स्वतःचा धर्म, संस्कृती,अस्मिता पायाखाली तुडवत जेत्यांच्या मर्जी प्रमाणे जगणारा मुस्लिमच यांना गुड मुस्लिम का वाटतो?

मार्च एप्रिल मधे कोरोनाच्या नावाखाली तब्लीग जमात सहीत मुस्लिम समाजाला सर्वच वादावादी अनैतिक बौद्धिकांनी झोडपून काढले होते. एका सुधारणावादी संपदकाने तर तब्लीग जमात बद्दल फेसबुकी लेख लिहून जमातला धर्मांध रूढीप्रय, कट्टरपंथी वगैरे म्हणून हिणवले होते. देशात कोरोनाच्या संवेदशील परिस्थितीत तब्लीग जमात कशी बेजबाबदार वागली वगैरे याचा पाढाही त्यांनी वाचला. त्यांनी लेखात संपुर्ण मुस्लिम समाजाला आपल्या सवयी प्रमाणे उपदेशाचे डोस दिले.
कोणत्याही बाबी एकमेकांशी जोडून त्याच्या हवा तो विकृत आकार घडवायचा आणि ती मुळ प्रतिमा असल्याचा आव आणून मिरवायचा छंद या लोकांना खूप पुर्वीपासून आहे. एखाद्या संघटनेने आपला धर्म जपण्याचा प्रयत्न केला की ती थेट धर्मांध कशी होते हेच मुळात या लोकांना ठाऊक नसावे. म्हणून त्यांनी हा भलामोठा लेख लिहीला असावा?
परंतु नंतर  Alt news, scroll.in व इतर शोध पत्रकारिता करणाऱ्यांनी Fact Check करून सत्य समोर आणले होते. 
लाॅकडाउन च्या काळात मजुरांना, गरीबांना मदत करणारे, रक्तदान करणारे, अन्नदान करणारे तब्लीगी व मुस्लिम यांना दिसले नाही (त्यांच्या अनैतिक मानसिकतेमुळे त्यांना सामाजिक क्षेत्रात काम करणारा मुस्लिम दिसत नाही) 
आपत्तीच्या काळात स्वतःला सामाजिक कामात झोकून देणाऱ्या तब्लीगी व मुस्लिमांच्या सामाजिक कार्याबद्दल लिहताना त्या संपादकच्या व वादावादी अनैतिक बौद्धिकांच्या कलममधली शाई संपली असावी.  
त्यांच्या लेखनीला शब्द ही फुटले नाही. यात मुस्लिम समाजातील एक खासदार येतात ज्यांनी देखील तब्लिगिनी माफी मागावी हे विधान केले होते. 
👉लिहण्याचा कारण हे आहे की
 काल तब्लीग जमातच्या विदेशी नागरिकांबद्दलच्या एका खटल्यासंबधी सुनावणी दरम्यान काल "मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद बॅंचने" निकाल देताना सांगितले की 
"असे दिसते आहे की "सरकारने राजकीय इच्छाशक्तीच्या अंतर्गत कार्य केले आहे.  कायदे आणि मूलभूत कायद्यांच्या तरतुदीनुसार त्यांना देण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करण्याची पोलिसांची हिंमत नव्हती.
 जेव्हा एखादा साथीचा रोग किंवा आपत्ती उद्भवते तेव्हा सरकार बळीचा बकरा शोधण्याचा प्रयत्न करतो आणि परिस्थिती दर्शवते की या लोकांमुळे ही आपत्ती निर्माण झाली आहे व त्यांना बळीचा बकरा म्हणून निवडले गेले.
Ghana,Tanzania,Djibouti, Benin,Indonesia व इतर देशातून भारतात आलेल्या तब्लीगी विरुद्ध दाखल खटला रद्द करताना आपल्या ५८ पानांच्या निकालात उच्च न्यायालयाने सांगितले की
"या लोकांमुळे कोरोनाचा प्रसार झाला व हे लोक इस्लाम धर्मा पसरवत आहे हा आरोप स्वभावतः अस्पष्ट आहेत आणि या आरोपावरून अनुमान लावला जाऊ शकत नाही की ते इस्लाम धर्म पसरवत आहेत आणि धर्मांतर करण्याचा मानस आहे. सरकार वेगवेगळ्या देशातील वेगवेगळ्या धर्माच्या नागरिकांना वेगवेगळे उपचार देऊ शकत नाही. ”
"परदेशातून आलेल्या परदेशी तब्लीगी लोकांच्या विरोधात प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मोठा अपप्रचार झाला."
उच्च न्यायालयाने सर्व आरोप फेटाळून खटला रद्द करण्याचे आदेश दिले....
शेवटी एवढाच सांगायचे "स्वतःचा धर्म, संस्कृती,अस्मिता पायाखाली तुडवत जेत्यांच्या मर्जी प्रमाणे जगणारा मुस्लिमच यांना गुड मुस्लिम वाटते" 
टिका करताना संपूर्ण मुस्लिमांना जबाबदार धरणारे श्रेय देताना मात्र अनुल्लेखाचा वापर करणाऱ्या अनैतिक बौद्धिकांमुळेच मुसलमान पुरोगामी विचारांकडे त्याच दृष्टीकोनातून बघतोय ज्या दृष्टीकोनातून उजव्या व संघीविचारांना बघतो. 
 एखाद्याच्या चुकीला गुन्हा समजून संपूर्ण मुस्लिम समाजाला झोडपून काढणाऱ्या धुरंधरांनी स्वतःचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे. हे यांना कधी समजेल?
पुरोगामी विचारांच्या आड पुर्ण समाजाला गुन्हेगारांच्या लाईनीत उभा करणाऱ्यांना पुरोगामी समाजानेच अंकुश लावणे गरजेचे आहे. 

✍ सुफियान मनियार

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...