जुन्या चळवळीतील मित्राला शेवटी हिदायतने दिला मुखाग्नी

 युवराज पुंडलिक फराकटे रा.चिमगाव ता.कागल जिल्हा कोल्हापुर यांचे दुःखद निधन झाले....

युवराज फराकटे हा NSUIया विधाथी चळवळीतला सहकारी मित्र नंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये एकत्र विविध प्रश्नावर आंदोलनात एकत्र निवडणुकीत प्रचारात काही वेळा एकत्र कांही वेळा विरोधात पण आता गेली दहा वर्षे भेट नाही पण चार पाच वेळा फोन वर हिदायत आणि युवराजच  बोलणं झालं होतं 

दि.1 सप्टेंबर ला दुपारी चार वाजता कागल तालुका राष्ट्रवादी युवक काॅगेसचे अध्यक्ष विकास पाटील यांचा हिदायत यांना मोबाईल वर फोन आला. "आपला जुना मित्र युवराज फराकटे सी.पी.आर. येथे नुकताच  निधन झाला आहे. आणी तुम्ही काही सहकार्य करु शकता का? " 
 त्यावेळी हिदायत  दुकानात होते  पुतण्याला  बोलवून घेतले आणि पाचव्या मिनिटाला सी.पी.आर.ला पोहोचले  तेथे युवराज यांचे मेव्हणे  श्री.दिलीप शेंडे यांना भेटले.तिथे काही अडचणी होत्या त्या  सोडविल्या व मग सायंकाळी 6.30 ला प्रेत पंचगंगा स्मशानभूमीत आणले त्या वेळी चार शववाहीका होत्या  दोन महानगरपालिकेच्या आणि एक तेज घाटगे यांनी दिलेली व  दुसरी व्ही. बी. पाटील यांनी दिलेली त्याच बरोबर आरोग्य यंत्रणे तील दुत या सर्व हालचाली वर आपले काम ईमाने ऐतबारे करत होते. 

दिड तासा नंतर पुकारलं, "युवराज फराकटे यांचे  नातेवाईक कोण? "  त्यावेळी  सर्वांच्या चर्चेतून हिदायत मणियार पुढे गेले हातात कापूर घेतला आणि विधिवत मित्राचे अंत्यसंस्कार केले. 

आपल्या चळवळीतील मित्राला हिदायत भाईंनी शेवटचा निरोप दिला. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...