१३ ऑगस्ट १६५७ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी खेड शिवापूर येथील हजरत कमर अली दुर्वेश बाबा यांच्या दर्ग्यासाठी दिवाबत्तीची सोय करून दिली.

पुणे शहरापासून 17 किमी अंतरावर असलेले खेडशिवापूर हे गाव. हिंदू -मुस्लिम ऐक्याचे व मिश्र लोकवस्ती असलेले गाव राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर येते.  या गावात हजरत कमर अली दुर्वेश यांची दर्गा आहे. 
लहानवयात लोकांच्या समस्या निवारणाचं काम ते करत असतं त्यामुळे आसपासच्या गावातील हिंदू मुस्लिम यांच्या समस्यांचं ते समाधान करत. वयाच्या 18 व्या वर्षी ते या जगातून गेले तेव्हा तेथील लोकांनी त्यांची कबर तेथे बांधली. आज ते लाखो लोकांचं श्रद्धास्थान आहे. 
या दर्ग्याचे एक वैशिष्ट्य या दर्ग्यात जवळजवळ 90 किलो वजनाचा दगड अनेकांना उचलत नाही पण आकरा जणांनी तो दगड दर्गा परिसरात करंगळीच्या साहाय्याने उचलल्यास सहज उचलला जातो. हे हजरत कमर अली दुर्वेश बाबा यांच्या चमत्कारामुळे घडते अशी लोकांची श्रद्धा आहे 


१३ ऑगस्ट १६५७ रोजी छत्रपती  शिवाजी महाराजांनी खेड शिवापूर येथील हजरत कमर अली दुर्वेश बाबा यांच्या दर्ग्यासाठी दिवाबत्तीची सोय करून दिली. 
त्यासाठी येथील इनामदार हिंदू व मुस्लीम यांना इनामी जमीन व रोजमुरे रोषणाई करिता सालाना इनाम दिले याबाबतचे इ. स. १३ ऑगस्ट १६५७ चे पत्र उपलब्ध आहे.
संदर्भ :- ऐतिहासिक सं साहित्य खंड 2.
याचं दर्ग्याचा जीर्णोद्धार राजश्री बाबाजी कोंडे देशमुख यांनी केला असल्याचा शिलालेख दर्ग्याच्या भिंतीवर आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...