ऐन निवडणुकीच्या वेळी मुस्लिमांमध्ये एक किडा वळवळ करायला लागतो तो म्हणजे संघभाजपाला हरवायच असेल तर............

(फोटो मध्य प्रदेश काँग्रेसच्या भोपाळ येथील पक्ष कार्यालयाचा आहे.)

2014 साली भाजपाने एक प्रयोग सत्यात उतरवून दाखवला.तो प्रयोग म्हणजे मुस्लिम मतांना बेरजेत न धरता बहुमताने सत्ता स्थापन करण्याचा.2019 च्या लोकसभेच्या निकालाने त्या प्रयोगावर यशाचा पक्का शिक्का मारला.
आज ज्या पद्धतीने कॉंग्रेस असो राष्ट्रवादी असो किंवा तथाकथित धर्मनिरपेक्ष किंवा तथाकथित संविधानवादी पक्ष संघभाजपाच्या इव्हेंटमध्ये जल्लोषात सहभागी झाले होते ते पाहता एका गोष्टीची जाणीव स्पष्टपणे होत आहे की त्यांना आता इथून पुढचा राजकीय खेळ भाजपाला फॉलो करत खेळायचा आहे,मुस्लिमांना बेरजेतून बाहेर ठेवूनच खेळायचा आहे.बहुसंख्याक मतदार आमच्यावर नाराज होऊ नये म्हणून आज त्यांनी जाहीरपणे संघभाजपाच्या इव्हेंटमध्ये दखलपात्र सहभाग नोंदवला.
पुढील राजकीय भविष्याला त्यांना याचा किती फायदा होईल याचे अंदाज त्यांनी कदाचित बांधून ठेवले असतील.मात्र काँग्रेसलाही आणि सोबत राष्ट्रवादीनेही जाणून घेणं गरजेचं आहे की जास्त लांब नाही 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तुम्हाला जो काही आकडा गाठता आला ना तो फक्त आणि फक्त मुस्लिमांनी तुमच्या झोळीत भरभरून मत टाकली यामुळेच.
तुम्ही मुस्लिमांना बाजूला काढून ठेवा आणि तुमचा आकडा किती तयार होतो याचा अंदाज बांधा.
मुस्लिमांकडे ऑप्शन असूनही त्यांनी तुम्हाला मतदान केलं ती त्यांची मोठी चूक होती हे तुम्ही आज त्यांना दाखवून दिलं आहे याबद्दल खर तर तुमचे आभारच!
मात्र कितपत मुस्लिम यातून धडा घेत काँग्रेस,राष्ट्रवादी आणि तथाकथित धर्मनिरपेक्ष किंवा तथाकथित संविधानवादी पक्षाला मतदान करणं बंद करून त्यांना फॉलो करणं बंद करतील हा अंदाज लावला जाऊ शकत नाही.कारण ऐन निवडणुकीच्या वेळी मुस्लिमांमध्ये एक किडा वळवळ करायला लागतो तो म्हणजे संघभाजपाला हरवायच असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदान केलं पाहिजे..आणि इथेच खरा मार खातो समाज कारण हेच पुढे संघभाजपाच्या हातात हात घालून चालतात आणि इकडे मुस्लिम यांना मिरवत राहतात.
मुस्लिमांनी पक्का धडा घेत इथून पुढे काँग्रेस,राष्ट्रवादीला मतदान करणं बंद कराव!
आज तुमचं राजकीय अस्तित्व शून्य आहे,सामाजिक अस्तित्व शून्य आहे,तुमच्या सांस्कृतिक अस्तित्वावर रोज घाव घातले जातात,तुम्हाला माणूस म्हणून सन्मानाने जगता येण्याचा सुद्धा अधिकार पूर्णपणे उरलेला नाहीये,तुमच्या इतिहासाची इतकी वाईट वाईट अवस्था करून ठेवली आहे की तुमचं चित्र जणू भयंकर काहीतरी असच आहे.
त्यामुळे आता सामाजाच स्वतंत्र राजकीय अस्तित्व निर्माण करणे त्यातून सामाजिक प्रश्न सोडवणे त्यातून सन्मानाने जगण्यासाठीची लढाई लढणे हे करणं गरजेचं आहे.
नाहीतर राष्ट्रवादी पून्हा आणि हाताचा पंजाच घेऊन बसले तर मात्र झिरो कडून मायन्स कडचा प्रवास असेल इथून पुढचा हे नक्की!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...