शिक्षणाचे मुहूर्तमेढ रोवणारे सर सय्यद अहमद खान-सुफियान मणियार
"सर सय्यद अहमद खान"
१८५७च्या स्वातंत्र्यसंग्रामानंतर इंग्रजी सत्तेने मुस्लीम समाजाची सर्व केंद्रस्थाने उद्ध्वस्त केली. अनेक सामाजिक, धार्मिक संस्था संपवल्या. प्रशासनातून मुस्लीम समाज बाजूला फेकले गेले. गुणवत्ता शिक्षण देणारे अनेक मदरसे उद्ध्वस्त करण्यात आले. मुस्लिमांवर आलेल्या या संकटाच्या काळात सर सय्यद अहमद खान अस्वस्थ झाले.
मुस्लिमांच्या शैक्षणिक प्रगती व बौद्धिक विकासासाठी सर सय्यद यांनी मोहम्मदन कॉलेजची स्थापना केली नंतर या कॉलेजचे रूपांतर अलिगढ मुस्लिम विद्यापीठामध्ये झाले.मोहम्मदन कॉलेजच्या स्थापना वेळी सर सय्यद यांना अनेक अडचणी चा सामना करावा लागला. इंग्रजांनी मुस्लिम समाज विरोधात टोकाची भूमिका घेतल्यामुळे मुस्लिमात त्यांच्या विरोधात द्वेषभावना होती. इंग्रजी भाषेमुळे आपली संस्कृती व भाषा उद्धवस्त होईल असा समज मुस्लिम समाजात होता त्यामुळे मुस्लिम समाजाने इंग्रज व इंग्रजी भाषेच्या विरोधात टोकाची भूमिका घेतली होती.
अश्या प्रस्तिथीत सर सय्यद यांनी वास्तवाचे भान घेऊन मुस्लिमांना इंग्रिजी भाषेत शिक्षण घेण्याचे आव्हान केले. सर सय्यद यांच्या या भूमिकेला मुस्लिम समाजातून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. त्यांच्या विरोधात फतवे काढण्यात आले,लेख लिहण्यात आले, त्यांना इंग्रजांचा गुलाम म्हणून हिणवले गेले. परंतु सर सय्यद यांनी समाजाला दोष न देता आपला काम सुरु ठेवले.
कॉलेजच्या स्थापनेसाठी निधी(आर्थिक मदत) जमा करण्यासाठी सर सय्यद यांनी नोकरी सोडली, संपूर्ण संपत्ती दान केली व भारतभर पायपीट केली.लोकांसमोर भीक मागितली,स्वतःच्या ग्रंथालयातील ग्रंथ विकले,छायाचित्रे विकले.
अलिगड विद्यापीठासाठी आपली संपुर्ण संपत्ती दान करुन टाकली. तेंव्हा त्यांच्या एका मित्राने त्यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. सय्यद यांनी वृध्दापकाळासाठी काहीतरी राखून ठेवावे अशी त्यांची इच्छा होती. त्यावर सर सय्यद यांनी दिलेले उत्तर मुस्लीम समाजाविषयी त्यांच्या अंतकरणातल्या वेदनेला अधोरेखित करणारे आहे.
ते म्हणाले "मैं यह सबकुछ अपने मुस्तकबील को सवांरने के लिए कर रहा हूं, मैं मेरी कौम के बच्चों का मुस्तकबील जेल की सलाखों के पिछे देख रहा हूं"
महापुरुष काळाच्या खांद्यावर बसून काळापलिकडचं पाहतात ते असे. दुर्दैवाने सर सय्यद यांनी व्यक्त केलेली भिती आज खरी ठरतेय. सर सय्यद यांची अगणित लेकरं आज तरुगांतल्या अंधारात भविष्याशी लढतातहेत.
या वेळी अनेक लोकांनी त्यांना हिणवले, अपमानीत केले पण ते थांबले नाही किंवा समाजाला दोष देत बसले नाहीत. ते निराश झाले नाहीत किंवा समाजातून दुरावले नाही.
त्यागवृत्ती त्यांची ताकद होती. आपल्या जिद्दी व त्यागवृत्तीच्या जोरावर अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी उभी केली. या युनिव्हर्सिटीने देशाला अनेक विद्वान,अधिकारी,राजकीय सामाजिक नेते,स्काॅलर दिले,लाखो लोकांची शैक्षणिक व बोद्धिक भूक मिटवली.
अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीला भारतीय उपखंडातील मुस्लिम शैक्षणिक संस्थानांची आई म्हणणे चुकीचे नाही. दुर्दैवाने मुस्लिम समाजात सर सय्यद नंतर शैक्षणिक क्रांती घडवणारा अवलिया जन्मला नाही.
आजही बरेच लोक मुस्लिम समाजाच्या शिक्षणावर चिंतन करतात, वारंवार मुस्लिमांना अशिक्षित म्हणून हिणवतात परंतु सर सय्यद सारखी त्यागवृत्ती स्विकारण्यास कोणी ही तयार होत नाही, सर सय्यद सारखा संघर्ष करण्यासाठी कोणीही तयार नाही.
समाजातून जर कोणी विरोध किंवा टिप्पणी केली तर समाजाला दोष देतात,समाजावर टीका करतात.
क्रांतीची किंवा बदलावची सुरुवात करण्यासाठी संघटनेची किंवा संस्थेची गरज लागत नाही,व्यक्तिगत पातळी वर काम सुरु करावे लागते.
मुस्लिम समाजाला वाटते की क्रांतीसाठी राष्ट्रीय किंवा राज्य पातळी वर चळवळ सुरु होईल व क्रांती घडेल परंतू स्वतःपासून,गावातून,शहरातून चळवळ सुरू करण्यासाठी प्रयत्न करत नाही.
समाजात शैक्षणिक क्रांती घडवायची असेल तर स्थानिक पातळी वर काम करणे गरजे आहे. स्वतःपासून सुरुवात करा.
चिंतन करायला पाहिजेच फक्त चर्चेला, विश्लेषणाला,चिंतनाला कृतीची जोड दिली तर नक्कीच बदल घडेल.
दुर्दैवाने सर सय्यद यांनी व्यक्त केलेली भिती आज खरी ठरतेय. सर सय्यद यांची अगणित लेकरं आज तरुगांतल्या अंधारात भविष्याशी लढतातहेत.
त्यांना उजेड वाट दाखवण्यासाठी दोनशे वर्षापुर्वी जन्मलेल्या सर सय्यद यांची आज जयंती आहे.
हर शहर-ए-तरब पर गरजेंगा,हर खसर-ए-तरब पर कडकेंगा..
ये अबर हमेशा बरसा है ये अबर हमेशा बरसेंगा.
#17October1817
#बाबा
#सर_सय्यद_अहमद_खान
#Sir_Syed_Day
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा