बीडच्या खेडेगावातील वयाच्या 21 व्या वर्षी साहिल शेख करणार जागतिक पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व.

बेलारूस देशात  23 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2020 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे बीड जिल्ह्यातील धानोरा ता आष्टी  सारख्या गावातील साहिल शेख. 
वर्ल्ड आणि एशियन या दोन्हीही  पॉवरलिफ्टींग चॅम्पियनशिप  साठी 93किलो वजनी गटात  साहिल शेख देशाचे प्रतिनिधित्व करत आहे. धानोरा यागावी B.SC च्या तिसऱ्या वर्गात त्याचे शिक्षण सुरु आहे. 
डॉ बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात 2017 पासून 2019 पर्यत सलग तीन वेळा सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. 
नोव्हेंबर 2019 मध्ये मुंबई येथे  झालेल्या महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धेत एक सिल्वर आणि दोन सुवर्णपदक पटकावले आहेत. 
डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या नॅशनल पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धेत दिल्ली येथे सिल्वर पदक घेऊन गौरव प्राप्त केला. 
साहिलचे वडील याबाबत म्हणतात कि, "वयाच्या 21 व्या वर्षी अथक परिश्रमाने साहिलने यश संपादन केले आहे. गर्व वाटावा असे काम माझ्या मुलाने  करून दाखवले आता देशासाठी गोल्ड मेडल जिंकून आणावे हीच इच्छा ! आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या मुलाच्या पाठीमागे असावे !."


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...