सोलापूरचा स्वातंत्र्य संग्राम डोळ्यासमोर आला कि कुर्बान हुसेन, हुतात्मा किसन सारडा, हुतात्मा मलप्पा धनशेट्टी नाव डोळ्यासमोर येते. पण या सोलापूरच्या लढ्यात एक क्रांतिकारी अज्ञात राहिला. स्वतंत्र सेनानी मरहुम अब्दुलरहीमान अमिनसो दुरुगकर.

सोलापूरचा स्वातंत्र्य संग्राम डोळ्यासमोर आला कि कुर्बान हुसेन, हुतात्मा किसन सारडा, हुतात्मा मलप्पा धनशेट्टी नाव डोळ्यासमोर येते. पण या सोलापूरच्या लढ्यात एक क्रांतिकारी अज्ञात राहिला. 
स्वतंत्र  सेनानी मरहुम अब्दुलरहीमान अमिनसो दुरुगकर.

स्वतंत्र  सेनानी मरहुम ंअब्दुलरहीमान अमिनसो दुरुगकर आकाराने लहान  पण कीर्ति महान असल्याने  लोक त्यांना नन्हे  पैलवान असे म्हणत  होते यांचा जन्म सोलापूर येथे 1890 मध्ये झाला.हे उत्तमपैकी पैलवान होते यांना  हबीबउल्ला, मंगलसो कांबळे उस्ताद यांचे मार्गदर्शन लाभले दररोज 800ते 1000 जोर व 1200ते 15 00 बैठका मारणे हा  त्यांचा क्रम होता. 
उंचीने लहान असल्या कारणाने नन्हे पैलवान मनहुनच सर्वत्र ओळखले जात होते शरीर पिळदार व  बळकट असून लढण्याची पद्धत अतिशय कसबी व बहुरंगी होती.
संघ स्थापन करण्यामध्ये त्यांनी चांगला वाटा उचललेला आहे व ते पहिल्या कार्यकारी मंडळळाचे सभासद होते. 

यांची  सोलापुरातील पंजाब तालमीतील अत्यंत ख्यातनाम आश्या  बाबडया उर्फ बाबूलाल पैलवान बरोबर अत्यंत चुरशीची कुस्ती नेमून  झाली.  व्ययाम प्रेमातून कुस्ती कलेला प्रोत्साहन मिळावे म स्वताची तालीमच बांधून तयार केली. ही तालीम शुक्रवार पेटीतील जामा मस्जिद च्या पश्चिमेस आहे. हे हुतात्मा श्री किसन सारडा यांच्याकडे मुनीम म्हणून कामाला होते. अतिशय ईमान एतबार ने नौकरी केली  1930 च्या मार्शलॉ सोलापुरातील कोर्ट जाळपोळ  प्रकरणात हुतात्मा सारडा  यांचे  नाव गोवले गेले व त्या मध्ये ते असल्याचे  साक्षी मध्ये सांगण्या  करता पैलवान अब्दुल रहिमान   यांना अटक करुन ब्रिटिशांनी फार मोठा त्रास दिला व त्यांच्या सूटकेचे अमिष दाखवले. माफीचा साक्षीदार होण्याची व जमीन देण्याची अट घातली. 
या फुसला बळी न पडता पोलिस अधिकारीच्या हातावर तुरी देऊन कोर्टातून फरारी झाले व तीन वर्षे अज्ञातवासात काढले .या काळात त्यांनी निरनिराळ्या नावांनी अनेक ठिकाणी प्रेक्षणीय कुस्त्या  केल्या   यांच्या कुस्त्यातील तडफ व चढाईचा खेळ पाहून प्रेक्षकांची नजर खिळून जात असे व खूष होऊन बक्षीस ही देत असत .
तीन वर्षांनी  हदपारीची मुदत संपल्यानंतर परत येऊन पुन्हा हुतात्मा घराण्याची सेवा केली 
व सन 1943 मध्ये अर्धांगवायूने शरीर निकामी झाले 5 मे 1947 रोजी त्यांचे निधन झाले. 
नंतर देश आझाद झाला आणि त्यांच्या पत्नीस महाराष्ट्र सरकारने स्वातंत्र सैनिक श्रीमती कोंदनबी  दुरुगकर यांना सन्मानपत्र व पेन्शन देऊन गौरविण्यात आले. सध्या यांची पुढील पिढी अकलूज शहरात वास्तव्यास आहे.
------------------------------------------------------------------
टीप :- महाराष्ट्रातील असंख्य अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांची माहिती आमच्यापर्यत पोहचवा.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...