उस्मानाबाद मध्ये मुस्लिम समाजातर्फे पहिल्या मोहल्ला क्लीनिकाचे उदघाटन.


आज उस्मानाबाद शहरामध्ये खाँजा नगर भागातील आक्सा चौक येथे मुस्लिम समाजाच्या वतिने मोहल्ला क्लिनिक  रोग निदान व मोफत सेवा सुविधा केंद्र शाखा क्रमांक-1 चे उद्याटन करण्यात आले. 

या सुविधा केंद्रामध्ये येणा-या गरजु लोकांच्या उपचारासाठी लागणा-या सर्व गोळया औषधांचा पुरवठा नगर परिषदे च्या वतिने करण्यात येईल असे आश्वासन मा. नगराध्यक्ष श्री. मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर यांनी दिले. 
 अशा प्रकारचे क्लिनिक प्रत्येक प्रभागात ही तयार केले तर तेथेही लागतील तेवढ्या गोळ्या औषधांचा पुरवठा करण्यात येईल असे ही यावेळी म्हणाले व  झालेला आजार  जसे सर्दी, खोकला,  ताप, डोकेदुखी या प्रकारचे आजार अंगावर न घेता दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावेत असे आवाहन नागरिकांना केले. 

या कोरोना च्या पार्श्वभूमीवर काम करत असलेल्या  मोफत उपचार व सुविधा देणा-या डॉक्टरांचे व मोहल्ला क्लिनिक स्थापन करणा-या सर्व  सदस्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

या उद्याटन समारंभ प्रसंगी धर्मगुरु, तहसिलदार श्री.गणेश माळी साहेब, जिल्हा शल्यचिकत्सक श्री. धनंजय पाटील,  डॉ. स्मिता शहापुरकर मॅडम, डॉ. खान, खलिल सर, मसुद भाई, ॲड.विशाल साखरे , नगरसेवक खलिफा कुरेशी आदिंसह इतर मान्यवर उपस्थित होते. 
#नगरपरिषद #उस्मानाबाद  #कर्तव्यदक्ष #नगराध्यक्ष  #नंदुभैय्या

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...