स्वातंत्र्यदिनी औरंगाबादच्या मौलानाचा अभिनव उपक्रम मिशन :घर घर किताब हर घर मे किताब !
स्वतंत्रता दिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करणार....
घरो घरी जाऊन स्वतंत्रता संग्राम विषय लिखित पुस्तके वाटप करण्यचे मानस रीड अँड लीड फाऊंडेशन औरंगाबाद च्या वतीने करण्यात आले आहे... फाऊंडेशन चे अध्यक्ष मौलाना मिर्जा अब्दुल कय्यूम नदवी सांगितले की सध्या शाळा बंद आहे. आणि देशाचा सर्वात मोठा उत्सव 15 अगस्त स्वतंत्रता दिनानिमित्त शाळेत होणारे संस्कृति कार्यक्रम यंदा होणार नाही... ह्या कारणाने व मुलांना व पालकांना स्वतंत्रता संग्राम विषय तसेच भारताचे थोर स्वतंत्रता सैनानी आणि त्यांच्या बलिदान व गौरव याविषय माहिती व्हावी ह्या उद्देशाने औरंगाबाद शहरातील विविध भागात घरी जाऊन 11 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत 1000 हजार लोकांना पुस्तके वाटप करण्यात येणार आहे.
रीड ऍण्ड लीड फाऊंडेशन सतत अशाप्रकारचे उपक्रम सध्या शहरातील विविध शाळात जाऊन राबवीत असते.. आता पर्यंत 21000 हजार मुफ्त पुस्काचं वाटप करण्यात आले आहे... महान पुरुषांच्या जन्मदिनी, पुण्यतिथि तसेच विविध भाषा दिनी पुस्तके वाटप करण्यात येते... 15 अक्टूबर हा शासनाने "वाचन प्रेरणा दिन" म्हणून घोषित केला आहे तेंव्हा पासून वेगवेगळ्या शाळात जाऊन पुस्तके वाटप करण्यात येती...
मुख्य उद्देश्य समाजामध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी प्रयत्न करने.. पुस्तका विषयी गोडी लागावी...
ह्या पुर्वी फाऊंडेशन च्या वतीने लाकडाऊनच्या काळात मोहल्ला मोहल्ल्यात जाऊन शिक्षणाचा संदर्भात जनजागृती करण्यासाठी पंधरवडा साजरा करण्यात आला. अशी माहिती फाऊंडेशन चे अध्यक्ष मिर्जा अब्दुल कय्यूम नदवी यांनी दिली.
हे पण वाचा :- कौन आहेत कुर्बान हुसेन?
हे अवश्य पहा :-बैतुलमाल कमिटी कोल्हापूरचा कोरोनाकाळात अभिनव उपक्रम
आमच्या फेसबुक पेजला आवश्य भेट द्या :-
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा