सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारा या मागणीसाठी इंन्साफ युथ फाउंडेशनचे परभणी थाली बजाव आंदोलन.

इन्साफ युथ फाउंडेशन परभणी यांच्यावतीने सार्वजनिक आरोग्य जिल्हा रुग्णालयात अपुऱ्या सुविधेमुळे थाळी बजाव आंदोलन करण्यात आले.ऑक्सिजन मिळत नसल्याची तक्रार समाज माध्यमावर प्रसारित करणाऱ्या करोना रुग्णाचा काही दिवसांनी परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयातील करोना कक्षात मृत्यू होतो,प्रत्यक्ष करोनामुक्त झालेल्या महिले ऐवजी दुसऱ्याच महिलेला रुग्णालयातून सुट्टी दिली जाते,तर एका प्रकरणात सुरुवातीला सकारात्मक निघालेला रुग्ण पुन्हा चक्क नकारात्मक निघतो आणि त्याला सुट्टी द्यावी लागते.

 परभणी जिल्हा सरकारी दवाखान्याच्या बेफिकरीचे असे अनेक नमुने गेल्या काही दिवसात दिसून आले आहेत.त्यामुळे परभणी जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

 करोना प्रार्धुभावच्या संकट काळात अनेक नागरिक किरकोळ आजार असताना हि जिल्हा रुग्णालय येण्याचे प्रमाण  कमी झाले आहेत.परभणी जिल्हा रुग्णालयातील बाहय रुग्ण नोंद पहिली असता सहज लक्षात येते आसल्याचे म्हणणे इन्साफ फौंडेशनचे आहे .अत्यंत गंभीर आजार अगर दुखणे असणाऱ्या रुग्णांना देखील करोना संकटाच्या सबबी खाली परभणी जिल्हा रुग्णालयात उपचार मिळणे दुरापस्त झाले आहे.परभणी जिल्हा रुग्णालयात कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांच्या कार्यवेळे बाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाचा काही अंकुश राहिला नसून परिणामी उपलब्ध असणाऱ्या सुविधा देखील करोना व्यतिरिक्त इतर गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांना उपचार तसेच जिल्हा रुग्णालयात उपलब्ध तपासणी सेवा मिळत नाहीयेत.करोना काळातील आर्थिकदृष्ट्या खचलेल्या सामान्य जनतेला पुन्हा खाजगी तपासण्या करण्याकरीता पाठवण्यात येत असल्याने अनेकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

बाबत आज दि ०५ ऑगष्ट २०२० रोजी जिल्हा प्रशासनाच्या कडे रीतसर आंदोलनाचे निवेदन देऊन कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली होती परंतु मागणी बाबत काही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याने परभणी जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या कार्यपद्धती बाबत थाली बजाव आंदोलन करण्यात आले व तसे निवेदन मा.जिल्हाधिकारी,परभणी यांना सुपूर्द करण्यात आले तथा तात्काळ सार्वजनिक आरोग्य व्यवस्थे बाबत उपाययोजना करून सामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
अन्यथा नजीकच्या काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनास दिला. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...