रेहमान फौंडेशनचा जयसिंगपूर मध्ये अभिनव उपक्रम
काहीसा अनुभव आज आला अंकली पुलाला लागूनच उदगाव गावची वैकुंठधाम स्मशानभूमीत आज हृदय हेलावून टाकणारे चित्र बघायला मिळाले.
याठिकाणी सहा ते सात मुस्लिम समाजातील तरुण कार्यकर्ते गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अहोरात्र आपल्या मानवजातीचे ऋण, या देशाचे कर्तव्य पार पाडत असताना दिसले.
रेहमान फाऊंडेशन व चांदतरा मोहल्ला मस्जिद कमिटी,जयसिंगपूर या संस्थेचे हे कार्यकर्ते गेल्या चार ते पाच महिन्यापासून देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटामध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे ते अंत्यविधी करत आहेत,
प्रत्येक धर्माचे नियम,चालीरीती,रूढी,परंपरा या वेगवेगळ्या असतात पण हा महाभयंकर रोग कुठलाही धर्म बघत नाही किंवा कुठली जात बघत नाही.यात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना जवळ देखील येता येत नाही,पण या फाऊंडेशन च्या कार्यकर्ते अगदी प्रामाणिकपणे त्या शवाची योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार करत आहेत,याबदल्यात या संस्थेच्या कार्यकर्ते कुठल्याही प्रकारचा मोबदला घेत नाहीत.
कुठल्या ना कुठल्या स्वरूपात त्यांना देशाची सेवा केल्याचं समाधान मात्र यातून मिळते आहे.
त्यांचं हे कार्य म्हणजे देशात जाती-धर्मात तेढ निर्माण करून आपल्या राजकीय स्वार्थ साधणाऱ्या लोकांसाठी थोबाडीत मारण्यासारखे आहे.या त्यांच्या कार्यामुळे मात्र देशातील सर्वच धर्मातील लोकांच्या एकमेकांच्या मनात काही कारणांमुळे पडलेल्या वाईट विचारांची राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही.
माझा या कोरोना योध्याना मानाचा सलाम 🙏🏼
राजेंद्र साळुंखे, मळणगांव
९७६७१६४५१६
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा