मोटारसायकल मेकानिकच्या मुलीचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न, NEET परीक्षेत गरीबीवर मात करत घेतले 407 गुण…

NEET परीक्षेचे निकाल जाहीर झाले. 13 सप्टेंबर रोजी कोविड-19 चे नियमाचे पालन करत देशभर ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत गरीबीवर मात करत शिक्षणाची जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर जालना शेरसवार नगर येथील रहीवाशी मोटारसायकल मेकानिक मोहंमद युसुफ यांची मुलगी शिफा फिरदौस हिने NEET परीक्षेत 720 गुणांमधून 407 गुण प्राप्त करून प्राविण्य मिळवले आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची तरीही या मुलीला एमबीबीएस डॉक्टर बनून पालकांचे स्वप्न साकार करायचे आहे. त्यासाठी पुढील शिक्षणासाठी नातेवाईक प्रयत्न करणार आहे. एका नामांकित कोचिंग क्लासेसचे शिफाला मार्गदर्शन लाभले. उर्दु ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी या यशात या गरीब कुटुंबाची मदत केली आहे. विशेष म्हणजे शिफाची आई घरात लेडीज कपडे शिवून संसाराला हातभार लावते. त्यांना चार मुली आहे. तेही शिक्षणात पुढे असल्याने पालकांचे नावलौकिक मिळवून प्राविण्य प्राप्त करत असल्याने त्यांचे समाजात अभिनंदन केले जात आहे. कुटुंबाला या आनंदाचे क्षणात शुभेच्छा देण्यासाठी नातेवाईक त्यांची भेट घेत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...