लागू दिलेला नाही.एक डॅशिंग अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा जनमानसात आहे,मुंबई क्राईम ब्रँच साठी दुसऱ्यांदा प्रशासनाने त्यांना पाचारण केले आहे,जिथे पाठवेल तिथे जाऊन आपले कर्तृत्व सिद्ध करण्याची त्यांची तयारी आहे.

त्यांना मिळालेल्या या राष्ट्रपती पुरस्काराबद्दल त्यांचे अभिनंदन...💐

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...