उमरग्यामध्ये ईदगाह कॉरंटाईन सेंटर-मुस्लिम समाजाची एक नई पहल

आपण पाहतोय की कोरोना संक्रमणाचा विळखा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे, खबरदारी म्हणून जनतेला घरीच राहा ! सुरक्षित राहा ! असा सल्ला व वेळो वेळो लॉकडाऊनची आमलबजावणी करून ह्या संक्रमणाची साखळी तोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु परिणामी संक्रमण थांबायचे काय नावच घेईना वाढता धोका लक्षात घेऊन प्रशानकोविड सेंटर व विलगिकरण  केंद्रांची पर्यायी व्यवस्था करतच आहे, परंतु संख्या इतक्या झपाट्याने वाढत आहे आणि हा रोग संक्रमणाचा असल्याने म्हणावी तशी व्यवस्था करण्यासाठी   प्रशासनाला काय  कसरत करावी लागत असेल याची कल्पना आपण करू शकतो.
पोलीस सुव्यवस्था  प्रदान करणे , आरोग्य विभाग वैद्यकीय सेवा देणे,  व महसूल विभाग सर्व नियोजन करणे हे कामे चोख पणे पार पाडत असताना, कोविड सेंटर ची संख्या वाढत असताना कदाचित पेशंट ची गैर सोय होत असेल. तर त्याला पर्याय म्हणून सामाजिक व्यक्तींनी पुढे येणे ही आजच्या घडीची गरज आहे.
 आणि  म्हणूनच मुस्लिम समाजातील  तरुणांनी  विचार केला की आता आपल्याला खरच जर समाजा साठी कांही तर करायचे असेल , नुसते सल्ले देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला टार्गेट न करता सेवा भावी वृत्तीने जर संक्रमित पेशंट ची दुरावस्था होउ नये असे जर वाटत असेल तर कॉरनटाईन सेंटर ची व्यवस्था किंवा सेवा करणे  हेच एकच महत्व पूर्ण काम आहे, याच विचारातून कोविड सेंटर ची उभारणी करण्याची संकल्पना  व व्हाट्सएप ग्रुप च्या माध्यमातून चर्चा घडवून आणली 
मा. तहसीलदार  साहेबांशी चर्चा करून ह्या कोविड सेंटर उभारणीला सुरवात केली. 
 ज्या वेळेस हे तरुण सभागृह पाहण्यासाठी आले  त्यावेळेस त्यांची अवस्था खूपच बिकट होती, याच्या उभारणी साठी कलर पासून घेऊन , टॉयलेट, बाथरूम, लाईट, फॅन, किचन शेड,  खिडक्यांची काच असे एक नाही अनेक कामे होती आणि काम  करायचे तर पक्के ठरले होते, खर्चाचा अंदाज बांधून युवकांनी  ग्रुप वरती आव्हान केले.  
 उमरग्यातील  सदैव तत्पर असणाऱ्या 'उमरगुंस', व 'डीबेट' ग्रुप च्या दानशूर व्यक्तींनी भरभरून मदत केली विशेष करून पत्रकार नारायण गोस्वामी, मनीष सोनी, डॉ. उदय  मोरेजी यांचे  विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. आज  सुविधांनी युक्त 35 बेडचे कोविड सेंटर उभे केले गेले. 
 हे सेंटर नुसतेच पुर्ण करून शासनाच्या ताब्यात देण्यापेक्षा  ह्या सेंटर मध्ये ऍडमिट होणाऱ्या पेशंटला चांगल्यातचांगल्या सुविधा कशा देण्यात येतील?  त्यांची गैर सोय कशी टाळता येईल?  या कडे आम्ही स्वतः या ठिकाणी हजर राहून सर्व व्यवस्था करण्याचे ठरवले आहे. 
पेशंट च्या सुविधे साठी आम्ही दैनंदिन एक 12 कलमी कार्यक्रमाची आखणी केली आहे ज्यात 
1) पेशंट ला सकाळी 6 वाजता उठवण्यात येईल 1 तासाच्या प्रातर विधी च्या टायमिंग नंतर गरम काडा देण्यात येईल, 
2)  7 ते 8 ह्या काळावधीत व्यायाम व योगा करून घेण्यात येतील, 
3) 8 ते 9 च्या टायमिंग मध्ये फ्रेशनेस साठी सुट्टी देण्यात येईल. 
4) 9 वाजता नाष्टा, ज्यात  शिरा, उपिट, पोहे, शुसेला, अंडी, व फळे, देण्यात येतील.
 5) 10 ते 12 ह्या टायमिंग मध्ये मेडिकल चेक अप अत्यावश्यक सेवा पुरण्यात येतील.
6)1 वाजता भरपेट जेवण देण्यात येईल.
7)2 ते 5 ह्या टायमिंग मध्ये पेशंटना सक्तीने अराम करायला लावण्यात येईल.
8)5 वाजता ग्राउंड वर फेर फटका 
9)6 वाजता गरम सूप 
10) 7 वाजता परत मेडिकल ट्रीट मेंट 
11)8 वाजता जेवण 
12)10 वाजता लाईट ऑफ स्लीपिंग टाईम 

आशा प्रकारे एक सूत्र बद्ध पद्धतीचा कोविड सेंटर चालवण्याची मुस्लिम युवकांची इच्छा  आहे. जी आठवड्याच्या 7 दिवशी 7 व्यक्तींच्या जबाबदारी वर सोपवण्यात येईल.
यासाठी वेळो वेळी  उप विभागीय अधिकारी साहेब, तहसीलदार साहेब,  शहरातील  सर्व डॉक्टर्स उपाय सुचवून मार्गदर्शन आणि निर्णय घेतील. 

बाबा जाफरी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...