कोल्हापूरची बैतूलमाल कमीटी माणुसकीसाठी आली पुन्हा धावून
राजापूर मधील एक वयोवृद्ध आपल्या मुलासह पाठीच्या उपचारासाठी कोल्हापूर ला दोन दिवसापूर्वी आले होते. त्यापैकी वयोवृद्धाची कोरोना चाचणी पाॅझीटीव्ह आली व मुलाची निगेटीव्ह. दोघांना सीपीआर मध्ये आणण्यात आले. बाप आणि मुलगा विभक्त झाले.अशातच वयोवृद्ध वडीलाचे निधन झाले. राजापूर आम. हूस्नबानो खलीफे , नगराध्यक्ष जमीर खलीपे यांनी कोल्हापूर येथील त्यांचे मित्र नगरसेवक तौफिक मुल्लाणी यांना संपर्क साधून अॅम्ब्यूलन्स व्यवस्था करणेची विनंती केली. कोरोनामुळे कोणीही तयार झाले नाही आणि प्रवासाची परवानगी मध्ये देखील प्रशासनिक अडचणी होत्या. सकाळी 11 पासून तौफीकभाई, राजू नदाफ, जाफर मलबारी हे बैतूलमाल कमिटीचे व सीपीआर मधील बंटी सावंत ,अमित चौगूले (बंटीसाहेबांचे सहाय्यक) यांनी प्रयत्न सूरू केले.
मृतांचे काही नातेवाईक देखील आले. मुस्लिम बोर्डींगशी संपर्क साधून त्यांची परवानगी घेतली. प्रशासनाने पण यासाठी हालचाली सुरू केल्या. इकडे मृताचा मुलगा पन्नास हजार रुपये देणेस तयार झाला तरी कोणी चालक तयार झाले नाही. दुपारी बागलचौक येथेच दफनविधी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. महानगरपालिका आरोग्य अधिकारी जेसीबी सह येताच स्थानिक नागरिकांनी या ठिकाणी दफनविधी करणेस विरोध केला.अमर समर्थ, स्वप्निल नाईकनवरे यांनी याठिकाणी येऊन समजवण्याचा प्रयत्न केला. पण स्थानिक नागरिक नसल्याने दफनविधी करू नका अशी भूमिका घेतली गेली.
परंतू सांमजस्याने तोडगा काढत दफनविधी करण्याचे ठरले. हे सर्व घडत असताना कोरोनाची भिती स्थनिकांच्या मनातून जावी व आपण देखील तुमच्यासाठीच आहोत, येणारा काळ हा आणखी बिकट येणारा असेल यामुळे स्वतःच दफनविधी करण्याचे बैतूलमाल चे तौफिक मुल्लाणी, जाफर मलबारी,राजू नदाफ यांनी जाफरबाबा परगावी असलेने त्यांना फोनवरून कळवले. बाबांनी योग्य प्रकारे सर्व करा आणि जनाजा नमाज देखील पठण करा असे सांगितले त्यानुसार कोणतीही भिती न बाळगता पीपीई कीट घालून दफनविधी पार पाडण्यात आले. कोरोनाची लढाई विरोधात आपण सर्वजण एकत्र लढले पाहीजे. नाहीतर तुम लढो ...अशी प्रवृत्ती नसावी याचाच प्रत्यय आज आला.
कोल्हापूरकरांच्या धाडसी वृत्तीचा बैतूलमाल कमिटीच्या पदाधिकारी यांनी प्रत्यय दिला. दफनविधीनंतर नातेवाईकांनी व मुलाने फोवरून मनापासून कोल्हापूरकरांचे आभार मानले आणि कोल्हापूरातील लोक "फरीश्ते" आहेत अशा भावना व्यक्त केल्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा