आपल्या सहकारी मित्राच्या कुटुंबियांच्या मदतीला धावून आले महाराष्ट्र पोलीस
मरहूम पोलीस नाईक जाकीर शेख, शहर वाहतूक शाखा, सोलापूर शहर यांचं 'कोरोना' या संसर्गजन्य रोगामुळे दुर्दैवी निधन झालं. संकटकाळात पोलिसांच्या मदतीला नेहमी पोलिसच धावून येतात, हा इतिहास ज्वलंत आहे.
पोलीस प्रशिक्षण केंद्र अकोला 2003 बॅच'चे सर्व पोलिस सदस्यांनी व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमातून पोलीस हवलदार इक्बाल शेख, सोलापूर ग्रामीण यांच्या हाकेस साथ देऊन मरहूम जाकीर शेख यांच्या कुटुंबीयांना १,५५,०००/- रुपयांची बहुमोल आर्थिक मदत करून एक उत्कृष्ट मैत्रीला साजेल असे काम केले आहे.
सर्व पोलीस बांधवांचे करावे तितके कौतुक कमी आहे ज्यांनी आपल्या सहकारी मित्राच्या घरच्यांना संकटाच्या काळात मदत केली.
#महाराष्ट्र_पोलीस
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा