जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?
🔶 रेशनिंगचे नियम/माहिती/रेशनदुकानदारा विरुध्द तक्रार देण्यासाठी/आपले हक्क (®) 👉 रॉकेल/घासलेट पहिल्या पंधरवड्यात न घेतल्यास महिना अखेरपर्यंत घेता येते. हप्ता बुडत नाही. 👉 बीपीएल् व अंत्योदयचे धान्य गेल्या महिन्यात न घेतल्यास पुढच्या महिन्यातही घेता येते. 👉 बीपीएल् व अंत्योदयचे धान्य महिन्यात 4 हप्त्यातही घेता येते. 👉 रेशनवर घेतलेल्या वस्तूंची पावती मिळालीच पाहिजे. पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक असतो. 👉 एका दिवशी एकच पावती फाडता येते असा नियम नाही. 👉 ज्या व जेवढ्या वस्तू हव्या असतील तेवढ्याच वस्तू आपण घेऊ शकतो. इतर गोष्टी घेतल्याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार म्हणू शकत नाही. 👉 रेशनकार्ड स्वतःकडे ठेवून घेण्याचा किंवा ते रद्द करण्याचा अधिकार दुकानदाराला नाही. 👉 रेशन दुकान रोज सकाळी 4 तास व सायंकाळी 4 तास उघडे असलेच पाहिजे. आठवडी बाजाराच्या दिवशी उघडे असले पाहिजे. आठवड्यातून एकदाच दुकान बंद ठेवता येते. रेशन दुकान जर आठवड्यातून एक दिवसाहून अधिक दिवस बंद रहात असेल तर त्या बंद दुकानाची छायाचित्रे / चलचित्रे तारीख वेळे सहित http://mahafood.g...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा