सांगली-कुपवाड महानगरपालिकेच्या सगळ्यात कमी वयाच्या नगरसेविका डॉ नर्गिस सय्यद देत आहेत कोविड रुग्णांना सेवा

तस पहायला गेल तर ती उच्चविद्याविभूषित,पेशाने डॉक्टर आणि त्यात भर म्हणजे एक सर्जन ही विद्या सहजासहजी मिळत नसते त्यासाठी अहोरात्र अभ्यास आणि मेहनत करावी लागते.  त्यानंतर स्वतःच अस भव्य अस हॉस्पिटल चालू करून लाखो करोड़ो रूपये कमावता येतात (जे आज आपण पाहतोय).त्यांना ही हे सर्व करता आलं असतं,पण त्यांनी मार्ग निवडला तो राजकारणाचा आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची सर्वात कमी वयाची आणि उच्चशिक्षित, विद्यमान, नगरसेविका होण्याचा मान पटकावला डॉ नर्गिस सय्यद यांनी .
गेले ६ महीने कोरोना सारख्या अजस्त्र अशा रोगाने जगभर थैमान घातले आहे ज्याच्या सर्वात जास्त झळा सांगली  मिरज आणि आजुबाजुच्या भागांना अतिशय तीव्र बसत आहेत,अत्यंत द्यनीय अवस्था सुरु आहे.
नगरसेविका म्हणून सर्व आवश्यक पाठपुरावा त्या लॉकडाऊन पासून करतच आहेत पण आज कोरोनाचा वाढता आकड़ा लक्षात घेता त्यांनी स्वतः हॉस्पिटल मध्ये लोकांना उपचार देण्याचे ठरवले.
आपले सर्व कोरोना डॉक्टर्स, नर्स आणि पूर्ण टीम अहोरात्र प्रयत्न करत आहे परंतु एखाद्या नगरसेवकाने अशा प्रकारचे पाऊल उचलणे अगदी दुर्लभ.
  अगदी कमी वय आणि अविवाहित असलेल्या डॉ नर्गिस यांच हे पाऊल धाडसी आहे.नगरसेविका  यांच नाव नक्कीच इतिहासाच्या  पानात सुवर्णअक्षरात लिहिले जाईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...