मुस्लिमांचे शासकीय नोकरीमधील प्रमाण आणि विदूषक प्रसारमाध्यमे
प्रशासकीय सेवेत मुस्लिमांचे प्रतिनिधित्व केवळ साडेतीन टक्के आहे. कधीकधी हा आकडा साडेचार-चार टक्केपर्यंत पोहोचतो. परंतु असे असूनही विकृत मनोवृत्तीचे 'भगवधारी' अँकर नोकरशहा वर्गाविरुद्ध द्वेष पसरवण्याचं काम करत आहे.नोकरीत असलेले इतके अल्प प्रमाण त्यांना टोचत आहे. अलीकडेच देशातील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये प्रथम क्रमांकावर असलेल्या भारतातील विद्यापीठाच्या शिक्षणाविषयी प्रश्न उपस्थित करत होते. ते यूपीएससीत निवडलेल्या मुलांविरुद्ध नोकरशाही_जिहाद म्हणून तसेच विद्यापीठाच्या विरोधात विष ओकत आहेत.
अशा प्रकारचे चॅनेल कोण पाहतो? हे सांगून काही विचारवंत याकडे दुर्लक्ष करतील. कोण पाहतो, कोण पाहत नाही? हा प्रश्न नाही. एक मोठा वर्ग त्याला पहात आहे, त्याच्यावर विश्वास ठेवत आहे, आणि त्याला व्हॉट्स अँप युनिव्हर्सिटीच्या वर्गातदेखील फॉरवर्ड करत आहे. टीव्ही स्टुडिओच्या विदूषकांनी निर्माण केलेला द्वेष पुढील वीस वर्षात या देशाच्या नुकसानाची पूर्तता करु शकेल म्हणणे कठीण आहे.
एका समुदायाविरुद्ध, समाजात पसरलेल्या विषाचा दुष्परिणाम दूर करण्यात एक काळ जाईल. पण हे सर्व घडत आहे, लोक पहात आहेत.
जामिया ही कोणत्याही विशिष्ट समुदायाची मालमत्ता नाही तर भारत सरकारची मालमत्ता आहे. परंतु असे असूनही जामिया व त्यासारख्या अन्य संस्थांविरूद्ध वातावरण तयार केले जात आहे.
या देशात द्वेषाचे वातावरण इतके केले आहे की श्वास घेणे कठीण होत आहे. ज्या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी होती त्यांचा उल्लेखदेखील केला जात नाही, असे मुद्दे चर्चेत येतात जे मुद्दे मुळीच नाहीत. आज, यूपीएससीमध्ये निवड झालेल्या जामियामधील माजी विद्यार्थ्यांचे वर्णन 'जिहादी' म्हणून केले गेले . हा गुफ़ेतून जन्मलेल्या टीव्ही जोकरला पोकळ राष्ट्रवादी असल्याचा अभिमान आहे. परंतु त्यांचा राष्ट्रवाद केवळ मुस्लिमांना शिव्या देण्यापर्यंत टिकला आहे. येथे घटनेचा उल्लेख करणे आवश्यक झाले आहे. जामियाचा विद्यार्थी आयईएस सुभान अली हा लडाख येथे पोस्ट वर होता. 22 जुलै रोजी भारत-चीन सीमेवर तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्माणाधीन रस्त्याची पाहणी करीत मीना मार्गावरून छावणीकडे परत जात असताना त्यांचे वाहन दरीत पडले होते.त्याच्या चालकाचा मृतदेह सापडला आहे, पण सुभान अलीबद्दल काहीच खबर नाही. या घटनेवर भारतीय माध्यमांच्या तथाकथित 'राष्ट्रवादी' जोकरांनी आयईएस सुभान अलीच्या शोधात रात्रंदिवस प्रोग्रॅम चालवल्या पाहिजे होत्या , राष्ट्रवादीचा राग जागृत केला असता, परंतु दुर्दैवाने कोणत्याही राष्ट्रवादी वाहिनीने सुभानसाठी बातमी चालवणे आवश्यक मानले नाही. संरक्षणमंत्री, सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते एनडीआरएफचे प्रवक्ते, आजपर्यंत देशातील एक धाडसी आणि आश्वासक अधिकारी का शोधला गेला नाही, असा प्रश्न कुठल्याही पत्रकार, अँकर, विदूषकने धरला नाही.
दुसरी घटना सोलापूर ग्रामीण पोलीस मधील कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायाच्या नेम प्लेट वरून त्याच्या जातीचा धर्माचा आधार घेत त्याला मारहाण करण्यात आली. जातीयवाचक शिव्या देण्यात आल्या. हे त्या विदूषक जोकर यांच्या द्वेषाच्या पेरल्या गेलेल्या बीजाचे फळ आहे.
राजकारणाची आणि माध्यमांची युती समाजात दरी निर्माण करण्याच्या कामावर लागली आहे.पराकोटीचा मुस्लिम द्वेष निर्माण या देशाच्या प्रगतीची सर्व दारे बंद करण्यास तो वाकलेला आहे. परिस्थिती अशा प्रकारे तयार केली जात आहे की त्याने सर्व गोष्टींमध्ये जिहाद दर्शविण्यास सुरुवात केली आहे. UPSC सारख्या स्वतःला पारदर्शक म्हणणाऱ्या आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या सुदर्शन चॅनेलच्या अँकरवर आयोग तक्रार दाखल करणार का?
येणाऱ्या काळात शाहिद अब्दुल हमीद, ए.पी.जे अब्दुल कलाम, अकबरुद्दीन सय्यद असो किंवा वयाच्या 21 व्या वर्षी IAS झालेला महाराष्ट्रातील अन्सार शेख असो किंवा यांच्यासारखे लाखो नौकरशहा असो यांना येणारी मनोरुग्ण पिढी कोणत्या नजरेतून पाहणार? हे महत्वाचे आहें.
राजकारणी आणि प्रसारमाध्यमे यांच्या सह-अस्तित्वाच्या युतीने निर्माण झालेला जातीय कुष्ठरोगी समाज आणि ज्यांची मुले जातीय कुष्ठरोगी बनली जात आहेत. म्हणूनच त्या समाजाने पुढे येऊन या जोकरांवर बहिष्कार टाकला पाहिजे, अन्यथा हळूहळू हा समाज मनोरुग्ण बनला जाईल.
हे पण वाचा :
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा