हिंदू धर्माच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी मदतीला धावून गेले मुस्लिम युवक.
आज पहाटे सहा वाजता परळी तालुका सुधागड जिल्हा रायगड येथील रहिवासी संजय कदम (वयं 46 वर्ष) यांचे रोहा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोविड १९ मुळे निधन झाले.
आणि त्यांचा मुलगा आणि मेहुणे प्रवीण गायकर यांना मदत करण्याचा पुढाकार रोहा अष्टमी येथील (मन्सूर नाडकर, एजाज वास्कर आणि जावेद नाडकर ) या तीन मुस्लिम तरुणांनी घेउन त्यांचे अंत्यसंस्कार केले.
कोरोना काळात प्रसार माध्यमांनी जेवढ्या प्रमाणात द्वेष निर्माण केला तेवढ्या प्रमाणात भारतीयांनी प्रेमाची बीजे फुलवली. व द्वेष निर्माण करणाऱ्यांना चोख उत्तर दिले. शेवटी माणूस माणसाच्या मदतीला धावून गेला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा