माळशिरस नगरपंचायतीच्या रस्त्याच्या निकृष्ट कामाच्या चौकशीसाठी सामाजिक कार्यकर्ते रशीद शेख यांचे उपोषण
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस हे पश्चिमेकडील शेवटचे तालुक्याचे गाव.
माळशिरस नगरपंचायत येथील माऊली चौक ते कचरेवाडी हद्दीपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे हे काम निकृष्ठ प्रतीचे झाले असून या कामाची चौकशी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रशीद शेख यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे.
कामाचा खालावलेला दर्जा याची चौकशी करून संबंधित ठेकेदारास पाठीशी घालणाऱ्या मुजोर भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी अशी उपोषण कर्त्यांची मागणी आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा