परळी : प्रतीकात्मक कुर्बानीचे आदेश मागे घ्या.

कुर्बानी संदर्भात आपत्तीजनक आदेश(जीआर) मागे घेण्याबाबत परळी येथील युवकांनी दिले निवेदन .
covid-19 च्या महामारी च्या संकटकाळात आपल्या सरकारने संपूर्ण राज्यात सणासुदीत व धार्मिक विधींसाठी नियमावली बनवली आहे त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या काही दिवसात मुस्लिम समाजाचा अत्यंत महत्त्वाच्या सणानिमित्त (ईदुल अजहा /बकरी ईद ) महाराष्ट्र शासनाच्या गृहविभाग कडून परिपत्रक  संदर्भ : परिपत्रक क्रमांक डी आय एस /0620 /प्र.क्र. 91/ विशा 1 ब. ( दि. 17.07.2020 )
प्रसिद्ध केले आहे .या परिपत्रकानुसार ईद च्या निमित्त कोणती दक्षता घ्यायची याची प्रसिद्धी दिली आहे. परंतु याच परिपत्रक च्या  क्रमांक 3 नियमात म्हटले आहे की " शक्यतो प्रतीकात्मक कुर्बानी करणे" .
          या मुद्द्यावरच आम्हाला प्रश्न पडला आहे प्रतीकात्मक #कुर्बानी म्हणजे नक्की काय सरकारने याचा खुलासा करावा. "प्रतीकात्मक कुर्बानी "करण्यास सांगणे म्हणजे सरकार चे हेतू वर आम्हाला संशय येत आहे की सरकार आमच्या धार्मिक विधीमध्ये हस्तक्षेप करत आहे असे आम्हाला वाटत आहे. परंतु असे आदेश काढणे योग्य नाही. सर्व समाजाला समान न्याय बरोबर मिळाला पाहिजे. परंतु आपल्या सरकारने बकरी ईद व दुसऱ्या सणा बद्दल जे आदेश काढले आहे ते खरंच दुजाभाव करणारे आहे. आपल्या सरकारकडून अशी अपेक्षा नव्हतीच.
सोशल डिस्टंसिंग च्या व इतर नियम हे आम्हाला सर्वांना मान्य  आहेत आणि त्या नियमांचे पालन मुस्लिम समाज काटेकोरपणे करीत आहे ,परंतु समाजाच्या कोणत्याही विधीत #सरकारने हस्तक्षेप करू नये हीच आमची अपेक्षा आहे . तसेच वरील दिलेल्या परिपत्रकात मधील प्रतीकात्मक कुर्बानी चे आदेश हे मागे घ्यावेत व यापुढे असे धार्मिक विधीमध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष  हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घ्यावी.अशा आशयाचे निवेदन 
शेख अख्तर हमीद, शेख मख्तार बशीर, शेख तैय्यब मौजम, शाहेद खान पठाण, शेख तोहिद, शेख मदसीर, अयुब पठाण यांनी परळी येथील तहसीलदार यांना निवेदन दिले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

जाणून घ्या रेशन कार्डविषयी:- रेशन दुकानदाराची तक्रार कुठें कशी करावी?

बोधेगावच्या भुसारे परिवाराचा लग्नमंडपात पाठीमागे उभा राहणारा मामा बाबाभाई.......

बिहारचे एकमात्र मुस्लिम मुख्यमंत्री अब्दुल गफूर यांची आज जयंती...