पिठाची गिरणी चालवणाऱ्या गरीब माणसाचे मुलाला चांगल्या शाळेत शिकवण्याचे स्वप्न जेंव्हा पुर्ण होते....
औरंगाबाद ला केंद्रीय विद्यालय ही केंद्रसरकार पुरस्कृत नामांकित इंग्रजी मिडीयम ची शाळा आहे .
येथे अडमिशन घेण्यासाठी खासदार कोट्यातून काही जागा असतात .
मागच्या पंधरा वर्षापासून त्या जागा कुणाला मिळायच्या हे आपल्या सर्वांना माहीत आहे ..चिरीमिरी कार्यकर्ते किंवा धनदांडग्याची मुले ..एकूणच सर्वसामान्य लोकांना मिळत नव्हत्या हे सत्य आहे ..
ह्या वर्षी खासदार इम्तियाज जलील यांनी एक लकी ड्रॉ द्वारे विद्यार्थ्यांची निवड करायचे सर्वांना आवाहन केले आणि ज्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना येथे प्रवेश मिळाले ..
नक्कीच हे काम चांगले आहे आणि सर्वसामान्य लोकाभिमुख आणि पारदर्शी कामे होऊ शकतात हे इम्तियाज जलील यांनी दाखवून दिले
"पीठाची गिरणी चालविणाऱ्या या माणसाचे स्वप्न होते की त्याला त्याच्या मुलाला चांगल्या शाळेत पाठवायचे . जेव्हा माझ्या कार्यालयात केन्द्रीय विद्यालय शाळेत थेट प्रवेश घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये त्याचा मुलगा निवडला गेला तेव्हा त्याच्या स्वप्नाचे सत्यात रुपांतर झाले . तसेच आणखी एक पालक आहे जे वेल्डिंगचे दुकान चालवतात आणि त्याचा मुलगा सुद्धा निवडला गेला . त्यांचे आनंद आणि भावना पाहिल्यानंतर याहून जास्त असे काहीही समाधानकारक नाही"
Imtiyaz Jaleel (MP Aurangabad)
आज इम्तियाज भाई यांचा वाढदिवस..
साहेब आपल्या हातून असेच चांगले कामे वर्षानुवर्षे होतच रहावे हीच सदिच्छा आणि शुभेच्छा 🙏🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा